[शशक' १९] - गारेगार

Primary tabs

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
15 Feb 2019 - 10:50 pm

आठवणी उलगडून बसतो,
तुझे फोटो पाहताना
अन हात थरथरतात,
जुने मेसेजेस वाचताना

फोटोज डिलीट करताना,
उसवलेल्या जाणिवांना जपताना,
तुझा नंबर ब्लॉक करतो,
नंबर पाठ असताना

तुझ्या आठवणींच्या रोपट्याचा
वटवृक्ष झालेला असतो
मी त्या वटवृक्षाखाली
का बरं फुलं शोधत बसतो?

मी गॅलरीतून बघतो
नभी ढग मोजतो
परत एकदा कॉफी प्यावी
म्हणून किचनकडे वळतो

मी फ्रिजचा दरवाजा उघडतो
तुला डोळे भरून बघतो
तुझ्या डोळ्यांभोवती जमलेल्या बर्फाला
हलकेच काढून टाकतो

तुझ्या बोटातली अंगठी काढतो
तुझा हात हातात घेतो
अशीच अवघडून राहशील का?
असं स्वतःलाच विचारतो.

मी जुन्या बाजारातून फ्रिज विकत घेतला, त्या फ्रिजच्या आतमध्ये चोळाबोळा केलेला कागद सापडला, त्यावर ही कविता लिहिलेली होती.

प्रतिक्रिया

जव्हेरगंज's picture

15 Feb 2019 - 11:05 pm | जव्हेरगंज

ज ब र द स्त !!

+१

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 Feb 2019 - 11:46 pm | डॉ सुहास म्हात्रे

+१

ठार काळी शशक !

तुषार काळभोर's picture

16 Feb 2019 - 6:47 am | तुषार काळभोर

सही!

चांदणे संदीप's picture

16 Feb 2019 - 8:00 am | चांदणे संदीप

+१

जुन्या बाजारातून फ्रिज घेतल्याबद्दल अभिनंदन. त्यातल्या चोळामोळा झालेल्या कागदावरची कविता आमच्याबद्दल पोचवलीत त्याबद्दल आभार आणि त्या कवितेला शशक करून स्पर्धेत उतरल्यामुळे शुभेच्छा!

Sandy

बोरु's picture

16 Feb 2019 - 8:21 am | बोरु

भारी. पण चोळाबोळा केलेला कागद सापडायची फ्रीज ही जागा जरा विचित्र वाटते.

चांदणे संदीप's picture

16 Feb 2019 - 9:58 am | चांदणे संदीप

तो फ्रिज जुन्या बाजारात गेला म्हणजे त्याचं तोपर्यंत कपाट झालेलं होतं. कपाटात कागद असणं नॉर्मलच नाही का? :)

Sandy

ज्ञानोबाचे पैजार's picture

16 Feb 2019 - 9:17 am | ज्ञानोबाचे पैजार

अरे बापरे,
एकदम अंगावर आली कविता
पैजारबुवा,

मित्रहो's picture

16 Feb 2019 - 10:53 am | मित्रहो

+१ माझ्यासाठी विजेती कविता. जबरदस्त

संजय पाटिल's picture

16 Feb 2019 - 11:02 am | संजय पाटिल

+१

संजय पाटिल's picture

16 Feb 2019 - 11:06 am | संजय पाटिल

+१

पुणेकर भामटा's picture

16 Feb 2019 - 11:15 am | पुणेकर भामटा

+१

पुणेकर भामटा's picture

16 Feb 2019 - 11:15 am | पुणेकर भामटा

+१

विनिता००२'s picture

16 Feb 2019 - 11:21 am | विनिता००२

बाप्रे :(

+१

शब्दानुज's picture

16 Feb 2019 - 12:56 pm | शब्दानुज

+1

कविता इतकी ठिगळजोड आहे की ती दुसऱ्याची आहे सांगणं हे गिमिकच आवश्यक होतं. शिवाय कथा या प्रकारातील निवेदनही यायला हवं होतं. ही तिकडम साधल्याबद्दल अभिनंदन.

एमी's picture

16 Feb 2019 - 5:31 pm | एमी

डेंजर :-O
+१

Ganes Gaitonde's picture

16 Feb 2019 - 7:03 pm | Ganes Gaitonde

+1

नावातकायआहे's picture

16 Feb 2019 - 8:32 pm | नावातकायआहे

+१ भारी....

ज्योति अळवणी's picture

16 Feb 2019 - 11:01 pm | ज्योति अळवणी

भारी

भीमराव's picture

17 Feb 2019 - 8:58 am | भीमराव

रात्री फ्रीज फक्त आपोआप उघडायला हवा.
+१

फ्रीजमध्ये कोंडून मारलंय वाटतं तिला.

आज रात्री फ्रीज उघडू नका, नाहीतरी डोळ्यांचा बर्फ होईल हो!

श्वेता२४'s picture

18 Feb 2019 - 11:35 am | श्वेता२४

तुमचे हे स्पष्टीकरण वाचल्यावर शशक नीट कळली. खूपच जबरदस्त आणि कल्पक मांडणी

मारून मग फ्रिजमधे ठेवलंय.

