डेट्रॉईट , शिकागो , न्यूयॉर्क ट्रीप साठी मार्गदर्शन हवे आहे

Primary tabs

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in भटकंती
23 Sep 2019 - 11:33 am

पुढच्या महिन्यात डेट्रॉईट्ला एका कार्यक्रमासाठी जायचे आहे.
हातात दहा बारा दिवस आहेत. तीन चार दिवस शिकागो आणि कार्यक्रम झाल्या नंतर तीच चार दिवस न्यूयॉर्क फिरावे असा विचार आहे.
माझ्या सोबत कुटुंब आणि तीन ज्येष्ठ नागरीक आहेत.
शिकागो आणि न्यूयॉर्क साठी एखादी गायडेड टूर कंपनी / व्यवस्था होऊ शकेल का ?
याबद्दल कोणी मार्गदर्शन हवे आहे.
या भागात कोणी मिपाकर आहेत का?

प्रतिक्रिया

श्रीरंग_जोशी's picture

23 Sep 2019 - 9:40 pm | श्रीरंग_जोशी

बर्‍याच कालावधीनंतर कुणी मिपाकर सहकुटुंब अमेरिकेत त्यातही मिडवेस्ट भागात येत आहेत. हे वाचून आनंद झाला.

शिकागो माझे आवडते शहर आहे अन मी बरेचदा तिथे फिरलोय. वेळ मिळताच शिकागोच्या पर्यटन पर्यायांबद्दल सविस्तर लिहिन.
तुमच्या यादीतल्या तीनही शहरांत किंवा त्यांच्या उपनगरांत काही किंवा बरेच मिपाकर राहतात.

संदेशाद्वारे माझा फोन क्रमांक पाठवतो आहे.

जुइ's picture

24 Sep 2019 - 9:04 am | जुइ

आमच्या मिडवेस्ट मध्ये कुणीतरी भटकंतीसाठी येत आहे हे पाहून मन भरून आले ;-) . अमेरिकेतील प्रत्येक मोठ्या शहरात हॉप ऑन हॉप ऑफ ही पर्यटन सुविधा असते. सर्व महत्त्वाच्या पर्यटन स्थळांच्या मार्गांवरून या बसेस धावतात. या बसेसचे अनेक थांबे असतात. त्यामुळे आपल्याला या थांब्यावर पाहिजे तिथे चढता उतरता येते. तसेच या बसेसचे वाहनचालक धावते समालोचनही करतात.

तुमच्याकडे अमेरिकेत चारचाकी चालवण्याचा परवाना किंवा भारतात चारचाकी चालवण्याचा परवाना आंतरराष्ट्रीय जोडणीपत्रासहित असेल तर अजिबात guided tour च्या फंदात पडू नका खूप पैसे जातात.

खुद्द न्यूयॉर्क शहर बघण्यासाठी २ दिवस तरी हवेत. आणि न्यूयॉर्क मध्ये गाडीचा काहीही उपयोग नाही सबवे आणि पायी भटकंती उत्तम.
माझ्या सासू सासऱ्यांना मी २ दिवसाचा प्लॅन करून दिला होता. तो उत्तम झाला. पण न्यूयॉर्क मध्ये तुमच्या बजेट नुसार प्लॅन करता येईल.

शिकागो मध्ये गेलात तर तिथून २-३ तासाच्या (कारने) अंतरावर विस्कॉन्सिन म्हणून राज्य आहे. तिकडे उत्तम निसर्गात काही सुंदर गोष्टीचा आस्वाद घेता येईल. अर्थात थंडीचा अंदाज घेऊन प्लॅन करणे. भारतातून सामान घेऊन येणार असाल आणि सामानासकट फिरणार असाल तर साऊथवेस्ट airline उत्तम आहे. सामानाचे वेगळे पैसे पडत नाहीत. पण इतर कुठल्या airline ने फिरताना बेसिक इकोनोमी च तिकीट काढू नका. स्वस्त दिसत आणि खूप त्रास होतो असा माझा वैयक्तिक अनुभव आहे.

इन्दुसुता's picture

25 Sep 2019 - 1:18 am | इन्दुसुता

मिडवेस्ट मध्ये आपण सर्वांचे स्वागत.

खग्या यांनी शिकागूहून विस्कॉन्सिन ला चार चाकीने जावे असे सुचवले आहे त्याच्याशी असहमत. इतरही पर्याय आहेत. साउथ वेस्ट आणि थंडीबद्दल त्यांच्याशी सहमत.

ते म्हणतात त्याप्रमाणे न्यु यॉर्क मध्ये किमान २ दिवस हवेतच. शिकागोलाही किमान २ दिवस हवेतच. शिकागो साठी ४ दिवस सुद्धा कमी पडू शकतात. न्यु यॉर्क प्रमाणेच शिकागो मध्ये तुमच्या बजेट नुसार प्लॅन करता येईल. सर्वांना काय बघायला आवडेल तसा प्लॅन करता येईल. हे अतिशयच मोघम आहे याची कल्पना आहे.

व्यनि केला आहे.

