श्री गणेश लेखमाला २०१९ - झलक पाचवी!

Primary tabs

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in लेखमाला
29 Aug 2019 - 6:41 am

म्हणता म्हणता गणपतीच्या आगमनाच्या प्रतीक्षेचा काळ संपत आलाय आणि भाद्रपद येता येता गणरायालाही सोबतच घेऊन येतो आहे. आजवर घडलेलं सारं भलं-बुरं काही काळासाठी बाजूला ठेवून आता गणपतीच्या स्वागतासाठी तयार राहायचं. येणाऱ्या ह्या पाहुण्याचं आपापल्या परीने मनापासून आगतस्वागत, पूजन करायचं आणि सर्वे भवन्तु सुखिनः असं आशीर्वचन मागायचं.

मिपाच्या गणेश लेखमालेवरसुद्धा आता शेवटचा हात फिरवून होत आलाच आहे. लेख, चित्रं, फोटो, ऑडिओ, व्हिडिओ क्लिप्स, सजावट, लिखाणामधले मुद्रणदोष.. एक ना दोन, कित्येक लहान लहान गोष्टी पुनरेकवार पडताळून पाहणं सुरू आहे.

IMG-20190808-WA0012

दोन सप्टेंबर २०१९पासून ते अनंतचतुर्दशीपर्यंत जरी 'इदं न मम' ह्या भावनेने तुम्हा सर्वांपुढे ही लेखमाला आम्ही सादर करणार आहोत, तरीही, झालेलं काम तुमच्या पसंतीला उतरेल का, ही एक छोटीशी धाकधूकसुद्धा मनात आहे. लेखमाला प्रकाशित होण्याची वाट तर आपण सगळेच बघत आहोत.

तोवर, लेखमालेमधल्या एका लेखाची ही छोटीशी झलक -

लोकसाहित्य सामान्यतः लिखित स्वरूपात संग्रहित करून ठेवण्याची पूर्वापार परंपरा नव्हती, तरीही लोकांच्या मुखी सतत वसल्याने ते टिकून राहिले, असे म्हणायला हरकत नसावी. संतांनी अध्यात्माचा प्रसार, प्रचार करण्यासाठी आणि बहुजन समाजामध्ये त्याची गोडी उत्पन्न करण्यासाठी तत्कालीन लोकगीतांच्या प्रकारांचा उपयोग केला, उदाहरणार्थ, अभंगरचना, ओव्या, भारुडे इत्यादी. संतांच्या निष्ठा जरी विठोबाच्या पायांशी वाहिलेल्या असल्या, तरी गणेशस्तवन, पूजन हासुद्धा त्यांच्या अभंग साहित्याचा अविभाज्य भाग आहे. लोकसाहित्यामध्ये आणि लोककलांमध्ये गणेशस्तवन, गणेशपूजन, स्तुती ह्यांचे वेगवेगळे आविष्कार बघायला मिळतात. दुधामध्ये साखर विरघळावी, इतक्या सहजतेने संतसाहित्य, गण, भारुडे ह्यांमध्ये त्याचे अस्तित्व उमटलेले आहे. लोककलांचे सादरीकरण गणेश आगमनाने सुरू होते.

सातवाहन काळात प्रतिष्ठान - पैठण येथे रतिनाट्यासारखे कलाप्रकार सादर करण्याची प्रथा होती, त्यात तमाशातील गण प्रकाराचे मूळ आहे, अशी मान्यता आहे. ह्या नाट्याची सुरुवात मंगलचरणाने करत. हाच तो गण. मंगलचरणामध्ये गायली जाणारी स्तुतिगीते म्हणजेच गण होय. पहिला गण शंकर आणि पार्वतीचा, दुसरा गण लक्ष्मी आणि नारायणाचा व तिसरा गण गणपतीचा अशा प्रकारची स्तुतिगीते गायली जात.

मिपा श्रीगणेश लेखमाला २०१९

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 Aug 2019 - 10:04 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सातवाहन, लेण्या, शिल्प, म्हटलं की वल्लीच दुसरं कोण ?

उत्तर बरोबर आलं तर इथं जाहीर कौतुक करावं.
चुकलं असेल तर व्य.नि करावा धन्यवाद.

झलक दिखला जा, मधील मला बाप्पा खुप आवडले.
लहान मुलासारखं उचलून घ्यावं वाटतं. आणि असो.

-दिलीप बिरुटे

नाखु's picture

31 Aug 2019 - 10:23 am | नाखु

वल्ली शिवाय इतर कोणी असेल असं वाटत नाही
.

प्रतिक्षेत असलेल्या मिपाकरांपैकी एक वाचकांची पत्रेवाला नाखु

ज्ञानोबाचे पैजार's picture

29 Aug 2019 - 10:17 am | ज्ञानोबाचे पैजार

ऑडीओ आणि व्हिडीओचीही झलक आली असती तर अजुन मजा वाटली असती.

लेखमालेची उत्कंठेने प्रतिक्षा करणारा (पैजारबुवा),

यशोधरा's picture

29 Aug 2019 - 10:59 am | यशोधरा

दोन तारखेपासून लेखमालिका प्रकाशित होणार आता! मस्त!

पद्मावति's picture

29 Aug 2019 - 1:27 pm | पद्मावति

वाट बघतेय.

पैलवान's picture

30 Aug 2019 - 11:30 am | पैलवान

एक बार आजा आजा आजा आजा आ....जा!!