सोहळा

Primary tabs

Satyajit_m's picture
Satyajit_m in लेखमाला
4 Sep 2019 - 6:00 am


सोहळाप्रत्येक पावसात एक गोष्ट लपलेली असते, ती कधी तरी अशीही दिसते...जपे स्पर्शाचं पावित्र्य
असा सोवळा पाऊस
बांध आतुर थेंबांना
धुकं बनला पाऊस


मन इतकं आतुर
झाले विचार फितूर
धुकं धुकं नजरेला
पार क्षितिजापातूर


अशा पावसाचे गडी
वृक्ष लतावल्ली झाडी
त्यांच्या पानात लपून
चाले पावसाची खोडी


झरे धुकं पानावर
थेंब दाटुनिया आले
त्याचे आतुरले स्पर्श
दबा धरून बसले


सखा वारा खोडसाळ
बघा आला मदतीला
ओल्या थेंबांच्या मिठीत
घेई पाऊस धरेला


तिज स्पर्शता पाऊस
लव हिरवी शहारे
तेव्हा माना उंचावून
वृक्ष देतीया पहारे


फुले रानात पानात
छुपा मिलन सोहळा
तिचा तलम पदर
त्यात धुकं झालं गोळा


त्याची धुकधुक धुकं
धुकं चुंबन सोहळा
असा भामटा पाऊस
तरी किती गं सोवळा


असा भामटा पाऊस
तरी किती गं सोवळा
धुकं पाऊस पाऊस
धुकं सोवळा सोहळा..प्रचि श्रेयनिर्देश: यशोधरा

श्रीगणेश लेखमाला २०१९

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

4 Sep 2019 - 7:42 am | यशोधरा

क्या बात! सुरेख कविता!

धनावडे's picture

4 Sep 2019 - 8:40 am | धनावडे

सुंदर

ज्ञानोबाचे पैजार's picture

4 Sep 2019 - 8:50 am | ज्ञानोबाचे पैजार

आवडली
पैजारबुवा,

सुधीर कांदळकर's picture

4 Sep 2019 - 9:06 am | सुधीर कांदळकर

धुक्यात लपेटलेली, धुंद, छुपी रुस्तम कविता आवडली.

जालिम लोशन's picture

4 Sep 2019 - 9:12 am | जालिम लोशन

सुरेख

कुमार१'s picture

4 Sep 2019 - 11:02 am | कुमार१

सुरेख कविता!

शैलेन्द्र's picture

4 Sep 2019 - 11:57 am | शैलेन्द्र

वा, सुंदर कविता

राघव's picture

4 Sep 2019 - 12:12 pm | राघव

आवडली! :-)

पद्मावति's picture

4 Sep 2019 - 1:05 pm | पद्मावति

आहा..सुरेखच!

अलकनंदा's picture

4 Sep 2019 - 3:33 pm | अलकनंदा

वा! वा!

जव्हेरगंज's picture

7 Sep 2019 - 3:31 pm | जव्हेरगंज
श्वेता२४'s picture

7 Sep 2019 - 3:43 pm | श्वेता२४

खूप छान व ओघवती कविता...........वाचता वाचता मन धुक्यात गंतून गेलं.......