सर्व मिपाकरांना विनंती, वारंवार सूचना देऊनही 'चालू घडामोडी' आणि इतरही काही धाग्यांत व्यक्तिगत पातळीवर केली जाणारी टीका दिसून येते. पक्षांचे प्रमुख, पक्ष यांच्यावर केल्या जाणा-या टिकाही संयमित असाव्यात अशी अपेक्षा आहे, नव्या कायद्यांमुळे संकेतस्थळावरील सर्वांचा वावर कायद्यातील नियमाबरोबर, सार्वजनिक संस्थळावरील सभ्यतेचे किमान निकष पाळणारा असावे असे मिपा व्यवस्थापनाचे मत आहे, यापुढे असे आढळून येत राहिल्यास कोणतेही स्पष्टीकरण न देता असे प्रतिसाद, धागे सरसकट अप्रकाशित केल्या जातील किंवा खाते निष्कासित करण्यासारखी कठोर कारवाई केली जाईल याची सर्वांनी नोंद घ्यावी व सहकार्य करावे.

- मिपा व्यवस्थापन


मिपा श्रीगणेश लेखमाला २०१९

Primary tabs

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in काथ्याकूट
12 Jul 2019 - 10:02 am
गाभा: 

IMG-20190711-WA0012

नमस्कार मिपाकरहो,

सध्या आषाढ सुरू आहे मंडळी. भागवत भक्तीचा महामूर ओघ विठ्ठलाचरणी पर्जन्यराजाच्या साथीने लोटतो आहे. बघता बघता, क्षणात ऊन तर क्षणात पावसाचा खेळ खेळत, फुला-पानांची नक्षी सजवत, आसमंतात रंग भरत श्रावण हजर होईल! गणरायाच्या आगमनाची तयारी समस्त चराचरात सुरू होईल. सगळ्या सृष्टीला त्याच्या आगमनाचे वेध लागतील. मग मिपा मागे कसं राहील? सालाबादप्रमाणे मिपा आणि मिपाकरसुद्धा गजाननाच्या आगमनाची वाट बघणार, त्याच्या स्वागताची तयारी करणार आणि ह्या स्वागतात आणखी रंग भरणार ती मिपावर गणेशोत्सवानिमित्त साजरी होणारी श्रीगणेश लेखमाला. चौदा विद्या आणि चौसष्ट कलांच्या अधिपतीचं ह्याहून उत्तम स्वागत तरी कोणतं?

तर मंडळी, हे स्वागत दणक्यात करण्यासाठी तुमच्या सहकार्याची, सहभागाची गरज आहे. मागील काही वर्षं आपण श्रीगणेश लेखमालेसाठी काही एक ठरावीक विषय देऊन लेख मागवले होते. ह्या वर्षी आपण कोणत्याही विषयाचं बंधन ठेवलेलं नाही. तुम्हा सर्वांना आवडीच्या विषयावर लेखन करण्याची सस्नेह विनंती आहे. लेख, ललितं, कविता, बाप्पाच्या नैवेद्याच्या आणि सणासुदीला चालणाऱ्या इतर पाककृती, आठवणी, व्यक्तिचित्रणं, भटकंतीची वर्णनं... लिहायला खूप काही आहे, तुम्ही सगळ्यांनी आपल्या घरचं कार्य समजून मनावर घ्यायचं आहे!

साहित्य पाठवताना एक छोटीशी काळजी घ्यायची आहे, ती म्हणजे, श्रीगणेश लेखमालेसाठी पाठवलेलं साहित्य यापूर्वी कोणत्याही छापील अथवा ई-स्वरूपात कोणत्याही संकेतस्थळावर, वैयक्तिक ब्लॉगवर, कोणत्याही समाजमाध्यमात प्रकाशित झालेलं नसावं.

मग सरसावताय ना कीबोर्ड? कारण, 'जे जे आपणासी ठावे| ते ते इतरांसी सांगावे| शहाणे करुनी सोडावे| सकळ जन|'

तेव्हा होऊ द्यात श्रीगणेशा! बाप्पाच्या स्वागताची जय्यत तयारी करायला सुरुवात करू या.

गणपतीबाप्पा मोरया!!

***

कृपया आपले लेख दि. ०७-०८-२०१९पर्यंत ‘साहित्य संपादक’ या आयडीला व्यनि करून पाठवावेत,
किंवा
sahityasampadak.mipa@gmail.com या पत्त्यावर ईमेलने पाठवावेत.

काही प्रश्न, शंका असल्यास प्रतिसादांत जरूर विचारा.

टीप : आलेल्या साहित्यापैकी श्रीगणेश लेखमालेसाठी निवडलेले लेख प्रकाशित करून झाल्यानंतर जे अप्रकाशित लेख आणि इतर साहित्य प्रशासनाकडे असेल, ते काही कालावधीनंतर प्रशासनाकडून प्रकाशित केलं जाईल अथवा सदस्य स्वत: प्रकाशित करू शकतील.

धन्यवाद,

साहित्य संपादक,
मिसळपाव प्रशासन.

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Jul 2019 - 10:12 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आले का गणपती ? लेखमालेला शुभेच्छा आहेतच.

चित्र अभ्याचंच असेल. सुरेख.

दोन शब्द : अभ्यानं मिपाजाल आयुष्यात काही चांगलं काम केलं असेल तर
ही चित्रकला. मिपाला सालं लै भारी लूक दिलं अभ्याच्या चित्रांनी. धन्स रे.

बाय द वे, गणेश लेखमालिकेसाठी लिहिताय ना ? मी पण प्रयत्न करतो.

आषाढी एकादशीच्या सर्वांना शुभेच्छा...!

