Skip to main content

[शशक' १९] - लोणचं

मंगळवार, 12/02/2019 या दिवशी प्रकाशित केले.
सर्वांनी डबे उघडले आणि त्यातले जिन्नस चवीपुरते वाटून घेतले. त्याच्या डब्यात चपातीच्या घडीत लोणच्यातल्या चार मिरच्या होत्या. मित्र म्हणाला, ‘लोणच्यानं मजा आणली! उद्याही घेऊन येना थोडं.’ त्याचा घास घश्यातच अडकला. भरून आलेले डोळे कुणाला न दिसेलसे पुसत म्हणाला, ‘माफ करा मित्रहो! हे लोणचं मी पुन्हा कधीही आणू शकणार नाही.’ दोन आठवड्यांपूर्वी एके सकाळी त्याची आई कार्डिअॅक अॅरेस्टने गेली. भावाघरी धावला तो, पण कुणालाच काही करता आलं नाही. सगळं आटोपल्यावर घर सोडताना, जाण्यापूर्वी चारच दिवस आईने घातलेलं लोणचं प्रत्येकाने छोट्या बरणीतून आठवण म्हणून घेतलं. ते कधीच संपू नये असं त्याला वाटत होतं. आज त्या बरणीतली शेवटची मिरची त्यानं डब्यात आणली होती.

वाचने 6646
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

- त्याच्या डब्यात चपातीच्या घडीत लोणच्यातल्या चार मिरच्या होत्या. आणि आज त्या बरणीतली शेवटची मिरची त्यानं डब्यात आणली होती.

हळवा करून टाकणारा शेवट आवडली

+१ आवडली!

+१ आईच्या मृत्युची बातमी मध्यभागी उघड केल्याने क्लायमॅक्स (धक्का) शेवटाऐवजी मध्यभागी गेला. ते शेवटी केले असते तर कथा अजून परिणामकारक झाली असती. पण, तरीही, भावस्पर्शी कथा आवडली.

+१

+1

वाईट वाटलं वाचून

+१

ंमाझ्या ति. आईने हार्ट अॅटॅकने जाण्याआधी पत्रातून लिहीलेली मटण वडे आणि काळ्या मसाल्याची कृती मी असंख्य वेळा वाचत आले आहे कारण तिच्या लिखाणातून ती स्वत:च मला भेटते आहेसे वाटते. कथा भावली.

+१

+१

+१