[शशक' १९] - दोन ध्रुवावर दोघे आपण

Primary tabs

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
6 Feb 2019 - 9:00 pm

"हॅलो" ! फोटो स्टुडिओ का ? मी आरुष बोलतोय
समोरून अगदी मंजुळ आवाज आला , "मी आश्लेषा बोलतेय" !
धागे जुळत गेले , एक दिवस काळाघोडाला भेटीचं ठरवलंच पण भलताच दैवयोग्
ती:- तू आला का नाहीस ?
तो:- मी आलो होतो ना !
तो:- ओके , शेवटचा चान्स , संध्याकाळी शिवाजी पार्कात भेट
ती:- तिथे जेल आहे वेडी आहेस का?
तो:- खोटारडी आहेस
ती:- गपबस , परवाच फोटो काढला तिकडे
थोडावेळ स्मशानशांतता अन परत फोन झाला
ती:- सॉरी , रागावून बोललो आपण दोघे
तो:- मला कळलं आहे, "आपण कधीच भेटू शकणार नाही"
ती:- का?
तो:- आपण समांतर विश्वात (मल्टिव्हर्स) आहोत , त्यांच्याकडा जुळल्यानेच फोन लागला
ती:- बर तडफड तिकडेच मग !

प्रतिक्रिया

पैलवान's picture

6 Feb 2019 - 10:31 pm | पैलवान

एक थोडी मोठी, विस्तृत कथा मस्त करता येईल यावर

ऋतुराज चित्रे's picture

6 Feb 2019 - 11:51 pm | ऋतुराज चित्रे

' दोन समांतर रेषा एकमेकींना कधीच जुळत नाहीत ', असतो एकेकाचा स्वभाव - पु.ल. देशपांडे.

पद्मावति's picture

7 Feb 2019 - 1:01 pm | पद्मावति

+१

किसन शिंदे's picture

7 Feb 2019 - 1:21 pm | किसन शिंदे

तो:- ओके , शेवटचा चान्स , संध्याकाळी शिवाजी पार्कात भेट
ती:- तिथे जेल आहे वेडी आहेस का?

या दोन ओळी कन्फ्युजिंग आहेत.

ज्योति अळवणी's picture

7 Feb 2019 - 1:40 pm | ज्योति अळवणी

थोडी अवघड पण आवडली

सुधीर कांदळकर's picture

7 Feb 2019 - 8:35 pm | सुधीर कांदळकर

रन लोला रन सिनेमा आठवला.

ज्ञानोबाचे पैजार's picture

8 Feb 2019 - 10:37 am | ज्ञानोबाचे पैजार

"अमर फोटो स्टुडिओ" ची गोष्ट अशीच काहीशी आहे. त्यातच थोडाफार बदल केल्यासारखा वाटला.
पैजारबुवा,

साहित्य संपादक's picture

8 Feb 2019 - 12:57 pm | साहित्य संपादक

लेखकाच्या विनंतीनुसार हा प्रतिसाद देत आहोत.
---–----–--

लेखकाचं मनोविश्व :- मी लिहिलेली कथा हि काल्पनिक विज्ञान कथा आहे , एका सारखे अनेक समांतर विश्व असतात , असं म्हणतात कि प्रत्येक समांतर विश्वात तेच जीव असतात , जस कि प्रत्येक विश्वात आश्लेषा आह.
कथेत दोन विश्वाच्या कडा जवळ आल्याने. ,, एका विश्वातल्या आरुषचा दुसऱ्या विश्वातील आश्लेषाला फोन लागला आहे
एका विश्वात शिवाजी पार्क हे मैदान आहे , भारत स्वतंत्र आहे , पण दुसऱ्या विश्वात इंग्रंजांचं सरकार आहे आणि शिवाजी पार्कात जेल बांधलं गेलेलं आहे.
एक दोन अयशस्वी भेटीच्या प्रयत्नानंतर नंतर आरुषला हे उमगलं आहे पण अश्लेषाला हे अजिबात कळलेलं नाही
शब्द संख्या मर्यादित असल्याने मनोविश्व लिहिण्याचा प्रपंच केला आहे.

-----------

ऍस्ट्रॉनॉट विनय आहे का लेखक?

समजवल्यावर आवडली +१

श्वेता२४'s picture

11 Feb 2019 - 4:18 pm | श्वेता२४

ते वाचल्यावरच कळली कथा. असले गुंतागुंतीचे विचार मांडल्याबद्दल +1

शब्दबम्बाळ's picture

21 Feb 2019 - 6:48 pm | शब्दबम्बाळ

100 शब्दांच्या कथेला 100 शब्दांचे स्पष्टीकरण!
कुच पट्या नही...
जाता जाता.. याच थीमवरती एक लईच भारी एनिमे मुवी आहे! नक्की बघा.. Your Name.

सुधीर कांदळकर's picture

9 Feb 2019 - 7:21 pm | सुधीर कांदळकर

मध्यवर्ती कल्पनेवर आहे, फक्त त्यात तीन विश्वे आहेत.

माझीही शॅम्पेन's picture

11 Feb 2019 - 2:18 pm | माझीही शॅम्पेन

+१

कपिलमुनी's picture

13 Feb 2019 - 10:14 pm | कपिलमुनी

+1

खटपट्या's picture

13 Feb 2019 - 11:50 pm | खटपट्या

+1

समर्पक's picture

14 Feb 2019 - 12:06 am | समर्पक

.

मंदार कात्रे's picture

14 Feb 2019 - 1:10 pm | मंदार कात्रे

+१

संन्यस्त खड्ग's picture

14 Feb 2019 - 1:11 pm | संन्यस्त खड्ग

+१

झपाटलेला फिलॉसॉफर's picture

14 Feb 2019 - 1:17 pm | झपाटलेला फिलॉसॉफर

+१

नँक्स's picture

16 Feb 2019 - 5:46 pm | नँक्स

+१

ईश्वरदास's picture

16 Feb 2019 - 9:48 pm | ईश्वरदास

रुपी's picture

21 Feb 2019 - 4:44 am | रुपी

वेगळ्या विषयावरची कथा आवडली.