विजय दिन

गुंडोपंत's picture
गुंडोपंत in काथ्याकूट
17 Dec 2007 - 6:05 am
गाभा: 

भारताने सोळा डिसेंबर १९७१ रोजी पाकिस्तान बरोबरील युद्धात विजय मिळवला होता.
हा दिवस विजय दिन म्हणून साजरा केला जातो. या युद्धात आपले प्राण पणाला लावून विजय खेचून आणणार्‍या सर्व सैनिकांना मिसळपावातर्फे मानाचा मुजरा.
हे युद्ध ३ डिसेंबर ला सुरु होवून १६ ला संपले.
बांग्लादेशातील नागरीकांना व बांगलामुक्ती वाहिनीला भारताने मदत करू नये यासाठी, याह्याखानाने हवाई दलाला आदेश देवून रॅ‍पीड ऍक्शन द्वारे भारताची कुरापत काढली व भारतीय हद्दीत ३५० किमी आग्र्या जवळ येवून भारतीय धावपट्यांवर बाँब टाकून त्या निकामी केल्या. अवघ्या काही तासांच्या अवधीत भारतीय लष्कराने त्या धावपट्ट्या पुर्ववत करून हवाई हल्ल्याची तयारी केली.

भारताला गुंतवून,ठेवण्यासाठी, त्याच वेळी पाकिस्तान ने पाकिस्तान सीमेवरही हल्लाबोल केले. याला चोख प्रत्युत्तर देत भारतीय सैन्याने पाकिस्तानचा १४०००(?) किमी प्रदेश ताब्यात घेतला. (हा प्रदेश १९७२ च्या शिमला करारात चक्क फुकटात परत केला गेला!). पुढे भारताने आपले डावपेच जास्त प्रखर करून समुद्र मार्गेही पाकिस्तानची नाकेबंदी केली. दोन पाकिस्तानी डिस्ट्रॉयर्स बुडवून, भारतीय नौदलाने कराची बंदरात पाकिस्तानला नामोहरम केले.

पाकिस्तानच्या बांग्लादेशातल्या हवाई विभागावर हवाई हल्ले करून पाकिस्तानी हवाई दल उध्वस्त केले गेले. अशा रीतीने भारताने एक बलशाली सत्ता व अभेद्य हवाईदल हा नावलौकीक स्थापन केला. पाकिस्तानने युद्धात शरणागती पत्करली व युद्ध थांबले.

या युद्धाआधी इंदिरा गांधींनी युरोप चा दौरा केला व ब्रिटन व फ्रांस यांच्या सहीत जागतिक मत भारताकडे वळवले. त्याच वेळी रशिया बरोबर करार करून दडपण आणून चीनलाही या युद्धापासून दूर ठेवण्यात यश मिळवले.

पाकिस्तानी सैन्याने या युद्धात बांगलादेशीयांवर अन्वनित अत्याचार कनित. याच्या अनेक कहाण्या प्रसिद्ध आहेत.
या ह्यायाखानाचे पुढे काय झाले? कुणी सांगु शकेल का?
या युद्धावर आधारीत असलेली मराठी पुस्तके, लेख कोणती याची यादी कुणी देईल का?

तसेच पाकिस्तान बरोबरच्या या युद्धात गाजलेले शौर्‍याचे प्रसंग तसेच उल्लेखनिय गोष्टी सदस्यांनी येथे द्याव्यात व या गौरवशाली आठवणी जागृत कराव्यात ही विनंती.

जय हिंद!

आपला
गुंडोपंत

(ही चर्चा व्यक्तिगत नसून देशभक्तीपर आहे. माननिय सदस्य, इतर चर्चा येथे घुसडल्या जाणार नाहीत, याचे भान ठेवतील ही अपेक्षा आहे)

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

17 Dec 2007 - 8:44 am | विसोबा खेचर

चांगला लेख, चांगला चर्चाप्रस्ताव!

भारतीय सैन्याला माझा दंडवत!

