पालक होण्यामुळे झालेले बदल

Primary tabs

खंडेराव's picture
खंडेराव in काथ्याकूट
27 Mar 2019 - 7:23 pm
गाभा: 

संदर्भ
Painter Katha

मी एकेकाळी अगदी बेछूट माणूस होतो. काहीही करायचो - रात्री ९ वाजता सुरु झालेली पार्टी सकाळपर्यंत चालायची. ट्रेकला गेलो कि काहीही धाडस करायचो, शेकडो किलोमीटर मोटारसायकल वर फिरायचो. मजबूत भांडखोर होतो, गाडीत कायम एक लोखंडी कांब असायची आणि कुठेही रस्त्यावर भांडण झाले तर ती काढण्याचीही तयारी असायची. महिन्याच्या पगारातले १०० रुपयेही शिल्लक ठेवण्याची आसक्ती नसायची.

लग्नानंतर बऱ्याच गोष्टी बदलल्या पण मूळ स्वभाव जवळ जवळ तसाच होता.

आता, एका बाळाच्या जन्मानंतर पूर्ण बदललोय, कोणी काहीही ना सांगता.. अगदी बियरचा एक ग्लास हातात असेल तर मी उबेर बुक करतो, मोटारसायकल महिनोन महिने उभी असते. रस्त्यात लहान मुलांसोबत भिकारी दिसले कि पैसे देतो ( याची चर्चा करायला हा धागा नाही) . ट्रेक वगैरे जवळजवळ बंद झाले आहे, जो काय प्रवास करतो तो लक्सारी म्हणावा असा असतो. पीपीएफ आणि मुतुअल फंड अशा इन्वेस्टमेंटही आवर्जून करतो, टर्म इन्शुरन्स काढला आहे.

बराच भावनिकही झालोय, लहान मुलांविषयी काही वाईट वाचले/ ऐकले कि डोळ्याच्या कडा ओलावतात. ( वरची कथा, आजचे ताजे उदाहरण).

तुमचा स्वतःचा असा अनुभव आहे का? पालक बनल्यावर असे बदल होणे तुमच्या पाहण्यात आहे?

प्रतिक्रिया

आनन्दा's picture

27 Mar 2019 - 7:45 pm | आनन्दा

अर्थात

कानडाऊ योगेशु's picture

27 Mar 2019 - 8:31 pm | कानडाऊ योगेशु

>>तुमचा स्वतःचा असा अनुभव आहे का? पालक बनल्यावर असे बदल होणे तुमच्या पाहण्यात आहे?
पाहण्यातच नाही तर अनुभवण्यात पण आहे. बाप झाल्यानंतर मी ही बराच माणसाळला गेलो आहे. लहान मुलांचे जग हे बरेचनिराळे आणि निरागस असते. त्यात जर रूची घेत गेलात तर आपल्यालाही नवे बालपण अनुभवण्याची गंमत घेता येते.

खंडेराव's picture

28 Mar 2019 - 6:43 am | खंडेराव

हे खरे आहे. मी पण नवीन बालपण अनुभवतो आहे, पोराचे सुपरहिरो पुतळे इतके आवडले की एक दोन गायब करून ऑफिस डेस्क वर ठेवले आहेत..

त्या लोखंडी कांबीचे काय झाले ? ती अजुनही गाडीत असते काय ? ह्या प्रश्नाचे उत्तर मिळाल्यास पुढील प्रश्न विचारायची हिंमत करायची की नाही ते ठरवता येईल :)

आनन्दा's picture

27 Mar 2019 - 11:12 pm | आनन्दा

__/\__

खंडेराव's picture

28 Mar 2019 - 6:41 am | खंडेराव

सध्या बेबी ऑन बोर्ड चे पोस्टर आहे

सिरुसेरि's picture

28 Mar 2019 - 1:03 pm | सिरुसेरि

सुरेख निरिक्षण .

मार्कस ऑरेलियस's picture

28 Mar 2019 - 1:40 pm | मार्कस ऑरेलियस

छान!

