सांज

प्रणया's picture
प्रणया in जे न देखे रवी...
16 Apr 2019 - 6:50 pm

सहज असे चालतांना
भेट ती फुलांची,तू मला दिलेली
ओंजळीत त्या प्राजक्ताचा
गंध राहुनी गेला...
हात नाही हातात माझ्या
पण तूझा स्पर्श राहुनी गेला....

ना किनारा फेसाळणारा
ना लाट एकसारखी झेपावणारी,
अस्पष्ट जाहले होते सारे
नव्हतीच जणू उरली क्षणे
पुन्हा एकदा स्मरणारी....

असे घाबरे मन झाले
शहारे सरसरुन आले
बोटांमध्ये रुतलेली बोटे तूझी,
अचानक तेव्हा घट्ट होती झाली...

वेड कोणते भोवती होते
की हवेत नशा वाहू लागली,
आसुसलेली पहाट होती
की अस्तास जानारी रविकिरणे गुलाली.....

न उमगले मला
क्षणात काय झाले तेव्हा,
तू असताना समोर तिथे
लाजलेली नजर माझी
शोधत होती फक्त तूझी सावली....

सरलीच सांज ती अबोली
येणारी रात्र आठवणीत सरून गेली....

तू पाहता पाहता दिसेनासा झाला
पण एकमेकांत गुंतलेला
श्वास मात्र अजुनही
तिथेच राहुनी गेला....

कविता