धोंडोपंताच्या अष्टक्षरीने मला भुरळ घातली.
लहानपणी ग्रुहपाठ कधीच न करणारा मी सुद्धा या छंदशास्त्राच्या वर्गात ग्रुहपाठ आवडिने करतोय.
अष्टाक्षरी किंवा पादाकुलक छंदातला माझा एक प्रयत्न
वसंत फुलता दारी
नको पंढरीची वारी
पानापानातुन वाहे
इश्वराची क्रुपा सारी ||
फुलाफुलातुन नटे
स्रुष्टिदेवता ही न्यारी
डोळे भरुन पहावी
सौदंर्याची खाण सारी ||
भान हरपून जाते
दिसे सुंदर हे रुप
मन उल्हासित होइ
अनं आनंदित खुप ||
झाडाझाडांनाही आता
नवी पालवी फुटली
नव्या युगाच्या स्वागता
जणु कातचं टाकली ||
मन मोहरुन जाते
घेता निखळ अस्वाद
सारी देवाची किमया
आता सर्वत्र अल्हाद ||
(नवशिका) चेतन
प्रतिक्रिया
12 Nov 2008 - 12:32 am | पक्या
चांगला प्रयत्न.