यशोधरा's picture

25 Sep 2019 - 11:40 am | यशोधरा

खूप दिवसांनी दिसलात. :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

25 Sep 2019 - 10:48 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विजुभौ, हॅपी जर्नी. प्रतिसाद माहितीपूर्ण आणि मदत करणारे आहेत.
मिपाकर कधी कधी प्रामाणिकपणे मदत करतात, सालं इमोशनल होतो माणूस.

-दिलीप बिरुटे

हरवलेला's picture

25 Sep 2019 - 11:32 am | हरवलेला

१. शिकागो येथील हवामान येथे पाहता येईल. https://www.accuweather.com/en/us/chicago/60608/october-weather/348308?y...
येथील हवामान लहरी असल्यामुळे या वेबसाईट वर लक्ष ठेवा.
२. शिकागो सिटी पास घेतल्यास वेळ व पैसे दोन्ही वाचतील (आंतरजालावर खरेदीसाठी उपलब्ध आहे).
३. फील्ड museum चकटफू बघायचे असल्यास तारीख बघून जावे. https://www.fieldmuseum.org/our-events/free-admission-days
४. वेळ व इच्छा असल्यास मिशीगन सरोवरामध्ये अवश्य पोहण्यास जा. (खराब हवामानामुळे किनारा बंद असू शकतो. अर्थात तो नशिबाचा भाग आहे. )
५. सध्या एवढच . जस आठवेल तसं लिहीन.

इन्दुसुता's picture

25 Sep 2019 - 10:47 pm | इन्दुसुता

हरवलेला भाऊ, ते ऑक्टोबर महिन्यात येणार आहेत…. तेव्हा कुठलं मिशिगन सरोवरात पोहायला??? ( स्वगतः हे भाऊ एकतर शिकागोचे नाहीत किंवा शिकागोत नवे असावेत :))

सिटी पास आणि हॉप ऑन हॉप ऑफ, शिवाय इतरही खूप माहिती जालावर आहेच की…. नव्या व्यक्तिवर या माहितीचा भडिमार होऊ शकतो, म्हणूनच येणार्या सर्वांना जे बघण्यात रूची असेल तसे प्लॅन करता येईल, अन्यथा केवळ टुरिस्ट भोज्या होऊ शकतो ( असे अर्थात माझे व्यक्तिगत मत)!

प्रवासास शुभेच्छा!

श्रीरंग_जोशी's picture

26 Sep 2019 - 3:29 am | श्रीरंग_जोशी

लेक मिशिगनच्या काठावर वसलेले शिकागो शहर भेट देण्यासाठी ठरवल्याबद्दल अभिनंदन.
शिकागो हे लेक मिशिगनच्या काठावर वसले आहे व या सरोवरामुळे वाहणार्‍या वेगवान वार्‍यांमुळे ते विन्डी सिटी म्हणून ओळखले जाते.

शिकागोतली बरीच महत्वाची पर्यटन आकर्षणे डाऊनटाऊन, त्या शेजारचे नेव्ही पिअर अन आजुबाजुची लेक सुपिरिअरच्या काठावरचा भूभाग यात केंद्रित झालेली आहे. हे एका अर्थाने पर्यटकांसाठी सोयीस्कर ठरते.

खालिल स्क्रीनशॉट गुगल मॅप्सवरुन साभार.


हा स्क्रीनशॉट नकाशासारखा उत्तर दक्षिण नसून ऐवजी पश्चिम पूर्व असा आहे.

या स्क्रीनशॉटमध्ये उंच इमारती दिसत आहेत तो भाग म्हणजे डाऊनटाऊन शिकागो. त्यातून शिकागो नदी वाहते.
लेक सुपिरिअरमध्ये चिंचोळ्या पट्टीसारखा दिसणारा भाग म्हणजे सुप्रसिद्ध नेव्ही पिअर.
डावीकडे खाली सुपिरिअरच्या किनार्‍यावर जी वर्तुळाकार इमारत दिसते ती म्हणजे अ‍ॅडलर प्लॅनेटेरियम.
तिच्या थेट वर दिसत आहे ते म्हणजे शेड अ‍ॅक्वॅरियम.
थोडं वर हिरवाईने नटलेला परिसर मिलेनियम पार्क व शेजारची ठिकाणे जसे बकिंगहम फाऊंटन
मिलेनियम पार्कशेजारीच (दक्षिणेकडे) आर्ट इन्स्टीट्युट ऑफ शिकागो आहे.

थोडा अधिक झूम केलेला स्क्रीनशॉट गुगल अर्थवरुन साभार

डाऊनटाऊनमध्ये डावीकडे वर उत्तुंग इमारत दिसते आहे ती म्हणजे विलिज टॉवर (पूर्वीचा सिअर्स टॉवर). आजही पृथ्वीच्या पश्चिम भागात इमारतीवरच्या अँटेनाजची उंची वगळल्यास सर्वात उंच इमारतीचा मान या इमारतीला जातो.
नदीशेजारी वळणावर उंच इमारत दिसत आहे ती आहे ट्रंप टॉवर.
उजव्या बाजूला किनार्‍यापासून किंचित अंतरावर जी उंच इमारत दिसते आहे ती आहे शिकागो ३६० (पूर्वीचा हॅनकॉक टॉवर).

काही फोटोज

मिलेनियम पार्कमधली प्रसिद्ध शिकागो बीन.

शिकागो रिव्हरच्या बोट राइडमधून काढलेला ट्रंप टॉवरचा फोटो.

मिलेनियम पार्क मधले फाऊंटन. त्यासमोरच असे दुसरे आहे. दोन्हींवर विविध व्यक्तींचे फोटोज दाखवून त्या फोटोजमधल्या मुखांतून पाण्याची धार निघत असते.

ही आहे रिगली बिल्डिंग (रिगलीज च्युइंगम कंपनीच्या कार्पोरेट मुख्यालयासाठी १९२० साली बांधली गेली ).

विलिज टॉवरच्या ऑब्झर्वेशन डेक मधून दिसणारे मिलेनियम पार्क व शेजारच्या परिसराचे दृश्य

तिथूनच दिसणारे डाऊनटाऊनचे दृश्य शिकागो ३६० व ट्रंप टॉवर यात दिसत आहेत.

आर्ट इन्स्टिट्युट ऑफ शिकागोच्या इमारतीच्या आत ते सभागृह आहे जिथे ११ स्प्टेंबर १८९३ रोजी स्वामी विवेकानंदांनी त्यांचे ऐतिहासिक भाषण दिले होते. आता जे सभागृह आहे ते त्याच ठिकाणी जुने पाडून नवे बांधले आहे. फोटोमधले वर्णन वाचण्यासाठी फोटोवर क्लिक करावे.

बकिंगहम फाउंटन

अ‍ॅडलर प्लॅनेटेरियम शेजारुन दिसणारे डाऊनटाऊन शिकागो

शिकागो ३६० च्या ऑब्झर्वेशन डेकमधून दिसणारे दृश्य

नेव्ही पिअरहून दिसणारे लेक सुपिरिअर

शिकागोला भेट देताना विलिज टॉवर व शिकागो ३६० दोन्हींच्या ऑब्झर्वेशन डेकला भेट द्यावी. दोन्ही शक्य नसल्यास किमान शिकागो ३६० ची निवड अवश्य करावी कारण ते लेक सुपिरिअरच्या अधिक जवळ आहे.

डाऊनटाऊनमधल्या हॉटेलमध्ये मुक्काम केल्यास वेळेची बचत होऊन या सर्व ठिकाणांना पुरेसा वेळ देणे अधिक शक्य होते.

वेळ मिळाला की अधिक लिहितो.

श्रीरंग_जोशी's picture

26 Sep 2019 - 4:00 am | श्रीरंग_जोशी

वरच्या प्रतिसादात अनावधानाने बर्‍याच ठिकाणी लेक मिशिगन ऐवजी लेक सुपिरिअर असा उल्लेख झाला आहे.
साहित्य संपादकांना विनंती आहे की कृपया दुरुस्ती करावी.

अरे वा बरीच माहिती मिळाली की.
_/\_ बिरुटे गुरुजी म्हणाले तसे मिपाकर मदतीसाठी नेहमीच पुढे असतात.
मला त्यांनी लंडनला दोनदा झकास ट्रीप घडवली होती

चौथा कोनाडा's picture

28 Sep 2019 - 2:17 pm | चौथा कोनाडा

मिडवेस्टला येताय ! क्या बात हैं, विजुभाऊ आपले हार्दिक स्वागत !

तिथल्या आपल्या जवळच्या फ्रँचाइसीला भेट द्यायला विसरू नकात ! :-)

YCHP

विजुभाऊ's picture

22 Oct 2019 - 1:08 am | विजुभाऊ

मित्रानो मी दोन आठवडे डेट्रोईट ला होतो.
सोबत तीन जेष्ठ्य नागरीक होते ( सरासरी वय ७८ ) नायगारा धबधबा हा त्यांच्या बकेत लीस्ट मधे सर्वात वर होता.
एका मित्राने माहिती दिली त्या वरून https://www.tours4fun.com या साईट वर एक गायडेड टूर बूक केली . ही चीनी मंडळी आहेत.
अतीशय नाममात्र शुल्कात ( अविश्वसनीय सहा लोकांसाठी ३००००/- रुपये दोन रात्री तीन दिवस प्रवास आणि हॉटेल या सह) बस टूर घडवतात.
खूप छान आरामदायक बस / माहीतगार आणि बोलका टूर गाईड . निसर्ग या मुळे टूर खूपच छान झाली.
तीनही ज्येष्ठ नागरीकानी ट्रीपचा मनसोक्त आनंद घेतला. नायगार्‍यात जेट बोट राईडही केली.
बाकी कामामुळे शिकागो ला मात्र यायला या वेळेस जमले नाही. पुढच्या वेळेस तेथे येवून झकास मिसळीचा बेत माझ्याकडून नक्की.
तुम्हा लोकाना भेटायला नक्की आवडेल.