✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

विजय दिन

ग
गुंडोपंत यांनी
Mon, 12/17/2007 - 06:05  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
8578 वाचन

💬 प्रतिसाद (15)

प्रतिक्रिया

व
विसोबा खेचर Mon, 12/17/2007 - 08:44 नवीन

चांगला लेख..

चांगला लेख, चांगला चर्चाप्रस्ताव! भारतीय सैन्याला माझा दंडवत! तात्या.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Mon, 12/17/2007 - 08:48 नवीन

माफ करा..

पंत हा प्रसंग गौरवशाली नसून गमतीदार आहे. पण १९७१ च्या युद्धा दरम्यानचा आहे. मी १०वीला असताना ज्या सरांकडे ट्यूशनसाठी जात होते.. ते सर आर्मी मधून निवृत्त झाले होते. त्यांनी हा किस्सा सांगितला होता. गमतीदार किस्सा आहे. सांगू का? युद्धाशी याचा काहीही संबंध नाही. -प्राजु.
  • Log in or register to post comments
ग
गुंडोपंत Mon, 12/17/2007 - 08:54 नवीन

चालेल सांगा

चालेल सांगा ना... ७१ च्या युद्धाशी संबंधीत आहे ना... मग झाले तर! आपला गुंडोपंत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
प
प्राजु Mon, 12/17/2007 - 09:15 नवीन

ह्म्म..

तिथे म्हणे.. जिथे सरांच्या बटालियनचे बंकर होते.. त्या बाजूला एक गाव होते सीमेवरचे. तिथे प्रातर्विधी साठी जिथे जात, तिथे एक मोठा रेडा येत असे. एकदा आमचे सर त्या जागी भल्या पहाटे गेले... तर त्याना पाहून तो रेडा पळत पळत तिथे आला. सरांना याची कल्पना नव्हती. ते घाबरले. पण त्यांच्या सोबत असलेल्या त्यांच्या एका मित्राने सांगितले की.. हा रेडा सिगारेट फुंकण्यासाठी येतो. कारण तिथे राहणा-या बाकीच्या जवानांनी त्याला ती सवय लावली होती. आमचे सर धुम्रपान करत नसत त्यामुळे त्यांना काय करावे हा प्रश्न पडला. मग नंतर त्यांनी रोज सकाळी त्या जागी जाताना एक सिगारेट खास रेड्यासाठी घेऊन जाणे सुरू केले. - प्राजु.
  • Log in or register to post comments
स
सुनील Mon, 12/17/2007 - 20:34 नवीन

अरेच्चा!!

हा रेडा सिगारेट फुंकण्यासाठी येतो वेद म्हणू शकणारा रेडा आम्हाला ठाऊक होता. आता हा सिगारेट फुंकणारा रेडा!! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
स
स्वाती दिनेश Mon, 12/17/2007 - 12:52 नवीन

१६ डिसेंबर

"१६ डिसेंबर" याच नावाने ७१च्या युध्दाची पार्श्वभूमी घेऊन काढलेला चित्रपट आहे,डॅनी डेंग्जॉप्पा आणि गुलशन ग्रोवर दोघांची कामे छान झाली आहेत.(मुख्य म्हणजे अजिबात लाऊड नाहीत.) स्वाती
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 12/17/2007 - 13:02 नवीन

हेच

म्हणतो! त्यात सोमणांचा मिलिंदाही आहे. आपला, तात्या डेंग्जॉप्पा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती दिनेश
स
संजय अभ्यंकर Mon, 12/17/2007 - 20:03 नवीन

सोळा डिसेंबर १९७१ ....

माझे काका १ डिसेंबर १९७१ ला (युद्ध सुरू व्हायच्या दोन दिवस आधी) लद्दाख सीमेवरुन बेपत्ता झाले. ते भूदलात सिग्नलमन होते. कधीही पूजा न करणारे काका, त्या दिवशी पूजा करायची म्हणून फुले आणावयास चीनी सीमेच्या दिशेने गेले ते आजतागायत परतले नाहीत. भूदलाच्या अन्दाजाप्रमाणे, चुकून ते सीमापार जाऊन, चीनी सैन्याच्या गोळिबारास बळिपडले असावेत. गुन्डोपंतानी आज त्यान्ची आठवण जागी केली. संजय अभ्यंकर.
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Mon, 12/17/2007 - 20:11 नवीन

विजय दिनाचे अजून एक महात्म्य !!!

