Skip to main content

सोहळा

लेखक Satyajit_m यांनी बुधवार, 04/09/2019 06:00 या दिवशी प्रकाशित केले.

सोहळा


प्रत्येक पावसात एक गोष्ट लपलेली असते, ती कधी तरी अशीही दिसते...


जपे स्पर्शाचं पावित्र्य असा सोवळा पाऊस बांध आतुर थेंबांना धुकं बनला पाऊस
मन इतकं आतुर झाले विचार फितूर धुकं धुकं नजरेला पार क्षितिजापातूर
अशा पावसाचे गडी वृक्ष लतावल्ली झाडी त्यांच्या पानात लपून चाले पावसाची खोडी
झरे धुकं पानावर थेंब दाटुनिया आले त्याचे आतुरले स्पर्श दबा धरून बसले
सखा वारा खोडसाळ बघा आला मदतीला ओल्या थेंबांच्या मिठीत घेई पाऊस धरेला
तिज स्पर्शता पाऊस लव हिरवी शहारे तेव्हा माना उंचावून वृक्ष देतीया पहारे
फुले रानात पानात छुपा मिलन सोहळा तिचा तलम पदर त्यात धुकं झालं गोळा
त्याची धुकधुक धुकं धुकं चुंबन सोहळा असा भामटा पाऊस तरी किती गं सोवळा
असा भामटा पाऊस तरी किती गं सोवळा धुकं पाऊस पाऊस धुकं सोवळा सोहळा..



प्रचि श्रेयनिर्देश: यशोधरा


वाचने 15650
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

आवडली पैजारबुवा,

धुक्यात लपेटलेली, धुंद, छुपी रुस्तम कविता आवडली.

सुरेख कविता!

खूप छान व ओघवती कविता...........वाचता वाचता मन धुक्यात गंतून गेलं.......