विळखा -३

सुबोध खरे's picture
सुबोध खरे in जनातलं, मनातलं
27 Jul 2019 - 1:32 pm

विळखा -३
शनिवारी या डॉक्टरांना भेटून घरी आलो. यानंतर मी माझ्या कर्करोग क्षेत्रात काम करणाऱ्या मित्रांशी बरीच चर्चा केली. तेंव्हा एक गोष्ट माझ्या ध्यानात आली ती म्हणजे आईची शल्यक्रिया करायची आहे. ते प्रकरण वाटते तेवढे सोपे नाही. कारण केवळ मानेतच नव्हे तर हा रोग छातीत पण पसरला आहे. एकंदर हा तिसऱ्या स्टेजला आहे हे मला सुरुवातीलाच समजलेले होते. पण हि शल्यक्रिया दोन टप्प्यात करावी लागणार होती पहिल्यांदा मानेच्या त्वचेला छेद दिल्यानंतर त्यातून दुर्बीण टाकून ती छातीपर्यंत नेऊन छातीतील गाठी काढायला लागणार होत्या आणि यानंतर मानेतील गोळा आणि गाठी काढायला लागणार होत्या म्हणजे शल्यचिकित्सकांच्या दोन तुकड्या एका मागोमाग एक अशा काम करणार होत्या.
मग अशी गुंतागुंतीची शल्यक्रिया करणारी रुग्णालये मुंबईत हातच्या बोटावर मोजण्यात आहेत. यापैकी वडिलांनी टाटाची पसंती दिली होती. टाटाचा एक फार मोठा प्रश्न म्हणजे तेथे असलेली प्रचंड गर्दी. असे असूनही मी विचार केला कि टाटाच्या डॉक्टरना दाखवून त्यांचा सल्ला तर घेऊन मग शल्यक्रिया कुठे करायची ते ठरवू.

आमच्या घरी एक गोष्ट आहे वैद्यकीय बाबतीत मी जे म्हणेन तीच पूर्व असे घरचे सगळे मान्य करतात. शिवाय मी दुसऱ्या दिवसापासून हा कर्करोगाचं आहे आणि याला शल्यक्रिया लागणार आहे याची आई, वडील, माझा मोठा भाऊ आणि वहिनी( दोघेही इंजिनियर असल्याने त्यांना यात फारसा कळत नाही हे त्यांनी मान्य केलेलं आहे) याना स्पष्ट कल्पना दिलेली होती. त्यामुळे तू काय म्हणशील तसं असे सर्वाधिकार आणि पूर्ण विश्वास माझ्यावर टाकलेला होता.

त्यानुसार टाटा रुग्णालयात सोमवारी सकाळी जायचे असे ठरवलेले होते.

अर्थात माझा रविवार काही सुखाचा गेला नाही. ANAPLASTIC CARCINOMA OF THYROID (ATC) हा फार लवकर वाढतो आणि पसरतो याची मला कल्पना होती. शिवाय त्याच्या गुंतागुंती काय असतात तेही मला चांगलाच माहिती होतं. हा जर अन्न नलिकेत शिरला तर रुग्णाला अन्नच काय पण थुंकी पण गिळणे कठीण होऊन बसते. त्यामुळे सुरुवातीला नाकातून नळी घालून अन्न द्यावे लागते. पण सारखे सारखे थुंकी थुकायला लागते कारण नळीतून थुंकी खाली जाऊ शकत नाही.
आणि हा रोग जर श्वासनलिकेत शिरला तर रुग्णाला श्वास घेणे कठीण होते अशा परिस्थितीत श्वसनलिकेला स्वरयंत्राच्या खाली भोक पाडावे लागते
(TRACHEOSTOMY). बरेच वेळेस हि शल्यक्रिया असा श्वास लागण्याच्या अगोदर करावी लागते.

शिवाय केमोथेरपी द्यावी लागते त्याचे रुग्णाला फार त्रास होतो. केस जाणे, हगवण लागणे, तोंड येणे असे असंख्य त्रास होतात.
रेडिएशन द्यावे लागले तर त्याने त्वचा पण थोड्या फार प्रमाणात भाजली जाते. ज्याच्यामुळे रुग्णाला फार आग आणि जळजळ होते.

