पुनरागमनायच...
पुनरागमनायच...
गणपती येण्याची चाहूल लागते आणि वातावरणात, आसमंतात हळूहळू ऊर्जा सळसळायला लागते. तुम्हा-आम्हाला ह्या ऊर्जेची लागण व्हायला वेळ लागत नाही. बाप्पा मुक्कामी असेतोवर ही ऊर्जा साऱ्या आसमंतात जिथे तिथे जाणवत राहते. सर्वत्र विलक्षण उत्साही, मंगलमय अशा वातावरणाचा येत असलेला अनुभव मोठा सुखद, आनंददायक वाटत राहतो आणि आपल्या आप्तगणांसह हा आनंद साजरा होत असेल, तर तो द्विगुणित झाला नाही तरच नवल! गणपती, मागोमाग येणार्या गौराया आणि ह्या साऱ्यांच्या दर्शनानिमित्त एकत्र येणारे आप्तजन, मित्रपरिवार ह्यांच्यासाठी कराव्या लागणाऱ्या उस्तवारीने श्रमी व्हायला होत नाही, उलट आणखी बळ येतं. हे हवेसे, करावेसे वाटणारे श्रम असतात. गजाननाच्या लोभस दर्शनाने 'सानंद, आनंद डोले' अशी मनाची अवस्था झालेली असते. मोद विहरतो चोहीकडे, असं काहीसं होतं खरं.
खरं पाहता जेव्हापासून गणेशोत्सव सुरू झाला, तेव्हापासून ते आजच्या उत्सव साजरा करण्याच्या पद्धतीमध्ये फरक पडला आहे, उत्सव साजरा करण्याची कारणं बदलली आहेत, असलीच तर उद्दिष्टंदेखील बदलली असावीत. कालानुरूप पुढे आणखीही बदल होत जातील. तरीही आपल्याला उत्सवाचं वाटणारं आकर्षण आणि हौस कमी होणार नाही. उत्सव हे खरं तर सर्व प्रकारचे भेदभाव बाजूला ठेवून, विसरून सगळ्यांनी एकत्र येण्याचं चांगलं निमित्त. त्यातून सामाजिक भान जोपासलं जात असेल तर अधिक उत्तम. ह्या वर्षीच्या अस्मानी संकटाचा मुकाबला करण्यासाठी असं भान वैयक्तिकरीत्या आणि सामाजिक स्तरावर, उत्सवांच्या धामधुमीमध्येही काही अंशी राखलं गेलं, ह्याचं समाधान आहे. ज्या कारणाने गणेशोत्सवाची मूळ मुहूर्तमेढ रोवली गेली, त्या संकल्पनेपाशी गणेशोत्सव पुन्हा पुन्हा असाच परतून येत राहू देत आणि नव्या भानाने वातावरण अधिक उजळून, झळाळून टाकू देत, ह्यापेक्षा गजाननाकडे आणखी वेगळं काय मागायचं?
तेरा वर्षांपूर्वी गणेशचतुर्थीला मिपाचा जन्म झाला, त्याअर्थी गणेशोत्सवाशी मिपाचं एक आंतरिक नातं आहे, म्हणायला हरकत नसावी. म्हणून ह्या निमित्ताने प्रकाशित होणाऱ्या लेखमालेचंही महत्त्व. ह्या वर्षी मिपावरच्या या उपक्रमाचं संयोजन करण्याची संधी मला पहिल्यांदाच मिळाली, त्यासाठी मिपा प्रशासनाचे मनापासून आभार.
या पहिल्या प्रयत्नात मला सांभाळून घेणाऱ्या, वेळोवेळी सूचना करणाऱ्या, मतं मांडणाऱ्या आणि माझ्याबरोबर लेखमालेच्या उत्तम सादरीकरणासाठी झटणाऱ्या मिपा सल्लागार आणि साहित्य संपादक ह्यांना अनेक धन्यवाद. नूलकरकाका हरेक उपक्रमात न कंटाळता, न चुकता प्रत्येक लिखाणाचं मुद्रितशोधन करून त्याचं रूपडं साजरं बनवतात आणि इतरही मौलिक सूचना करतात, त्यांचे आभार मानावे तितके कमी आहेत! दर उपक्रमातील लेखमाला आणि अंक अभ्या ह्यांच्या बॅनर व इतर सजावटींनी सजतात. ह्याही वर्षी उत्तम बॅनर व हेडर-फूटर सजावटीसाठी मदत करण्यासाठी अभ्या ह्यांचं कौतुक व आभार. स्तोत्रे, आरतीचे ऑडिओ धाग्यांत उपलब्ध करून देण्यासाठी सतीश गावडेंनी केलेल्या मदतीबद्दल त्यांचेही आभार मानते. प्रशांत व नीलकांत प्रत्येक उपक्रमात पडद्यामागे राहून शांतपणे वेळोवेळी आलेल्या तांत्रिक अडचणी सोडवण्याचं काम करत असतात आणि प्रत्येक उपक्रम तडीस नेण्यामध्ये ह्या दोघांचा वाटा असतोच. ह्याशिवाय, मिसळपावसारखं माध्यम मिपाकरांसाठी सातत्याने उपलब्ध करून ठेवण्यासाठीही त्यांचे आभार मानू तितके कमी आहेत. आलेल्या लहान-मोठया अडचणींमधून मार्ग काढून, श्रीगणेश लेखमालेच्या यशस्वी प्रकाशनाचं श्रेय मदतीचा हात पुढे करणाऱ्या प्रत्येक मिपाकराचं आहे, हे कृतज्ञतापूर्वक नमूद करते.
उपक्रमाच्या ह्या सर्व सव्यापसव्यानंतरही लेखमालेमध्ये काही कसर राहिली असेल, कुठे काही चुकलं असेल तर त्याची जबाबदारी घेत, मोठेपणा दाखवून सांभाळून घ्यायची मी तुम्हा सर्वांना विनंती करते. पहिल्यांदाच असं काम करताना चुकतमाकत, लेखमालेच्या झलकींपासून समारोपापर्यंत पोहोचेपर्यंत, अनुभवांतून शिकत जाण्याचा हा प्रवास माझ्यासाठी मोठा विलक्षण होता.
आता, आणखी एका मोठ्या ऋणाचा उल्लेख करावयाचा आहे आणि तो म्हणजे मिपा लेखमालेसाठी वेळात वेळ काढून एकाहून एक सुरेख लेख, कविता लिहून देणाऱ्या, चित्रकला, दृक्-श्राव्य माध्यमांचा वापर करत लेखमालेचं रूपडं अधिकाधिक आकर्षक करायला मदत करणाऱ्या तुम्हां मिपाकरांच्या ऋणाचा. तुमच्या सहभागाशिवाय काहीच शक्य झालं नसतं, ही कृतज्ञ जाणीव मनात वागवत तुम्हा सर्वांचे मनापासून आभार मानते. ही लेखमाला नवीन रूपात सादर करण्यासाठी टर्मीनेटर ह्यांनी मोठ्या उत्साहाने स्वतःहोऊन काम करायची तयारी दाखवून हातभारही लावला आहे, त्यांचं प्रचंड कौतुक आणि मनापासून आभार. त्याचप्रमाणे, गणपतीच्या सुरेख चित्रासाठी नीना ह्यांचं अतिशय कौतुक आणि आभार! भविष्यातील उपक्रमांसाठी काम करण्यासाठी नवीन चेहरे ह्या उपक्रमामध्ये मिपाला मिळाले, हे बाप्पाने जाता जाता पदरात घातलेलं ह्या उपक्रमाचं एक घवघवीत यश!
शेवटी आता बाप्पाला पुढच्या वर्षी लवकर यायची आठवण करून देता देता आणि जड मनाने त्याला तात्पुरता का होईना, निरोप देताना म्हणायचं तरी काय मंडळी?
बस इतकंच की, पुनरागमनाय च...
विशेष
वाचन
58010
वाचनखूण
प्रतिक्रिया
41
दरवर्षीप्रमाणच गणेश लेखमाला
मस्त.. मनोगत... आवडले
लेखनमाला तर उत्तमच झाली
लेखनमाला तर उत्तमच झाली
लेखमाला
छान !
बास
आभार
या गणेश लेखमालेने आता नवीन
In reply to या गणेश लेखमालेने आता नवीन by गवि
या गणेश लेखमालेने आता नवीन
अतिशय सुंदर लेखमाला झाली.
In reply to अतिशय सुंदर लेखमाला झाली. by पद्मावति
+१
अत्यंत सुरेख, देखणी आणि सुरेल
In reply to अत्यंत सुरेख, देखणी आणि सुरेल by डॉ सुहास म्हात्रे
यान्तु मिपागणा: सर्वे...
खूप सुंदर झालेली आहे लेखमाला!
वा! अप्रतिम .....
सुरेख!
माफ करा ...
In reply to माफ करा ... by सुधीर कांदळकर
असे काही नाही हो :) तुमचे
निरोप..
उत्तम!
अतीशय वाचनीय, बहुरंगी
दिवाळी अंकांची झलक १, २, ३ पण ....
In reply to दिवाळी अंकांची झलक १, २, ३ पण .... by सुधीर कांदळकर
अरे वा! झलकीची दखल घेतल्याचा
यावेळची गलेमा सर्वोत्तम होती.
लेखनमाला उत्तमच झाली!
छानच झाली लेखमाला.
बहुरंगी बहुढंगी धागारूपी पुष्पांनी गुंफलेली सुंदर लेखमाला!
देखणी आणि संग्राह्य लेखमाला!
लेखमाला सुंदर आहे.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मेरा दिल तेरे लिये धड़कता है... :- Aashiquiउत्तम
तलवारीचे काम सुईने. वा! .....
तलवारीचे काम सुईने. वा! .....
तलवारीचे काम सुईने. वा! .....
तलवारीचे काम सुईने. वा! .....
मिसळपावशी जुने नाते आहे, एके
In reply to मिसळपावशी जुने नाते आहे, एके by शैलेन्द्र
:)
वाहः सुंदर झालय मनोगत ताई.
मालिकेतील सगळच लेखन आवडल.
फार सुंदर झालीये लेखमाला.
एस साहेब कुठे अदृश्य झाला होतात इतके दिवस?