Skip to main content

[शशक' १९] - उफराटा न्याय

लेखक साहित्य संपादक यांनी गुरुवार, 07/02/2019 19:50 या दिवशी प्रकाशित केले.
“त्यांच्यात काय बोलणं चाललंय ?” “गपचूप काहीतरी प्लॅन करतायत ! “एकाच घरात राहून समजेना. पत्र आलंय बँकेकडून घरासाठी लोन मंजुरीचं ! परस्पर घर घेतलं, सांगावंसंही वाटलं नाही. ती तर सूनच, पोटच्या मुलाने सांगायला नको ? “तिचीच फूस असणार,मुलगा असा नव्हता लग्नाआधी. लग्नाला इतकी वर्षं झाली, मूलबाळ नाही अजून, नाहीतर त्याचीही जबाबदारी आपल्यावर टाकून हिंडले असते !” “होईल कसं ? देवही बघतोय …संस्कार मात्र फुकट गेले ! हरामखोर आता स्वार्थीपणे वागतायत. पगार किती आहे सांगत नाहीत. मुलाच्या ट्रीटमेंटवर खर्च चालू आहे परस्पर. साठीतही सगळे व्यवहार मीच बघतोय म्हणून बरं. सगळं दिसतंय म्हणून कधीचंच ठणकावलंय, हे माझं घर आहे, चालते व्हा, धक्के बसल्यानंतर आटे दालका भाव मालूम पडेगा !”

वाचने 3881
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

आवडली!

+१

+१

मस्त

छान!

+१

+१

+1

+1