तात्या.

प्राजु's picture

17 Dec 2007 - 8:48 am | प्राजु

पंत हा प्रसंग गौरवशाली नसून गमतीदार आहे. पण १९७१ च्या युद्धा दरम्यानचा आहे.
मी १०वीला असताना ज्या सरांकडे ट्यूशनसाठी जात होते.. ते सर आर्मी मधून निवृत्त झाले होते. त्यांनी हा किस्सा सांगितला होता. गमतीदार किस्सा आहे. सांगू का? युद्धाशी याचा काहीही संबंध नाही.

-प्राजु.

गुंडोपंत's picture

17 Dec 2007 - 8:54 am | गुंडोपंत

चालेल सांगा ना...
७१ च्या युद्धाशी संबंधीत आहे ना... मग झाले तर!

आपला
गुंडोपंत

प्राजु's picture

17 Dec 2007 - 9:15 am | प्राजु

तिथे म्हणे.. जिथे सरांच्या बटालियनचे बंकर होते.. त्या बाजूला एक गाव होते सीमेवरचे.
तिथे प्रातर्विधी साठी जिथे जात, तिथे एक मोठा रेडा येत असे.
एकदा आमचे सर त्या जागी भल्या पहाटे गेले... तर त्याना पाहून तो रेडा पळत पळत तिथे आला. सरांना याची कल्पना नव्हती. ते घाबरले. पण त्यांच्या सोबत असलेल्या त्यांच्या एका मित्राने सांगितले की.. हा रेडा सिगारेट फुंकण्यासाठी येतो. कारण तिथे राहणा-या बाकीच्या जवानांनी त्याला ती सवय लावली होती.
आमचे सर धुम्रपान करत नसत त्यामुळे त्यांना काय करावे हा प्रश्न पडला. मग नंतर त्यांनी रोज सकाळी त्या जागी जाताना एक सिगारेट खास रेड्यासाठी घेऊन जाणे सुरू केले.
- प्राजु.

सुनील's picture

17 Dec 2007 - 8:34 pm | सुनील

हा रेडा सिगारेट फुंकण्यासाठी येतो

वेद म्हणू शकणारा रेडा आम्हाला ठाऊक होता. आता हा सिगारेट फुंकणारा रेडा!!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

स्वाती दिनेश's picture

17 Dec 2007 - 12:52 pm | स्वाती दिनेश

"१६ डिसेंबर" याच नावाने ७१च्या युध्दाची पार्श्वभूमी घेऊन काढलेला चित्रपट आहे,डॅनी डेंग्जॉप्पा आणि गुलशन ग्रोवर दोघांची कामे छान झाली आहेत.(मुख्य म्हणजे अजिबात लाऊड नाहीत.)
स्वाती

विसोबा खेचर's picture

17 Dec 2007 - 1:02 pm | विसोबा खेचर

म्हणतो!

त्यात सोमणांचा मिलिंदाही आहे.

आपला,
तात्या डेंग्जॉप्पा.

संजय अभ्यंकर's picture

17 Dec 2007 - 8:03 pm | संजय अभ्यंकर

माझे काका १ डिसेंबर १९७१ ला (युद्ध सुरू व्हायच्या दोन दिवस आधी) लद्दाख सीमेवरुन बेपत्ता झाले. ते भूदलात सिग्नलमन होते.
कधीही पूजा न करणारे काका, त्या दिवशी पूजा करायची म्हणून फुले आणावयास चीनी सीमेच्या दिशेने गेले ते आजतागायत परतले नाहीत. भूदलाच्या अन्दाजाप्रमाणे, चुकून ते सीमापार जाऊन, चीनी सैन्याच्या गोळिबारास बळिपडले असावेत.

गुन्डोपंतानी आज त्यान्ची आठवण जागी केली.

संजय अभ्यंकर.

