[शशक' १९] - उफराटा न्याय

Primary tabs

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
7 Feb 2019 - 7:50 pm

“त्यांच्यात काय बोलणं चाललंय ?”

“गपचूप काहीतरी प्लॅन करतायत !

“एकाच घरात राहून समजेना. पत्र आलंय बँकेकडून घरासाठी लोन मंजुरीचं ! परस्पर घर घेतलं, सांगावंसंही वाटलं नाही. ती तर सूनच, पोटच्या मुलाने सांगायला नको ?

“तिचीच फूस असणार,मुलगा असा नव्हता लग्नाआधी. लग्नाला इतकी वर्षं झाली, मूलबाळ नाही अजून, नाहीतर त्याचीही जबाबदारी आपल्यावर टाकून हिंडले असते !”

“होईल कसं ? देवही बघतोय …संस्कार मात्र फुकट गेले ! हरामखोर आता स्वार्थीपणे वागतायत. पगार किती आहे सांगत नाहीत. मुलाच्या ट्रीटमेंटवर खर्च चालू आहे परस्पर. साठीतही सगळे व्यवहार मीच बघतोय म्हणून बरं.

सगळं दिसतंय म्हणून कधीचंच ठणकावलंय, हे माझं घर आहे, चालते व्हा, धक्के बसल्यानंतर आटे दालका भाव मालूम पडेगा !”

प्रतिक्रिया

टर्मीनेटर's picture

8 Feb 2019 - 8:25 pm | टर्मीनेटर

आवडली!

विनिता००२'s picture

9 Feb 2019 - 9:41 am | विनिता००२

+१

पद्मावति's picture

9 Feb 2019 - 6:02 pm | पद्मावति

+१

ज्योति अळवणी's picture

9 Feb 2019 - 10:26 pm | ज्योति अळवणी

मस्त

दादा कोंडके's picture

9 Feb 2019 - 11:23 pm | दादा कोंडके

छान!

सिद्धार्थ ४'s picture

11 Feb 2019 - 2:07 pm | सिद्धार्थ ४

+१

राजाभाउ's picture

13 Feb 2019 - 1:03 pm | राजाभाउ

+१

आनन्दा's picture

14 Feb 2019 - 7:47 am | आनन्दा

+1

nanaba's picture

14 Feb 2019 - 3:23 pm | nanaba

+1