चौथा कोनाडा's picture

21 Feb 2019 - 4:08 pm | चौथा कोनाडा

कैच्याकै.

ओळी नीट वाचा.

मी फ्रिजचा दरवाजा उघडतो
तुला डोळे भरून बघतो
तुझ्या डोळ्यांभोवती जमलेल्या बर्फाला
हलकेच काढून टाकतो

बायको खुप मागे लागली होती, फ़्रीज घ्या, फ़्रीज घ्या म्हनून पन नाय घेतला लवकर.
बिचारी रडकूंडीला आली. मग तिच्या डोळ्यांभोवती बर्फ जमनार नाय तर डांबर जमनार

आन मंग सोडून गेल्यावर डोळे भरून बगायला नको ?

पुढचं कडवं पन असचं आहे. बायकोनं अंगठी खरेदीचा तगादा लावल्यावर
मेव्हणीकडून तात्पुरती उसनी घेवून तिला घातली,
मंग इअचाराय नको बिन अंगठीचं कसं वाटतंय ?
बगा पुन्ना वाचून

अभिजीत अवलिया's picture

17 Feb 2019 - 10:14 pm | अभिजीत अवलिया

+१. जबरदस्त

पद्मावति's picture

17 Feb 2019 - 11:58 pm | पद्मावति

+१

लोथार मथायस's picture

18 Feb 2019 - 4:22 am | लोथार मथायस

+1

शित्रेउमेश's picture

18 Feb 2019 - 8:23 am | शित्रेउमेश

+१

प्राची अश्विनी's picture

18 Feb 2019 - 9:16 am | प्राची अश्विनी

+1

निखिल माने's picture

18 Feb 2019 - 10:05 am | निखिल माने

+1

समीरसूर's picture

18 Feb 2019 - 10:30 am | समीरसूर

आवडली. चित्रदर्शी.

राजाभाउ's picture

18 Feb 2019 - 10:39 am | राजाभाउ

+१

चिगो's picture

18 Feb 2019 - 12:38 pm | चिगो

+१.. अंगावर काटा आला कविता / कथा वाचून.. (एवढ्या थंडीत फ्रीज उघडल्याने असेल कदाचित.) ;-)

किसन शिंदे's picture

18 Feb 2019 - 1:43 pm | किसन शिंदे

जबरदस्त !! सायको किलर वाटतोय तो माणूस

आनंद's picture

18 Feb 2019 - 2:57 pm | आनंद

+१

पाच रुपयाची कोथिंबीर सुद्धा नीट पारखून घेणारे.....फ्रीज घेण्याअगोदर उघडून का पाहिला नाही?

कोण's picture

19 Feb 2019 - 10:04 am | कोण

+१

रांचो's picture

19 Feb 2019 - 9:10 pm | रांचो

+१

रुपी's picture

21 Feb 2019 - 5:13 am | रुपी

+१

पियुशा's picture

21 Feb 2019 - 12:14 pm | पियुशा

+१

मयुरी चवाथे-शिंदे's picture

21 Feb 2019 - 3:46 pm | मयुरी चवाथे-शिंदे

गारेगार कुल्फी किंवा आईस्क्रीम असतं व... तुमि तर पार मुडदाच बशीवलात...

मस्तय कविता (कथा)

एमी's picture

21 Feb 2019 - 3:49 pm | एमी

लेखक चैतन्य रासकर?

चौथा कोनाडा's picture

21 Feb 2019 - 3:54 pm | चौथा कोनाडा

+१

पिलीयन रायडर's picture

21 Feb 2019 - 4:02 pm | पिलीयन रायडर

+1
जमलंय जमलंय...

शब्दबम्बाळ's picture

21 Feb 2019 - 4:40 pm | शब्दबम्बाळ

तशी आवडली! पण कविता करून त्याखाली एखादे वाक्य लिहून ती शशक म्हणून गणली जाऊ लागली तर लोक सुंदर कविता लिहून त्याखाली "आज तुझी आठवण फार आली" असे एखादे वाक्य टाकू शकतात. मग तीही शशक म्हणावी लागेल! ;)
कवितेला खूप कमी प्रतिसाद येतात निदान असे केल्याने कवितांचा टीआरपी वाढेल!
पण तरीही हि शशक असावी का यावर साशंक...

उपाशी बोका's picture

23 Feb 2019 - 6:59 am | उपाशी बोका

-१

चॅट्सवूड's picture

25 Feb 2019 - 7:17 pm | चॅट्सवूड

+१

दीपक११७७'s picture

28 Feb 2019 - 10:44 am | दीपक११७७

वटवृक्ष झालेले असणारं ..... वटवृक्ष झालेलेच आहे,
छान आठवणींना उजाळा,
भारी लिहिले आहे,

दीपक११७७'s picture

28 Feb 2019 - 10:44 am | दीपक११७७

वटवृक्ष झालेले असणारं ..... वटवृक्ष झालेलेच आहे,
छान आठवणींना उजाळा,
भारी लिहिले आहे,