सोळा डिसेंबर १९७१ ला भारताने बांग्लादेशाला स्वातंत्र्य मिळवून दिले पण हाच बांग्लादेशाने पुढे भारताला आंतरराष्ट्रीय पातळीवर एका महत्वाच्या गोष्टीत तोंडघाशी पाडले ....

अहो , "२००७ च्या क्रिकेट विश्वचषकात" बांग्लादेशाने आपल्याला हरवले व आपल्याला या स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागला. अप्रत्यक्ष पणे हा दिवस भारताच्या या स्पर्धेतील अपयशाला कारळिभूत होता असेच म्हणावे लागेल ...... [असो, सहज आठवले म्हणून हा पत्रप्रपंच ]

क्रिकेटप्रेमी [ छोटा डॉन ]

गुंडोपंत's picture

18 Dec 2007 - 6:36 am | गुंडोपंत

छोट्या डोना,
कशाशी काय तोलतो आहेस रे बाबा तू?
क्रिकेट मध्ये हरणे ही काही युद्धात जिंकण्या हरण्याशी तुलना करण्याची गोष्ट नाही!
इथे मृत्यु असतो खरा-खुरा, आऊट झालो, म्हणून दुसरा खेळ नाही खेळता येत!
किंवा लढतांना शत्रुच्या हाती पडलो, तर काय हाल असतात ते कधी वाचलेही नसावेस तू कधी.

अजूनही पाकिस्तान ने काही आपले कैद केलेले सैनिक परत दिले नाहीयेत... अरे काय हाल असतील त्या कुटुंबांचे? नि आपल्या संजय अभ्यंकरांनी दिलेल्या आठवणीच्या अंतरंगात डोकावून पाहा, म्हणजे तुला युद्धाच्या जखमा कशा असतात त्या दिसतील!

तुला जर युद्धाची धग आयुष्यात जाणवली नसेल, तर किमानपक्षी आपल्या बाघा बॉर्डरवर अतिशय सुरक्षित वातावरणात का होईना, पण जावून पाहा. नुसता ध्वजालाही किती आहे ते.
झेपत असेल तर लाहौल स्पिती किंवा लेह-लद्दाख चा एक ट्रेक तर करून दाखव! तेथे जावून सहा महिने ठिय्या देवून, बर्फाळ थंडीत, साधने नसतांना प्रतिकूल परिस्थितीत लढणे तर सोडूनच दे.

जरा कोचावरून उठून दिसणार्‍या टीव्ही च्या चष्म्यातून बाहेर येवून पाहा... जग काही इतके गुळगुळीत नि चकचकीत नाहीये! आणि तुला वाटत असले तरी, क्रिकेटमय तर नक्कीच नाहिये.

आपला
व्यथीत
गुंडोपंत

नकळतपणे घडलेल्या चुकीबद्दल माफी मागत आहे. माझा हेतू फक्त आणि फक्त विनोदच होता .....
चर्चा मलाही पुढे वाढवायची नाही म्हणून हे ऊत्तर ..... असो

जर विनोदाच्या नजरेने पाहिल्यास हा गैरसमज झाला नसता.

"अजूनही पाकिस्तान ने काही आपले कैद केलेले सैनिक परत दिले नाहीयेत... अरे काय हाल असतील त्या कुटुंबांचे? नि आपल्या संजय अभ्यंकरांनी दिलेल्या आठवणीच्या अंतरंगात डोकावून पाहा, म्हणजे तुला युद्धाच्या जखमा कशा असतात त्या दिसतील!"
...................... मला वाटत नाही आणि पुर्ण खात्री आहे की येवढ्या निर्ढावलेल्या व मुर्दाड मनाचा व काळजाचा मी आहे अथवा भविश्यात कधी होईन.

