श्रीगणेश लेखमाला २०१९ - झलक दुसरी!

Primary tabs

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in लेखमाला
8 Aug 2019 - 11:01 am

लहानपणी खेळताना नाही का, आधी सुरू असलेल्या खेळात कोण्या नवीन भिडूची येंट्री होणार असली की अगोदर राज्य असणारा भिडू लगेचच 'नवा गडी, नवं राज्य' ही घोषणा करून मोकळा व्हायचा! नवीन आलेल्या भिडूने राज्य घ्यायचं आणि खेळ पुढे सुरू व्हायचा.

अगदी तस्संच, आम्हीसुद्धा म्हणतोय - "नवा आठवडा, नवी झलक!"

ह्या वेळच्या श्रीगणेश लेखमालेसाठी आपण कोणत्या विषयाचं बंधन ठेवलं नव्हतं. एकाच विषयाशी बांधून न घातल्यामुळे वेगवेगळ्या विषयांवरचे लेख आलेत. श्रावणात एखादं इंद्रधनू फुलल्यागत जणू. त्याचीच ही आणखी एक किंचितशी झलक.

बघा बरं, ह्या वेळेस जमतंय का ओळखायला कोणाच्या लेखणीमधून उतरलंय हे लिखाण.. जमलं का, जमलं? शाब्बास!

काय म्हणता, नाही जमलं? अर्र! आता मिपाच्याच भाषेत सांगायचं झालं ना, तर मंडळी, थोsssडा अभ्यास वाढवा!

lord-ganesha-6329-3

१.

आताशी घरोघरी, मंडपात बाप्पा विराजमान झाले असतील. पाकगृहात आया-बायकांची लगबग चालू असेल. यजमान बाप्ये मंडळी आरतीच्या तयारीला लागली असतील. तीर्थप्रसाद वाटण्यासाठी पोराटोरांची लुडबुड चालू असेल. एव्हाना उकडीच्या मोदकांचा घमघमाट तुमच्याही नाकापर्यंत पोहोचलाच असेल आणि तो आता येते दहा दिवस येतच राहील. बाप्पांची तर चंगळ आहेच, पर्यायाने आपलीही.

२.

आमच्या गावी अंदाजे पन्नास वर्षांपूर्वी डोंगरावरून खाली येऊन रानडुकरे शेतात गोंधळ घालायची आणि हाताशी आलेले पीक ओरबाडायची. भात कापणीला आला की या डुकरांचा बंदोबस्त करावाच लागे. त्या काळात गावात बऱ्याच जणांकडे बंदुकी असायच्या. आमच्याही घरी एक सोडून तीन बंदुकी होत्या. इराच्या मावशीच्या नवऱ्याची एक व त्यांच्या भावाची एक व मुलाची एक. दोन जुनाट आणि एक नवीन कोरी. इरावतीच्या मावशीचा नवरा मिलिटरीतून निवृत्त होऊन गावी स्थायिक झाला होता. शिवाय तालुक्याच्या गावी दुकाने आणि दोन डोंगरामध्ये शेतीवाडी होती. भलेमोठे घर होते तेही एका ख्रिश्चन पाद्र्याकडून विकत घेतलेले.

३.

मग काठावरच्या घनदाट सावलीच्या वत्सल चिंचेखाली, सळसळत्या बाळसेदार पिंपळाखाली,
विसावत गातात,
हरपल्या सुखाची गाणी गवसल्या वेदनांच्या स्वरांत.
झाडांवर क्षणभर थबकून फिरून गगनभरारी घेणारी लडिवाळ पाखरं मिळवतात आपले भारलेले स्वर या गाण्यांत,
अन्
त्या स्वरांनी जादूची कांडी फिरावी, तसे
हिरव्यागार पानजाळीतून झिरपणारे काही निरागस कवडसे,
नाचतनाचत उतरतात लक्तरांवर.

मिपा श्रीगणेश लेखमाला २०१९

प्रतिक्रिया

जालिम लोशन's picture

8 Aug 2019 - 1:17 pm | जालिम लोशन

नाही ओळखता येत. 2नं. मुवि असेल .

महासंग्राम's picture

8 Aug 2019 - 1:41 pm | महासंग्राम

मला पण मुविच वाटतात

मुद्रितशोधन न करता टाकले असते तर ताबडतोब ओळखू आले असते हो.. ;-)

कृ ह घे.

sameerzero's picture

8 Aug 2019 - 4:13 pm | sameerzero

रमणीय

ज्ञानोबाचे पैजार's picture

8 Aug 2019 - 4:28 pm | ज्ञानोबाचे पैजार

महाबळेश्वरला मॅप्रोच्या फॅक्टरी आउटलेट मधे असेच सरबताचे सँपल देतात आणि बाटली विकत घ्यायला भाग पाडतात.
संमं पण गणेश लेखमालेचे मार्केटींग पण अशाच पध्दतीने करत आहे
पैजारबुवा,

यशोधरा's picture

8 Aug 2019 - 4:46 pm | यशोधरा

काय उपमा आहे!! =))

२. जयंत कुलकर्णी साहेबांचे वाटत आहे.
अर्थात अंदाज बरोबर असला काय आणि नसला काय, पण ह्या वेळी श्री गणेश लेख मालेत विविध विषयांवरचे उत्तम लेखन वाचायला मिळणार हे नक्की!

नावातकायआहे's picture

9 Aug 2019 - 12:22 pm | नावातकायआहे

+१

पद्मावति's picture

9 Aug 2019 - 4:34 pm | पद्मावति

ट्रेलर इतके छान आहे चित्रपट जबरदस्तच असणार :) श्री गणेश लेखमालेची वाट बघतेय

तमराज किल्विष's picture

9 Aug 2019 - 2:10 pm | तमराज किल्विष

वाट पाहतोय. ही एक मेजवानीच असणार आहे.

हरवलेला's picture

14 Aug 2019 - 8:02 am | हरवलेला

३. शिवकन्या