जय हरी.

-दिलीप बिरुटे

यशोधरा's picture

12 Jul 2019 - 10:27 am | यशोधरा

आला का आवाहनाचा धागा? ह्या वेळी लिहायला बराच वेळ दिला आहे, हे उत्तम. चांगल्या लेखांच्या ( आतापासूनच) प्रतीक्षेत!

मुक्त विहारि's picture

16 Jul 2019 - 12:11 pm | मुक्त विहारि

+1

प्रचेतस's picture

12 Jul 2019 - 2:01 pm | प्रचेतस

व्वा...!!!
उत्तमोत्तम लेखांच्या प्रतिक्षेत.

तुमच्याकडून पण एक उत्तम लेख येऊद्यात!

आमच्या गुरुदेवांच्या (अव)कृपेने स्वतंत्रपणे एखाद्या विषयावर काही लिहिण्याची बुद्धी झाली तर पाठवू काहीतरी :-))
श्रीगणेश लेखमालेस शुभेच्छा! सर्व मिपाकरांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा! जय हरी विठ्ठल! __/\__

ज्याने कुणी हे चित्र बनवलंय त्याला दंडवत .. त्याचे नाव कळले तर बरे होईल ..

राजाभाउ's picture

12 Jul 2019 - 8:11 pm | राजाभाउ

अभ्याच असणार दुसर कोण

खिलजि's picture

12 Jul 2019 - 8:22 pm | खिलजि

अभ्या शेट , क्या बात है ... अभिनंदन अभ्या , मित्रा खरंच साक्षात गणेश पण हे बघून प्रसन्न झाला असेल ..

कुमार१'s picture

12 Jul 2019 - 9:40 pm | कुमार१

सुंदर चित्र

पद्मावति's picture

15 Jul 2019 - 12:39 pm | पद्मावति

वाह, पर्वणी आहे. वाट बघतेय.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 Jul 2019 - 12:42 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कोण कोण लिहितय काही अपडेट्स ? मी शनिवारी बसून पाहतो काही सुचतं का ?

रुद्रेश्वर लिहायला घेतलं आठेक ओळी झाल्या आणि पुढे पॉज....

-दिलीप बिरुटे

सस्नेह's picture

18 Jul 2019 - 5:18 pm | सस्नेह

श्रीगणेशा झाला तर लेखमालेचा !
नेहमीच ही लेखमाला आगळेवेगळे असे काही देऊन जाते.
यावेळीही अशाच अपेक्षेत,
स्नेहा.

किसन शिंदे's picture

18 Jul 2019 - 9:55 pm | किसन शिंदे

गलेमा सुपरहीट होण्यासाठी अनेकानेक शुभेच्छा.

सुधीर कांदळकर's picture

19 Jul 2019 - 9:12 am | सुधीर कांदळकर

माझा लेख अतिप्रचंड होतो आहे.

यशोधरा's picture

19 Jul 2019 - 11:25 am | यशोधरा

साहित्य संपादक सांगतीलच. तुमचं लेखन वाचायची उत्सुकता आहे :)

महासंग्राम's picture

23 Jul 2019 - 10:29 am | महासंग्राम

लैच शांत शांत धागा पूमिराना

यशोधरा's picture

23 Jul 2019 - 10:52 am | यशोधरा

अरे, एैसा मत समझो, सब लिखनेमें बिज्जी हय भाई!

महासंग्राम's picture

2 Aug 2019 - 9:46 am | महासंग्राम

फक्त १ महिना बाकी ....

महासंग्राम's picture

2 Aug 2019 - 10:02 am | महासंग्राम

फक्त ३० दिवस बाकी बाप्पा आणि लेखमाला यायला यायला

दुर्गविहारी's picture

7 Aug 2019 - 1:16 pm | दुर्गविहारी

मि.पा. प्रशासनाला विनंती, कृपया मुदत वाढवून मिळावी. पाउस आणि ईतर कारणामुळे लिहीणे शक्य झाले नाही. विनंतीचा सहानुभुतीपुर्वक विचार व्हावा.

मृणालिनी's picture

7 Aug 2019 - 11:04 pm | मृणालिनी

दुर्गविहारीजींशी सहमत! कृपया अवधी वाढवून मिळावा.

साहित्य संपादक's picture

8 Aug 2019 - 5:27 pm | साहित्य संपादक

पंधरा तारखेपर्यंत मुदत वाढवीत आहोत.

टर्मीनेटर's picture

8 Aug 2019 - 5:33 pm | टर्मीनेटर

मुदतवाढीचा चांगला निर्णय!

म्हणजे तुम्ही लिहिणार का? :)

टर्मीनेटर's picture

8 Aug 2019 - 5:46 pm | टर्मीनेटर

सुरुवात केली होती, पण लिहून पूर्ण झाले नाही त्यात काल शेवटचा दिवस असल्याने मग पूर्ण करण्याचा विचार सोडून दिला :)
मुदतवाढ मिळाल्याचे वाचून आनंद झाला, आता लेख लिहून पूर्ण करायचे मनावर घेता येईल.

यशोधरा's picture

9 Aug 2019 - 2:30 pm | यशोधरा

अरे वा, मस्तच की. येऊदेत एखादा मस्त लेख.

मृणालिनी's picture

10 Aug 2019 - 6:22 am | मृणालिनी

धन्यवाद साहित्य संपादक महोदय! :)

दुर्गविहारी's picture

10 Aug 2019 - 5:08 pm | दुर्गविहारी

धन्यवाद साहित्य संपादक !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Aug 2019 - 6:06 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

साहित्य संपादक.

-दिलीप बिरुटे