Skip to main content

[शशक' १९] - दोन ध्रुवावर दोघे आपण

लेखक साहित्य संपादक यांनी बुधवार, 06/02/2019 21:00 या दिवशी प्रकाशित केले.
"हॅलो" ! फोटो स्टुडिओ का ? मी आरुष बोलतोय समोरून अगदी मंजुळ आवाज आला , "मी आश्लेषा बोलतेय" ! धागे जुळत गेले , एक दिवस काळाघोडाला भेटीचं ठरवलंच पण भलताच दैवयोग् ती:- तू आला का नाहीस ? तो:- मी आलो होतो ना ! तो:- ओके , शेवटचा चान्स , संध्याकाळी शिवाजी पार्कात भेट ती:- तिथे जेल आहे वेडी आहेस का? तो:- खोटारडी आहेस ती:- गपबस , परवाच फोटो काढला तिकडे थोडावेळ स्मशानशांतता अन परत फोन झाला ती:- सॉरी , रागावून बोललो आपण दोघे तो:- मला कळलं आहे, "आपण कधीच भेटू शकणार नाही" ती:- का? तो:- आपण समांतर विश्वात (मल्टिव्हर्स) आहोत , त्यांच्याकडा जुळल्यानेच फोन लागला ती:- बर तडफड तिकडेच मग !

वाचने 11559
प्रतिक्रिया 22

प्रतिक्रिया

एक थोडी मोठी, विस्तृत कथा मस्त करता येईल यावर

+१

तो:- ओके , शेवटचा चान्स , संध्याकाळी शिवाजी पार्कात भेट ती:- तिथे जेल आहे वेडी आहेस का?
या दोन ओळी कन्फ्युजिंग आहेत.

थोडी अवघड पण आवडली

रन लोला रन सिनेमा आठवला.

"अमर फोटो स्टुडिओ" ची गोष्ट अशीच काहीशी आहे. त्यातच थोडाफार बदल केल्यासारखा वाटला. पैजारबुवा,

लेखकाच्या विनंतीनुसार हा प्रतिसाद देत आहोत. ---–----–-- लेखकाचं मनोविश्व :- मी लिहिलेली कथा हि काल्पनिक विज्ञान कथा आहे , एका सारखे अनेक समांतर विश्व असतात , असं म्हणतात कि प्रत्येक समांतर विश्वात तेच जीव असतात , जस कि प्रत्येक विश्वात आश्लेषा आह. कथेत दोन विश्वाच्या कडा जवळ आल्याने. ,, एका विश्वातल्या आरुषचा दुसऱ्या विश्वातील आश्लेषाला फोन लागला आहे एका विश्वात शिवाजी पार्क हे मैदान आहे , भारत स्वतंत्र आहे , पण दुसऱ्या विश्वात इंग्रंजांचं सरकार आहे आणि शिवाजी पार्कात जेल बांधलं गेलेलं आहे. एक दोन अयशस्वी भेटीच्या प्रयत्नानंतर नंतर आरुषला हे उमगलं आहे पण अश्लेषाला हे अजिबात कळलेलं नाही शब्द संख्या मर्यादित असल्याने मनोविश्व लिहिण्याचा प्रपंच केला आहे. -----------

In reply to by साहित्य संपादक

100 शब्दांच्या कथेला 100 शब्दांचे स्पष्टीकरण! कुच पट्या नही... जाता जाता.. याच थीमवरती एक लईच भारी एनिमे मुवी आहे! नक्की बघा.. Your Name.

+१

+1

+1

.

+१

+१

+१

+१


वेगळ्या विषयावरची कथा आवडली.