सोळा डिसेंबर १९७१ ला भारताने बांग्लादेशाला स्वातंत्र्य मिळवून दिले पण हाच बांग्लादेशाने पुढे भारताला आंतरराष्ट्रीय पातळीवर एका महत्वाच्या गोष्टीत तोंडघाशी पाडले .... अहो , "२००७ च्या क्रिकेट विश्वचषकात" बांग्लादेशाने आपल्याला हरवले व आपल्याला या स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागला. अप्रत्यक्ष पणे हा दिवस भारताच्या या स्पर्धेतील अपयशाला कारळिभूत होता असेच म्हणावे लागेल ...... [असो, सहज आठवले म्हणून हा पत्रप्रपंच ] क्रिकेटप्रेमी [ छोटा डॉन ]
  • Log in or register to post comments
ग
गुंडोपंत Tue, 12/18/2007 - 06:36 नवीन

कशाशी काय?

छोट्या डोना, कशाशी काय तोलतो आहेस रे बाबा तू? क्रिकेट मध्ये हरणे ही काही युद्धात जिंकण्या हरण्याशी तुलना करण्याची गोष्ट नाही! इथे मृत्यु असतो खरा-खुरा, आऊट झालो, म्हणून दुसरा खेळ नाही खेळता येत! किंवा लढतांना शत्रुच्या हाती पडलो, तर काय हाल असतात ते कधी वाचलेही नसावेस तू कधी. अजूनही पाकिस्तान ने काही आपले कैद केलेले सैनिक परत दिले नाहीयेत... अरे काय हाल असतील त्या कुटुंबांचे? नि आपल्या संजय अभ्यंकरांनी दिलेल्या आठवणीच्या अंतरंगात डोकावून पाहा, म्हणजे तुला युद्धाच्या जखमा कशा असतात त्या दिसतील! तुला जर युद्धाची धग आयुष्यात जाणवली नसेल, तर किमानपक्षी आपल्या बाघा बॉर्डरवर अतिशय सुरक्षित वातावरणात का होईना, पण जावून पाहा. नुसता ध्वजालाही किती आहे ते. झेपत असेल तर लाहौल स्पिती किंवा लेह-लद्दाख चा एक ट्रेक तर करून दाखव! तेथे जावून सहा महिने ठिय्या देवून, बर्फाळ थंडीत, साधने नसतांना प्रतिकूल परिस्थितीत लढणे तर सोडूनच दे. जरा कोचावरून उठून दिसणार्‍या टीव्ही च्या चष्म्यातून बाहेर येवून पाहा... जग काही इतके गुळगुळीत नि चकचकीत नाहीये! आणि तुला वाटत असले तरी, क्रिकेटमय तर नक्कीच नाहिये. आपला व्यथीत गुंडोपंत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
छ
छोटा डॉन Tue, 12/18/2007 - 20:21 नवीन

हेतू फक्त आणि फक्त विनोदच होता ..... माफ करा

नकळतपणे घडलेल्या चुकीबद्दल माफी मागत आहे. माझा हेतू फक्त आणि फक्त विनोदच होता ..... चर्चा मलाही पुढे वाढवायची नाही म्हणून हे ऊत्तर ..... असो जर विनोदाच्या नजरेने पाहिल्यास हा गैरसमज झाला नसता. "अजूनही पाकिस्तान ने काही आपले कैद केलेले सैनिक परत दिले नाहीयेत... अरे काय हाल असतील त्या कुटुंबांचे? नि आपल्या संजय अभ्यंकरांनी दिलेल्या आठवणीच्या अंतरंगात डोकावून पाहा, म्हणजे तुला युद्धाच्या जखमा कशा असतात त्या दिसतील!" ...................... मला वाटत नाही आणि पुर्ण खात्री आहे की येवढ्या निर्ढावलेल्या व मुर्दाड मनाचा व काळजाचा मी आहे अथवा भविश्यात कधी होईन. "जरा कोचावरून उठून दिसणार्‍या टीव्ही च्या चष्म्यातून बाहेर येवून पाहा... जग काही इतके गुळगुळीत नि चकचकीत नाहीये! आणि तुला वाटत असले तरी, क्रिकेटमय तर नक्कीच नाहिये." समजा जर मी या काल्पनिक "गुळगुळीत नि चकचकीत" जगात रहात असलो तर मला या संकेतस्थळावर वावरण्याची बुध्धी झाली नसती, त्यासाथी बर्‍याच गोष्टी उपलब्ध आहेत. असो ..... अजाणपणे घडलेल्या आपराधासाठी आपण क्षमा करताल अशी अपेक्षा बाळगतो.... भविश्यात योग्य ती काळजी घेतली जाईल. आपलाच देशप्रेमी ..... खरच छोटा डॉन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गुंडोपंत
ज
जुना अभिजित Tue, 12/18/2007 - 09:43 नवीन