"जरा कोचावरून उठून दिसणार्‍या टीव्ही च्या चष्म्यातून बाहेर येवून पाहा... जग काही इतके गुळगुळीत नि चकचकीत नाहीये! आणि तुला वाटत असले तरी, क्रिकेटमय तर नक्कीच नाहिये."
समजा जर मी या काल्पनिक "गुळगुळीत नि चकचकीत" जगात रहात असलो तर मला या संकेतस्थळावर वावरण्याची बुध्धी झाली नसती, त्यासाथी बर्‍याच गोष्टी उपलब्ध आहेत.

असो ..... अजाणपणे घडलेल्या आपराधासाठी आपण क्षमा करताल अशी अपेक्षा बाळगतो.... भविश्यात योग्य ती काळजी घेतली जाईल.

आपलाच देशप्रेमी ..... खरच छोटा डॉन.

जुना अभिजित's picture

18 Dec 2007 - 9:43 am | जुना अभिजित

"२००७ च्या क्रिकेट विश्वचषकात" बांग्लादेशाने आपल्याला हरवले व आपल्याला या स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागला. अप्रत्यक्ष पणे हा दिवस भारताच्या या स्पर्धेतील अपयशाला कारळिभूत होता असेच म्हणावे लागेल

डॉनमहाराज, विनोद म्हणून ठीक आहे. पण क्रिकेटच्याच भाषेत बोलायचे तर भारत(बीसीसीआय) बांग्लादेशाकडून हरला तर त्याला कारणीभूत बांग्लादेश कसा काय? असो. ही चर्चा वाढू नये. अजून बोलायचे असेल तर कृपया व्यनीत किंवा खरडवहीत भेटा.

ष्री, बेडेकरपेक्षा लोहगड, पुरंदरपायथ्याची मिसळ चापणारा अभिजित

सर्किट's picture

18 Dec 2007 - 7:24 am | सर्किट (not verified)

http://thebhandarkars.com/milind/archives/23

येथे मी दीड वर्षांपूर्वी लिहिले होते. ते आपल्या लेखाचा प्रतिसाद म्हणून फिट्ट आहे.

- सर्किट

मुक्तसुनीत's picture

18 Dec 2007 - 9:11 pm | मुक्तसुनीत

सर्कीटराव ,
तुमचा "स्मृतिदिना"बद्द्लचा लेख वाचला. यू हॅव नेल्ड इट् !

सृष्टीलावण्या's picture

26 Mar 2008 - 8:25 am | सृष्टीलावण्या

अगदी मर्मभेदक.

कर्नल जयंत चितळे (हिंदु दहशतवादी फेम) यांच्या तोंडून ऐकलेला.

आपण पाकिस्तानचे ह्या युद्धात ९२,००० सैनिक बंदी बनविले. शिरस्त्याप्रमाणे बिर्याणी / पुलाव देऊन आपण त्यांची बडदास्त ठेवली होती (अतिथी देवो भव ।). पाक सैन्याधिकार्‍यांसाठी त्या त्या दर्ज्याचे अधिकारी दिमतीला ठेवले होते. तर एक पाकिस्थानी मेजर (पा.मे) आणि एक भारतीय मेजर (भा.मे.) एकाच बराकीत राहात होते. मग त्यांच्यात जिव्हाळा निर्माण झाला. दोघेही बुद्धिबळ, पोलो वै. एकत्र खेळत.

पाकिस्थानी सैन्याचा जायचा दिवस उजाडला. वाघापाशी सर्व निरोपासाठी जमले.

भा.मे. ने प्रेमाने पा.मे. चा हात हातात घेऊन म्हटले, फिर मिलेंगे ।

पा.मे. अगदी जातिवंत.

लगेच कुरर्यात म्हणाला, बरखुरर्दार, फिर मिलेंगे लेकिन जंग-ए-मैदान मे ।

भा.मे. शांतपणे म्हणाला, तो क्या हुआ, उस के बाद भी आप जिंदा बचे तो हम आपको इसी तरह छोडने आएंगे ।

>
>
मराठियांची पोरे आम्ही, नाही भिणार मरणाला ।
सांगून गेला तो शिवराया, हे अवघ्या विश्वाला ।।