गणेश लेखमालिका २०१९ - झलक पहिली!

Primary tabs

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in लेखमाला
1 Aug 2019 - 9:35 am

बाप्पा यायला उणापुरा एक महिना राहिलाय मंडळी. बाप्पा आल्यावर जे उत्साहाचं वातावरण असतं, त्याची भूल सगळ्यांनाच पडते. गणपतीच्या आगमनाने सगळीकडे आनंद, मांगल्य, उत्साह भरून ओसंडून वाहतो. अगदी 'नभात भरला, दिशांत फिरला, जगात उरला, मोद विहरतो चोहीकडे...' असं उत्साहाचं वातावरण भारून राहिलेलं असतं! पाहुणाच असा गोजिरवाणा असतो!

हळूहळू मिपावरसुद्धा गणपती उत्सवाचा माहौल रंग भरायला लागेल. आपली गणेश लेखमालिका तयार होतेच आहे, सांस्कृतिक, वैचारिक, मनोरंजक इत्यादी प्रकारचे लेख वाचायचे आहेतच, कवितांचा आनंद घ्यायचा आहे, पण तोवर जरा एक छोटासा खेळ खेळू या का मंडळी?

मिपावर उत्तम लिहिणारे, लेखनाला प्रतिसाद घेणारे एक से एक मिपाकर आहेत. त्यातल्या काही मिपाकरांच्या कला साहित्याने ह्या वर्षीची गणेश लेखमाला सजणार आहे. तुम्ही वाचायला उत्सुक असणारच.

पण काय हो,

वाट बघणार का नुसतंच?
काम करा त्यापेक्षा भारी!
घ्या नाव आपल्या बाप्पाचं,
अन् सोडवा ही कोडी सारी!

आम्ही घेऊन आलोय लेखमालिकेतील लेख-कवितांची पहिली झलक. बघा बरं, कोणी लिहिलंय ते तुम्हाला ओळखता येतंय का!

20190731-103339

१.

प्रगतीसाठी माणसाच्या जीवनोद्दिष्टांनाच व आत्मसंयमनाला अनन्यसाधारण महत्त्व दिले गेले पाहिजे, असे आग्रहाने प्रतिपादन केले. केवळ आणि केवळ विवेकाच्या साहाय्यानेच माणूस स्वत:चे, स्वत:च्या आचारांचे नियंत्रण करू शकतो. आचरणातील चूक ही मुळात बौद्घिक आकलनातील चूक असते, असे त्याने निक्षून सांगितले.

त्याची ज्ञानदानाची पद्धतसुद्धा मजेदार होती. प्रश्न विचारत विचारत तो पुढे जाई व त्या प्रश्नांची उत्तरे लोकांना द्यायला तो भाग पाडत असे. त्याने या प्रश्नांची सहा प्रकारांत विभागणी केली होती. वैचारिक स्पष्टता येण्यासाठीचे प्रश्न, माहितीची खातरी करून घेण्यासाठीचे प्रश्न, मुद्दा पडताळून पाहण्याचे प्रश्न, वेगवेगळ्या शक्यता तपासून पाहण्याचे प्रश्न, निर्णय तपासून पाहण्याचे प्रश्न आणि शेवटी प्रश्नामुळे पडणार प्रश्न. अशा प्रश्नांमुळे अनेकदा लोकांना सुरुवातीला त्याचा राग येत असे. परंतु नंतर त्यांना त्याचा फायदाही दिसून येई. 

२.

या सर्वांमध्ये मात्र पालीचा बराचसा शैक्षणिक वेळ गेलेला होता व तिला परत आजारी करण्यासाठी शाळेत पाठवण्यास तिच्या वडिलांचा विरोध कायम होता. या विरोधासमोर आजारी पालीस नमते घ्यावे लागले आणि म्हणूनच तिला तिच्या ९व्या वर्गाच्या शिक्षणावरच समाधान मानावे लागले. आज तिच्या वडिलांना शिक्षणाचे महत्त्व पटल्याने तिची दोन धाकटी भावंडे पुणे व नागपूर येथे आपले शिक्षण पूर्ण करीत आहेत. आणि म्हणूनच पालीच्या वडिलांनी तिला आरोग्य सेविकेचे काम करण्यास अजिबात विरोध केला नाही, उलट तिला पूर्ण सहकार्य करण्यास संमती दर्शवली.

घरच्यांच्या सहकार्याने व स्वजिद्दीमुळे सुरुवातीला पाली २०१०पासून पेनगुंडासहित एकूण ८ गावांमध्ये (पेनगुंडा, कुचेर, परायनार, महाकापाडी, गोंगवाडा, नेलगुंडा, घोटपाडी, बोडांगे) ० ते ६ वर्षे वयोगटातील बालकांचे व गरोदर मातेचे वजन करणे, बी.पी. घेणे व त्यांना रुग्णालयीन प्रसूतीकरिता प्रवृत्त करणे ही कामे नियमितपणे करत होती

३.

गेल्या वर्षभरात मा. अथर्व याच्या माध्यमातून आपण आमच्याकडे पाठवलेल्या प्रदीर्घ प्रकल्पयादीकडे पाहता आपल्या मनात आमची एक अत्यंत चुकीची प्रतिमा अस्तित्वात आहे, हे मी आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो.

मा. मॅडम, मी रसायनशास्त्र विषयात पदवीधर असून एका खाजगी व्यवस्थापनात रसायनशास्त्राशी दूरान्वयानेही संबंध नसलेले काम करतो. आपल्याला जे येत नाही ते करण्याचे कौशल्य उपजीविकेपुरते मी कमावले आहे. परंतु मी शिल्पकार, चित्रकार, लोहार, कुंभार, शिंपी, ज्ञानकोशकार, बल्लवाचार्य या सर्वांची कौशल्ये एकाच वेळी या देही बाळगून असावे अशी अपेक्षा मजकडून करणे योग्य नाही, हे मी नम्रपणे नोंदवू इच्छितो.

मिपा श्रीगणेश लेखमाला २०१९

प्रतिक्रिया

ज्ञानोबाचे पैजार's picture

1 Aug 2019 - 10:03 am | ज्ञानोबाचे पैजार

झी टीव्हीवर "आग्गबाई सासु बाई", "अल्टी पल्टी" "युवा सिंगर" इत्यादी मालिकांचे प्रोमो चालू आहेत.

त्या धर्तीवर मिपा ने बनवलेला श्री गणेश लेखमालेचा प्रोमो आवडला.

पैजारबुवा,

आमी वळीखलय एक. पण सांगणार नाय. ;)

किती वो दादा तुम्ही हुश्शार! =))

पद्मावति's picture

1 Aug 2019 - 11:47 am | पद्मावति

वाह, प्रमोशनची ही कल्पना मस्तं आहे :)

जॉनविक्क's picture

1 Aug 2019 - 12:03 pm | जॉनविक्क

प्रगतीसाठी माणसाच्या जीवनोद्दिष्टांनाच व आत्मसंयमनाला अनन्यसाधारण महत्त्व दिले

माहितगार ?

तुषार काळभोर's picture

1 Aug 2019 - 12:16 pm | तुषार काळभोर

मेरेकू यैच लगा!

राघव's picture

1 Aug 2019 - 6:24 pm | राघव

मलासुद्धा अगदी असंच वाटलं! :-)
पण यशोतै च्या खालच्या प्रतिसादावरून हे चूक आहे असं वाटतंय!

असा मी कायच म्हणाक नाय आसय हां!

पण इतके मिपाकर मिपावर इलेले दिसतत, इतक्या जणांन वाचलेला दिसता, पण एक विक्‍क बापडो सोडल्यान तर कोणीच कायच बोलूक नाय, म्हणून आपला म्हटला!

पैलवान भाऊंनी नुसता होय, होय केल्यानी. तू तर त्यातय तळ्यात मळ्यात केलंस! =))

राघव's picture

1 Aug 2019 - 6:50 pm | राघव

हा हा हा...

बादवे, मी अगदी प्रांजळ मत व्यक्त केलंय.. बाकी दोन मात्र माझा मिपावरचा वावर फार्फार कमी आहे असं दर्शवतोय! ;-)

यशोधरा's picture

1 Aug 2019 - 5:31 pm | यशोधरा

नाय वलीकला काय कोनी?

तुषार काळभोर's picture

1 Aug 2019 - 6:09 pm | तुषार काळभोर

.

इतकं जड गद्य लिहिणारा मिपाकर कोण?

सुधीर कांदळकर's picture

2 Aug 2019 - 7:31 am | सुधीर कांदळकर

अरविंद कोल्हटकरांसारखे लिखाण वाटते आहे. अर्थातच माझे चूक असू शकते. इतर दोन ओळखू येत नाहीत.

चौथा कोनाडा's picture

2 Aug 2019 - 8:54 am | चौथा कोनाडा

भारी प्रोमो ! कल्पना आवडली.


बघा बरं, कोणी लिहिलंय ते तुम्हाला ओळखता येतंय का!

ह्ये ओळखू आलं नाही नाही आलं, काही फरक पडत नाही !
मिपा म्हणजे १२३.४५ % क्लासिक !
मिपाचे भन्नाट लेखक आणि दर्दी वाचक कल्ला करतीलच.

संजय पाटिल's picture

2 Aug 2019 - 10:24 am | संजय पाटिल

कुठेतरी वाचल्या सारखं वाटतय....

नाखु's picture

2 Aug 2019 - 3:18 pm | नाखु

आहे या जड भारदस्त लिखाणाबरोबर काही आणखी जव्हेरी लिखाण असलं तर अकु आणि राकु लेखातून सुटका झाल्याचा आनंद साजरा केला जाईल.

विनंती
बुवांनी या निमित्ताने भाव(लेले) विश्व पुढील पंचवीस भाग पाडले तर बरं होईल

अखिल मिपा भावविश्व चाहता संघ आणि मिपा शीघ्रकवी संघाच्या संयुक्त विद्यमाने प्रकाशित बुवा एक क्रांतिकारी लेखक या पत्रकातून साभार.

जालिम लोशन's picture

2 Aug 2019 - 4:20 pm | जालिम लोशन

बरोबर

जालिम लोशन's picture

2 Aug 2019 - 4:23 pm | जालिम लोशन

चु.भु.द्या. घ्या.

माकडतोंड्या's picture

2 Aug 2019 - 4:27 pm | माकडतोंड्या

कवितेची झल क नाही दिसत !

जालिम लोशन's picture

2 Aug 2019 - 4:48 pm | जालिम लोशन

बरोबर?

अलकनंदा's picture

3 Aug 2019 - 10:26 pm | अलकनंदा

भारी झलक!