विनोद

"२००७ च्या क्रिकेट विश्वचषकात" बांग्लादेशाने आपल्याला हरवले व आपल्याला या स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागला. अप्रत्यक्ष पणे हा दिवस भारताच्या या स्पर्धेतील अपयशाला कारळिभूत होता असेच म्हणावे लागेल डॉनमहाराज, विनोद म्हणून ठीक आहे. पण क्रिकेटच्याच भाषेत बोलायचे तर भारत(बीसीसीआय) बांग्लादेशाकडून हरला तर त्याला कारणीभूत बांग्लादेश कसा काय? असो. ही चर्चा वाढू नये. अजून बोलायचे असेल तर कृपया व्यनीत किंवा खरडवहीत भेटा. ष्री, बेडेकरपेक्षा लोहगड, पुरंदरपायथ्याची मिसळ चापणारा अभिजित
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Tue, 12/18/2007 - 07:24 नवीन

माझे विचार

http://thebhandarkars.com/milind/archives/23 येथे मी दीड वर्षांपूर्वी लिहिले होते. ते आपल्या लेखाचा प्रतिसाद म्हणून फिट्ट आहे. - सर्किट
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Tue, 12/18/2007 - 21:11 नवीन

अत्यंत मार्मिक लिखाण

सर्कीटराव , तुमचा "स्मृतिदिना"बद्द्लचा लेख वाचला. यू हॅव नेल्ड इट् !
  • Log in or register to post comments
स
सृष्टीलावण्या Wed, 03/26/2008 - 08:25 नवीन

मी ऐकलेला किस्सा..

अगदी मर्मभेदक. कर्नल जयंत चितळे (हिंदु दहशतवादी फेम) यांच्या तोंडून ऐकलेला. आपण पाकिस्तानचे ह्या युद्धात ९२,००० सैनिक बंदी बनविले. शिरस्त्याप्रमाणे बिर्याणी / पुलाव देऊन आपण त्यांची बडदास्त ठेवली होती (अतिथी देवो भव ।). पाक सैन्याधिकार्‍यांसाठी त्या त्या दर्ज्याचे अधिकारी दिमतीला ठेवले होते. तर एक पाकिस्थानी मेजर (पा.मे) आणि एक भारतीय मेजर (भा.मे.) एकाच बराकीत राहात होते. मग त्यांच्यात जिव्हाळा निर्माण झाला. दोघेही बुद्धिबळ, पोलो वै. एकत्र खेळत. पाकिस्थानी सैन्याचा जायचा दिवस उजाडला. वाघापाशी सर्व निरोपासाठी जमले. भा.मे. ने प्रेमाने पा.मे. चा हात हातात घेऊन म्हटले, फिर मिलेंगे । पा.मे. अगदी जातिवंत. लगेच कुरर्यात म्हणाला, बरखुरर्दार, फिर मिलेंगे लेकिन जंग-ए-मैदान मे । भा.मे. शांतपणे म्हणाला, तो क्या हुआ, उस के बाद भी आप जिंदा बचे तो हम आपको इसी तरह छोडने आएंगे । > > मराठियांची पोरे आम्ही, नाही भिणार मरणाला । सांगून गेला तो शिवराया, हे अवघ्या विश्वाला ।।
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा