[शशक' १९] - लोणचं

Primary tabs

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
12 Feb 2019 - 6:13 pm

सर्वांनी डबे उघडले आणि त्यातले जिन्नस चवीपुरते वाटून घेतले. त्याच्या डब्यात चपातीच्या घडीत लोणच्यातल्या चार मिरच्या होत्या. मित्र म्हणाला, ‘लोणच्यानं मजा आणली! उद्याही घेऊन येना थोडं.’ त्याचा घास घश्यातच अडकला. भरून आलेले डोळे कुणाला न दिसेलसे पुसत म्हणाला, ‘माफ करा मित्रहो! हे लोणचं मी पुन्हा कधीही आणू शकणार नाही.’
दोन आठवड्यांपूर्वी एके सकाळी त्याची आई कार्डिअॅक अॅरेस्टने गेली. भावाघरी धावला तो, पण कुणालाच काही करता आलं नाही. सगळं आटोपल्यावर घर सोडताना, जाण्यापूर्वी चारच दिवस आईने घातलेलं लोणचं प्रत्येकाने छोट्या बरणीतून आठवण म्हणून घेतलं. ते कधीच संपू नये असं त्याला वाटत होतं. आज त्या बरणीतली शेवटची मिरची त्यानं डब्यात आणली होती.

प्रतिक्रिया

पैलवान's picture

12 Feb 2019 - 6:42 pm | पैलवान

-
त्याच्या डब्यात चपातीच्या घडीत लोणच्यातल्या चार मिरच्या होत्या.
आणि
आज त्या बरणीतली शेवटची मिरची त्यानं डब्यात आणली होती.

श्वेता२४'s picture

12 Feb 2019 - 9:59 pm | श्वेता२४

हळवा करून टाकणारा शेवट आवडली

टर्मीनेटर's picture

12 Feb 2019 - 10:05 pm | टर्मीनेटर

+१
आवडली!

डॉ सुहास म्हात्रे's picture

12 Feb 2019 - 10:56 pm | डॉ सुहास म्हात्रे

+१

आईच्या मृत्युची बातमी मध्यभागी उघड केल्याने क्लायमॅक्स (धक्का) शेवटाऐवजी मध्यभागी गेला. ते शेवटी केले असते तर कथा अजून परिणामकारक झाली असती.

पण, तरीही, भावस्पर्शी कथा आवडली.

विनिता००२'s picture

13 Feb 2019 - 10:23 am | विनिता००२

+१

यश राज's picture

13 Feb 2019 - 2:12 pm | यश राज

+१

किसन शिंदे's picture

13 Feb 2019 - 2:46 pm | किसन शिंदे

हे आधी वाचल्यासारखं वाटतंय कुठेतरी.

निओ's picture

13 Feb 2019 - 2:49 pm | निओ

+1

ज्योति अळवणी's picture

13 Feb 2019 - 5:35 pm | ज्योति अळवणी

वाईट वाटलं वाचून

सिद्धार्थ ४'s picture

18 Feb 2019 - 3:26 pm | सिद्धार्थ ४

+१

दीपा माने's picture

19 Feb 2019 - 12:56 am | दीपा माने

ंमाझ्या ति. आईने हार्ट अॅटॅकने जाण्याआधी पत्रातून लिहीलेली मटण वडे आणि काळ्या मसाल्याची कृती मी असंख्य वेळा वाचत आले आहे कारण तिच्या लिखाणातून ती स्वत:च मला भेटते आहेसे वाटते.
कथा भावली.

लई भारी's picture

19 Feb 2019 - 2:45 pm | लई भारी

+१

रांचो's picture

19 Feb 2019 - 9:16 pm | रांचो

+१

मयुरी चवाथे-शिंदे's picture

21 Feb 2019 - 5:38 pm | मयुरी चवाथे-शिंदे

+१