Skip to main content

[शशक' १९] - गारेगार

शुक्रवार, 15/02/2019 या दिवशी प्रकाशित केले.
आठवणी उलगडून बसतो, तुझे फोटो पाहताना अन हात थरथरतात, जुने मेसेजेस वाचताना फोटोज डिलीट करताना, उसवलेल्या जाणिवांना जपताना, तुझा नंबर ब्लॉक करतो, नंबर पाठ असताना तुझ्या आठवणींच्या रोपट्याचा वटवृक्ष झालेला असतो मी त्या वटवृक्षाखाली का बरं फुलं शोधत बसतो? मी गॅलरीतून बघतो नभी ढग मोजतो परत एकदा कॉफी प्यावी म्हणून किचनकडे वळतो मी फ्रिजचा दरवाजा उघडतो तुला डोळे भरून बघतो तुझ्या डोळ्यांभोवती जमलेल्या बर्फाला हलकेच काढून टाकतो तुझ्या बोटातली अंगठी काढतो तुझा हात हातात घेतो अशीच अवघडून राहशील का? असं स्वतःलाच विचारतो. मी जुन्या बाजारातून फ्रिज विकत घेतला, त्या फ्रिजच्या आतमध्ये चोळाबोळा केलेला कागद सापडला, त्यावर ही कविता लिहिलेली होती.

वाचने 37065
प्रतिक्रिया 49

प्रतिक्रिया

सही!

+१ जुन्या बाजारातून फ्रिज घेतल्याबद्दल अभिनंदन. त्यातल्या चोळामोळा झालेल्या कागदावरची कविता आमच्याबद्दल पोचवलीत त्याबद्दल आभार आणि त्या कवितेला शशक करून स्पर्धेत उतरल्यामुळे शुभेच्छा! Sandy

भारी. पण चोळाबोळा केलेला कागद सापडायची फ्रीज ही जागा जरा विचित्र वाटते.

In reply to by बोरु

तो फ्रिज जुन्या बाजारात गेला म्हणजे त्याचं तोपर्यंत कपाट झालेलं होतं. कपाटात कागद असणं नॉर्मलच नाही का? :) Sandy

अरे बापरे, एकदम अंगावर आली कविता पैजारबुवा,

+१ माझ्यासाठी विजेती कविता. जबरदस्त

+१

+१

+१

+१

+1

कविता इतकी ठिगळजोड आहे की ती दुसऱ्याची आहे सांगणं हे गिमिकच आवश्यक होतं. शिवाय कथा या प्रकारातील निवेदनही यायला हवं होतं. ही तिकडम साधल्याबद्दल अभिनंदन.

+1

भारी

In reply to by भीमराव

फ्रीजमध्ये कोंडून मारलंय वाटतं तिला. आज रात्री फ्रीज उघडू नका, नाहीतरी डोळ्यांचा बर्फ होईल हो!

In reply to by आनन्दा

कैच्याकै. ओळी नीट वाचा. मी फ्रिजचा दरवाजा उघडतो तुला डोळे भरून बघतो तुझ्या डोळ्यांभोवती जमलेल्या बर्फाला हलकेच काढून टाकतो बायको खुप मागे लागली होती, फ़्रीज घ्या, फ़्रीज घ्या म्हनून पन नाय घेतला लवकर. बिचारी रडकूंडीला आली. मग तिच्या डोळ्यांभोवती बर्फ जमनार नाय तर डांबर जमनार आन मंग सोडून गेल्यावर डोळे भरून बगायला नको ? पुढचं कडवं पन असचं आहे. बायकोनं अंगठी खरेदीचा तगादा लावल्यावर मेव्हणीकडून तात्पुरती उसनी घेवून तिला घातली, मंग इअचाराय नको बिन अंगठीचं कसं वाटतंय ? बगा पुन्ना वाचून

+१

+1

+१

+1

+1

आवडली. चित्रदर्शी.

+१

+१.. अंगावर काटा आला कविता / कथा वाचून.. (एवढ्या थंडीत फ्रीज उघडल्याने असेल कदाचित.) ;-)

जबरदस्त !! सायको किलर वाटतोय तो माणूस

+१

+१

+१

+१

+१

गारेगार कुल्फी किंवा आईस्क्रीम असतं व... तुमि तर पार मुडदाच बशीवलात... मस्तय कविता (कथा)

+१

तशी आवडली! पण कविता करून त्याखाली एखादे वाक्य लिहून ती शशक म्हणून गणली जाऊ लागली तर लोक सुंदर कविता लिहून त्याखाली "आज तुझी आठवण फार आली" असे एखादे वाक्य टाकू शकतात. मग तीही शशक म्हणावी लागेल! ;) कवितेला खूप कमी प्रतिसाद येतात निदान असे केल्याने कवितांचा टीआरपी वाढेल! पण तरीही हि शशक असावी का यावर साशंक...

-१

+१

वटवृक्ष झालेले असणारं ..... वटवृक्ष झालेलेच आहे, छान आठवणींना उजाळा, भारी लिहिले आहे,

वटवृक्ष झालेले असणारं ..... वटवृक्ष झालेलेच आहे, छान आठवणींना उजाळा, भारी लिहिले आहे,