फार पुर्वी वाचलेली बातमी आठवली :

Men's Testosterone Drops Steeply When Baby Arrives.

https://www.medicalnewstoday.com/articles/234266.php

खंडेराव's picture

28 Mar 2019 - 3:46 pm | खंडेराव

शेर केल्याबद्दल..बातमी व रिसर्च इंटरेस्टिंग आहे, आणि कनेक्ट होतोय..

युयुत्सु's picture

28 Mar 2019 - 4:22 pm | युयुत्सु

हेच शेअर करणार होतो. :)

कंजूस's picture

28 Mar 2019 - 4:17 pm | कंजूस

बदलायचं म्हणजे काय!!
ज्या सवयी चांगल्या म्हणून मुलांना सांगायच्या असतात त्या प्रथम आपल्याला सुरु कराव्या लागतात.

मराठी कथालेखक's picture

28 Mar 2019 - 5:25 pm | मराठी कथालेखक

आधीपासूनच जबाबदारीने वागणार्‍या /नाकासमोर बघून चालणार्‍या माणसाचे मुल झाल्यावर काय होत असावे ?

सोन्या बागलाणकर's picture

29 Mar 2019 - 2:35 am | सोन्या बागलाणकर

बहुधा मुलांच्या वाईट सवयी पालकांना लागत असाव्या. कृ. ह. घ्या

पण खरंच, कधी कधी अतिसभ्य किंवा अतिसमंजस पालकांना मुलांकडून थोडासा खेळकरपणा किंवा लेट गो ऍटिट्यूड शिकता येऊ शकतो.

मराठी कथालेखक's picture

30 Mar 2019 - 6:47 pm | मराठी कथालेखक

बहुधा मुलांच्या वाईट सवयी पालकांना लागत असाव्या

शक्य आहे..
काही मित्रांच्या अनुभवाने हळूहळू कळेलच..
मी पण बर्‍यापैकी गंभीर प्रकारातलाच आहे. पण मी स्वतः काठावर उभे राहून इतरांची गंमत बघण्याचा (विनापत्य राहण्याचा) निर्णय घेतलेला आहे पण इतर पालकांचे निरिक्षण करायला /त्यांचे अनुभव ऐकायला आवडते.

खंडेराव's picture

1 Apr 2019 - 1:31 pm | खंडेराव

हा प्रश्न मी एका सरळमार्गी मित्राला विचारला - तो म्हणतोय तो आता तो थोडा बिन्धास झालाय, कायम प्रोसेस किंवा नियमानुसार गेलेच पाहिजे असे त्याला आता वाटत नाही..

सोन्या बागलाणकर's picture

29 Mar 2019 - 2:36 am | सोन्या बागलाणकर

कृपया अतिसमंजस ऐवजी अतिगंभीर असे वाचावे.

प्रकाश घाटपांडे's picture

29 Mar 2019 - 10:04 am | प्रकाश घाटपांडे

वय वाढल्यावर थोडी मॅच्युरिटी येते. त्याचा परिणाम.

आदिजोशी's picture

29 Mar 2019 - 2:12 pm | आदिजोशी

भाजीतले टमॅटो न काढता भाजी संपवतो आजकाल, न आवडणार्‍या भाज्या 'वा...वा' म्हणत खाऊ लागलोय :-)

खंडेराव's picture

1 Apr 2019 - 1:35 pm | खंडेराव

पण कधीतरी स्वतः स्वयंपाक सुरु केल्यावर ( कॉलेजला असतांना) माझे भाज्या खाणे सुरु झाले - एकेकाळी मी वेलवर्गीय भाज्यांना हात नाही लावायचो, आता सर्वच खातो!

ज्ञानोबाचे पैजार's picture

29 Mar 2019 - 3:50 pm | ज्ञानोबाचे पैजार

शेळपट बनण्याची खरी सुरुवात लग्न ठरल्या पासूनच होते आणि एखादे मुल झाले की पुरुष एकदम शेळीच बनतो.

लग्ना आधी मी पण टायगर होतो, भांडणे करायला अजिबात घाबरायचो नाही, कोणी आरे म्हटले की आपण कारे म्हटलेच पाहिजे असे ठरलेलेच होते.

आता सगळे बदलले आहे, दहा बारा दिवसांपूर्वी एका लग्नाला निघालो होतो अचानक एक पांढरी स्कॉर्पियो नो एन्ट्री मधुन घुसून माझ्या कार समोर उभी राहिली. रस्ता अरुंद होता आणि त्यात दोन्ही बाजूना पार्किंग होते त्यामूळे साईडने गाडी घेण्याचा काही चान्स नव्हता. तो माजुरडा ड्रायव्हर मलाच जोरात हॉर्न वाजवून दाखवत होता. माझ्या कार मधे माझे आई, बाबा, बायको आणि मुली होत्या म्हणून डोके थंड ठेउन एक शब्दही न बोलता सगळ्यांना गाडीतुन उतरायला सांगितले. गाडी लॉक केली आणि तिकडून निघून जायला लागलो. बाबा चिडून भांडायला जात होते त्यांना पण शांत करुन बाजुला घेतले. मला न भांडता जाताना पाहून स्कॉर्पिओचा पेशन्स संपला. पांढरी सफारी घातलेला ड्रायव्हर कम भाई आणि त्याचे पंटर गाडीतुन उतरुन मला धमक्या द्यायला लागले. मीच गाडी मागे घेतली पाहिजे असा त्यांचा हट्ट होता. गाडी फोडून टाकू, जाळुन टाकू, बघून घेउ अशी भाषा सुरु झाली.

मी हात जोडून त्यांना म्हणालो "तुम्ही मोठी माणसे तुम्ही काहीही करु शकता. म्हणूनच माझी फॅमेली गाडीतुन उतरवली. आता तुम्ही माझ्या गाडीला काहिही करा मला चिंता नाही." त्यांच्यातला एक पंटर समजूतदार पणाचा आव आणुन मला म्हणत होता कशाला साहेबांच्या नादी लागता, मला गाडीची चावी द्या मी तुमची गाडी मागे घेतो. मी त्यालाही ठाम नकार दिला. आणि तशीही माझ्या गाडीच्या मागे आणखी चार पाच कार आणि दहा पंधरा बाईकची रांग लागलेली होती. पन्नास शंभर लोक जमले कोणी त्यांना समजावत होते कोणी मला. शेवटी वैतागून पब्लिक ला त्रास होतो आहे म्हणून, पब्लिकच्या विनंतीला मान देउन (माझ्यासाठी नाही बरका!), साहेब गाडीत बसले. धमक्या सुरुच होत्या. तो पर्यंत मी त्यांना त्यांच्या गाडीची आणि त्यांची कुंडली माझ्या मोबाईल वरुन शोधून ऐकवली. साहेब अजूनच थंड झाले. आणि मग त्यांची गाडी मागे झाल्यावर त्यांना टाटा करुन आम्ही सगळे मार्गस्थ झालो.

हेच लग्नाच्या आधी झाले असते तर तिकडे ऑन द स्पॉट मारामारी करायला मी अजिबात घाबरलो नसतो. समोरच्या गाडीची काच तर नक्कीच फोडली असती. अर्थात तेव्हा माझ्या कडे कार नव्हती, त्या मुळे असला प्रसंग कधी ओढवला नाही. पण एकदा लोणावळा एसटी स्टँड वर चिक्कीवाल्याच्या डोक्यात घालायला भला मोठा दगड उचलला होता. कंडक्टर मधे पडला म्हणुन तो चिक्कीवाला वाचला होता.

असो गेले ते दिवस आणि राहिल्या ता आठवणी

पैजारबुवा,

एकदम ढिंशक्यांव प्रसंग की!

संजय पाटिल's picture

29 Mar 2019 - 5:52 pm | संजय पाटिल

पैजारबुवा...... __/\__ हे ओरिजीनल आहे का याची पण काही प्रेरणा आहे?

डॉ सुहास म्हात्रे's picture

29 Mar 2019 - 6:15 pm | डॉ सुहास म्हात्रे

लई भारी !

यापुढची पायरी म्हणून, समोरच्याला त्या प्रसंगावरची एक शीघ्र कविता ऐकवा आणि बघा काय होते ते ! :) अर्थातच, तुमच्या जबाबदारीवर ;)

ज्ञानोबाचे पैजार's picture

30 Mar 2019 - 10:18 am | ज्ञानोबाचे पैजार

खबरदार जर नो एन्ट्रीतुन याल पुढे आडवे,
काढेन भर रस्त्यात वाभाडे,
आपण मोठे स्कॉर्पिओ वाले असा गुंठा मंत्री की,
आपली लायकी आम्हा ठावकी,
हा रस्ता आपल्या बापाचा ही नसे,
त्यावर आमचाही थोडा हक्क असे,
आम्ही घेतले नियम पाळण्याचे वसे
म्हणुन पुन्हा सांगतो,
खबरदार जर नो एन्ट्रीतुन याल पुढे आडवे,
काढेन भर रस्त्यात वाभाडे

पैजारबुवा,

डॉ सुहास म्हात्रे's picture

30 Mar 2019 - 11:07 am | डॉ सुहास म्हात्रे

=)) =)) =))

खात्री होतीच, ती लगेच खरी करून पण दाखवलीत ! (टाळ्या)

चामुंडराय's picture

31 Mar 2019 - 2:21 am | चामुंडराय

व्वा पैजार बुवा, भारीच कि.
शीघ्र काव्य आवडलं

चौथा कोनाडा's picture

1 Apr 2019 - 2:23 pm | चौथा कोनाडा

पैजारबुवा,

स्कोर्पियो वाला आनुभव आणि कविता, दोन्हीही भारी !

दादा कोंडके's picture

30 Mar 2019 - 1:33 am | दादा कोंडके

पण

तो पर्यंत मी त्यांना त्यांच्या गाडीची आणि त्यांची कुंडली माझ्या मोबाईल वरुन शोधून ऐकवली.

कळलं नाही.

ज्ञानोबाचे पैजार's picture

30 Mar 2019 - 10:24 am | ज्ञानोबाचे पैजार

गाडीच्या नंबर वरुन त्याचे नाव शोधले आणि मग नावावरुन फेसबुक अकाउंट, त्यात त्याच्या गाडीवर घड्याळाचा स्टीकर लावलेला होता त्याने काम अजूनच सोपे झाले.
पैजारबुवा,

दादा कोंडके's picture

31 Mar 2019 - 2:02 am | दादा कोंडके

गाडीच्या नंबरावरून नाव बघता येतं ते विसरलोच होतो.

मराठी कथालेखक's picture

30 Mar 2019 - 6:42 pm | मराठी कथालेखक

सही जिरवलीत... मारामारी न करता समोरच्याची जिरवणे कधीही योग्यच.. आपली बाजू वरचढ राहते

खंडेराव's picture

1 Apr 2019 - 1:38 pm | खंडेराव

मस्त आणि तुमचा स्टॅन्ड हि छान!
यामुळे तुमच्या मुलींनाही असे प्रसंग हाताळण्याचा योग्य पर्याय बघायला मिळाला..ठाम राहणे खूप महत्वाचे. माझ्या स्वतःच्या आई वडिलांविषयी ज्या आठवणी आहेत त्यात ते ठाम राहून कसे वेगवेगळ्या प्रसंगांना सामोरे गेले त्यांची वेगळीच जागा आहे.

पालक बनल्यावर असे बदल होणे तुमच्या पाहण्यात आहे?
हॄदय बदलते ! :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- छम्मा छम्मा बाजे रे मेरी पैजनिया... :- Fraud Saiyaan | 4K |