अशा एक ना दोन अनेक गुंतागुंती डोक्यात येत होत्या आणि त्याचा प्रतिकार कसा करायचा याचा पण विचार चालू होता.

बरेच लोक विचारतात कि एवढा त्रास जर होतो तर हे उपचार का करायचे?

याच गणित साधे सरळ असते. जर या उपचारांशिवाय रुग्ण तीन महिन्यात दगावणार असेल आणि उपचारामुळे एक वर्ष तर या उपचारांच्या त्रासाचे ३ महिने एक वर्षातून वजा केले तर रुग्णाला सहा महिने अधिक आयुष्य ते सुद्धा चांगल्या दर्जाचे मिळू शकते. हि स्थिती अतिशय आक्रमक कर्करोगाबद्दल आहे.

या उलट स्तन किंवा मोठे आतडे इ च्या कर्करोगात हे तीन महिने त्रासाचे वजा केले तर रुग्णाला ६-७ वर्षांपासून पूर्ण बरे होण्यापर्यंत कितीही फायदा होऊ शकतो.

आता काय करायचे आहे याबद्दल चा आराखडा माझ्या मनात तयार झाला होता. सोमवारी सकाळी आईला घेऊन टाटा रुग्णालयात गेलो आणि सकाळी रजिस्ट्रेशनचे सोपस्कार पुरे करून डॉ पै यांच्या बाह्य रुग्ण विभागात असलेल्या भरपूर गर्दीत सामील झालो.

तेंव्हा पॅथॉलॉजिस्ट कडून फोन आला कि सर, तुमच्या आईच्या बायोप्सी मध्ये TTF १ (Thyroid transcription factor-1) आणि CEA (Carcinoembryonic antigen) पॉसिटीव्ह आलं आहे आणि त्यात CALCITONIN रिसेप्टर पण दिसत आहेत. हा प्राथमिक अंदाज आहे आणि मला बाकी चाचण्या पूर्ण करायच्या आहेत.
माझ्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. अर्धी लढाई जिंकली होती. याचा अर्थ हा ANAPLASTIC CARCINOMA OF THYROID (ATC) असण्याची शक्यता बरीच कमी होती आणि MEDULLARY CARCINOMA OF THYROID (MTC) असण्याची शक्यता जास्त होती.

मी त्यांच्याशी चर्चा केली आणि CALCITONIN आणि CEA (Carcinoembryonic antigen) याची रक्ताची चाचणी करायची ठरवली.

ताबडतोब खिशातला भ्रमणध्वनी काढला आणि गुगलून पाहायला सुरुवात केली. माझा अंदाज होता कि MTC मध्ये तुम्हाला ५ वर्षे तरी मिळतात. पण मी जसे वाचत गेलो तसे लक्षात आले कि या रोगात चांगली शल्यक्रिया झाली तर ७५ % रुग्ण १० वर्षे पर्यंत जगतात. आणि या कर्करोगात बहुतांश रुग्णांना केमोथरपी आणि रेडिएशन लागतच नाही.

कुठे ६ महिने ते एक वर्ष आणि कुठे १० वर्षे.

७७ व्या वर्षी १० वर्षे मिळणे हे खूप छान आहे
पण तेच ५७ व्या वर्षी १० वर्षे फार नाहीत
आणि ३७ व्या वर्षी १० वर्षे फारच कमी असतात.

पण १ वर्ष तीसुद्धा फार कष्टाने याउलट १० वर्षे सुखाने ती सुद्धा केमोथरपी आणि रेडिएशन शिवाय

मला काळोखातून तांबडं फुटल्याचा भास झाला.

क्रमशः

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

कंजूस's picture

27 Jul 2019 - 2:05 pm | कंजूस

मार्ग निघत आहेत.

जॉनविक्क's picture

27 Jul 2019 - 2:17 pm | जॉनविक्क

उगा काहितरीच's picture

27 Jul 2019 - 4:54 pm | उगा काहितरीच

डॉक्टर साहेब,

प्रत्येक भाग वाचतो आहे.

प्रमोद देर्देकर's picture

27 Jul 2019 - 5:44 pm | प्रमोद देर्देकर

वा डॉ. खूप चांगलं घडतंय.
एक विनंती तुम्ही या सगळया जबाबदारीतूनही वेळ काढून लिहता आहात तर जर वेळ नसेल, घाई होतं असेल तर फक्त खफवर थोडक्यात लिहा आणि मग शस्त्रक्रिया झाल्यावर सविस्तर लिहा.

आईंना शुभेछा !

सुधीर कांदळकर's picture

27 Jul 2019 - 6:33 pm | सुधीर कांदळकर

फार मोठी आहे. इथल्या लेखनामुळे आपल्या भावनांचा निचरा व्हायला मदत होत असावी. सोबत आमचे शिक्षण.

धन्यवाद, पुभाप्र.

आपल्या भावनांचा निचरा व्हायला

नाही हि लेखमाला माझ्या भावनांचा निचरा होण्यासाठी लिहीत नाही.

त्याची सुदैवाने मला गरज नाही.मला कुटुंबाचा भक्कम आधार आहे नि आपल्या सारख्या अनेक हितचिंतकांच्या शुभेच्छा पाठीशी आहेत.

एखाद्या गंभीर प्रसंगाचे वेळेस आपली मनस्थिती किती खंबीर असू शकते याची "स्वतःसाठी चाचणी" आणि जमल्यास याचा कुणाला फायदा झाला तर.

म्हणूनच शल्यक्रिया होण्याच्या अगोदर मला हि लेखमाला लिहायची होती.

अशीच स्थिती जेंव्हा सरकारने माझ्या बाजूने दिलेल्या उच्च न्यायालयाच्या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते तेंव्हा होती. तेंव्हा सुद्धा मी शांत पणे पुढे तीन वर्षे झुंज दिली होती.

मागे वळून पाहताना आपण खूप शहाणे असतो.

RETROSPECTIVELY ALL OF US ARE WISER

वाचतोय. आणखी काय बोलू? काहीसा दिलासा मिळाला.

आपल्या मातोश्री नक्की आणि लवकरच ठणठणीत बऱ्या होतील...

पप्पु अंकल's picture

27 Jul 2019 - 8:37 pm | पप्पु अंकल

सलाम..शेवटच्या पाच ओळित जे लिहलय ...अगदी हाच निर्णय माझ्या एका डॉक्टर मित्राने घेतला होता याच परिस्थितीत. मी एका मेडिकल कॉलेज मध्ये आर्टिस्ट आहे व नुकताच pre xdr Tb मधून बरा होऊन बाहेर पडलोय . आजारपणात सर्वात मोठा आधार मिळाला तो आपल्या लेखांचा व अर्थात मिपा व अनेक मान्यवर लेखकांच्या लिखाणाचा . एक धागा काढून सविस्तर लिहीनच . पण इतकी वर्षे वाचनमात्र होतो , प्रतिसाद पण निवडक दिले आपले लिखाण वाचून लिहावंसं वाटतंय बघू... आपल्या मातोश्रीना आराम पडावा हीच इच्छा

सुबोध खरे's picture

30 Jul 2019 - 11:13 am | सुबोध खरे

नुकताच pre xdr Tb मधून बरा होऊन बाहेर पडलोय.

उत्तम

आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

हा रोग परत येऊ नये म्हणून व्यायाम, पथ्यपाणी आणि सकस आहार हि त्रिसूत्री आयुष्यभर चालू ठेवा.

औषधापेक्षा तुमची प्रतिकार शक्ती जास्त महत्त्वाची आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Jul 2019 - 9:16 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर लिहिता आहात.

या लेखनाने तुमच्या मनावरचा ताण जितका कमी होत असेल (कॅथार्सिस) त्यापेक्षा कितीतरी जास्त पटींनी मिपाकरांचे शंकानिरसन आणि शिक्षण होत आहे.

या सर्व प्रवासात सगळे मिपाकर तुमच्याबरोबर शुभेछांसह आहेत, याबाबत शंका नाही. शेवटचा लेख सुखांतकच असेल, ही शुभेछा आणि तीव्र इच्छा आहे.

डॉ. साहेब तुमचे हे तिन्ही लेख एका पाठोपाठ वाचले.
तुमच्या धैर्याला सलाम. तुमच्या मातोश्री लवकर बऱ्या व्हाव्यात हि सदिच्छा.

नाखु's picture

28 Jul 2019 - 12:30 pm | नाखु

वाचत आहे, तुम्ही सैनिक शिस्त आणि लढाऊ बाणा व्यक्तिगत आयुष्यात तंतोतंत पालन केले तर काय होऊ शकतं याचा वस्तुपाठ घालून दिला आहे

सलाम

तिसरा भाग वाचल्यावर हायसं वाटतंय प्रतिसाद लिहायला!
डाॅ प्रथमेश पै यांच्याकडे पाठवलेल्या रुग्णांचा अतिशय चांगला अनुभव आहे. तुम्हालाही येईलच.

टर्मीनेटर's picture

28 Jul 2019 - 1:23 pm | टर्मीनेटर

वाचतोय...

लई भारी's picture

29 Jul 2019 - 10:38 am | लई भारी

आपल्या मातोश्रींना लवकर बरे वाटो आणि वेदनारहित उपचार होवोत ही सदिच्छा.

नि३सोलपुरकर's picture

29 Jul 2019 - 11:49 am | नि३सोलपुरकर

तुमच्या मातोश्री लवकर बऱ्या व्हाव्यात हि सदिच्छा.
__/\__.

श्वेता२४'s picture

29 Jul 2019 - 11:52 am | श्वेता२४

पण १ वर्ष तीसुद्धा फार कष्टाने याउलट १० वर्षे सुखाने ती सुद्धा केमोथरपी आणि रेडिएशन शिवाय

मला काळोखातून तांबडं फुटल्याचा भास झाला.
हे वाचून हायसं वाटलं.

समीरसूर's picture

29 Jul 2019 - 11:53 am | समीरसूर

मनाला भिडणारे लेखन! डॉ. साहेब सिद्धहस्त लेखक आहेतच. त्यांच्या मातोश्रींना लवकरात लवकर बरे वाटो ही प्रार्थना!

तुमच्या धीरोदात्तपणाचे आणि अनुभव आणि ज्ञान वापरून पटापट निर्णय घेण्याचे कौशल्य वादातीत आहे. अशा संकटातून जात असतांना मनाची काय घालमेल होत असेल याची कल्पनादेखील करवत नाही. आपणांस आणि आपल्या आईस खूप शुभेच्छा!!

आवडाबाई's picture

29 Jul 2019 - 1:46 pm | आवडाबाई

आशेचा किरण दिसल्यासारखा वाटला.
निदान कळणारी सर्वात पहिली व्यक्ती स्वतः असणे काय असेल ह्याचा विचार देखिल करवत नाही. तुमचा "निर्विकार" चेहराच आईने वाचला असण्याची शक्यता खूप आहे.

माझ्या आईच्या बाबतीत ह्या आजाराचा अनुभव घेतला आहे. (सुदैवाने रेमिशनमधे आहे.) ही पिढीचा पिंडच काहीतरी वेगळा आहे का? प्रचंड धिराने घेतले माझ्याही आईने. तिला तिच्या आध्यात्मिक बैठकीचा देखिल खूप उपयोग झाला.

७७ व्या वर्षी थ्रो बॉल खेळतात म्हणजे (she is a rockstar) फिटनेस चांगला आहे, त्याचाही रिकव्हरी मधे खूप फायदा होतो
तुमच्या मातोश्रींना अनेक शुभेच्छा !!

(सध्या बिझी असाल तर निदान अपडेट्स देत रहा. अशा वेळी एक ओळी धागाही चालेल.)

टाटाला जाण्याचा निर्णय घेतलात हे योग्य केलेत. या इस्पितळाचा माझा अनुभव खूप चांगला आहे. तुमच्या मतोश्रींना लवकर अराम पडो. _/\_

खटपट्या's picture

29 Jul 2019 - 6:27 pm | खटपट्या

तिनहि भाग वाचुन काढले. काय बोलावे कळत नाही.
आई नक्की बर्‍या होतील...

माझीही शॅम्पेन's picture

29 Jul 2019 - 7:38 pm | माझीही शॅम्पेन

मातोश्रींना लवकरात लवकर बरे वाटो ही प्रार्थना!