मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

[शशक' १९] - रेडिओ, गाणी आणि संध्याकाळ

साहित्य संपादक · · स्पर्धा
कितने अजीब रिश्ते है यहां पे दो पल मिलते है, साथ साथ चलते है जब मोड आये तो बचके निकलते है
आणि…
मैने दिल से कहा ढूंढ लाना खुशी नासमझ लाया गम, तो ये गम ही सही
ही उदासवाणी गाणी रोज संध्याकाळी साडेपाच सहाच्या दरम्यान रेडिओवर पाठोपाठ लागायची आणि तो आनंदाने उसळायचा! दिवसभरातही लागायाची, तेव्हा लक्ष नसायचं पठ्ठ्याचं. साऱ्या ऑफिसने कामात वेग घेतलेला आणि हा डबा बॅगमध्ये ठेव, डेस्क आवर अशा कामात गुंतलेला. आता इतक्या वर्षांनंतर रॉकींग, ढिंच्याक गाणी लागतात संध्याकाळी रेडिओवर. त्याला मात्र ऑफिसातच रेंगाळत बसावेसे वाटते. ती गाणी आता रेडिओवर लागत नाहीत, त्याला कुठेतरी आत ऐकू येत असतात.

वाचन 5333 वाचनखूण प्रतिक्रिया 14

एमी Wed, 02/06/2019 - 18:49
ब्रेकअप/घटस्फोटाच्या आधी साडेपाचला लागणारी रेडिओवरची दुखी गाणी म्हणजे बागेत/घरी प्रेयसी/बायकोला भेटायला मिळणार याची आनंददायक चाहूल असायची. आता त्याचवेळी धिंच्याक गाणी लागतात पण याला प्रेयसी/बायको सोडून गेल्याने हा मनात दुखी गाणीच ऐकतोय. +१

प्रभाकर पेठकर गुरुवार, 02/07/2019 - 11:55
'पृथ्वीवर २/३ भाग पाणी आहे आणि १/३ भाग जमीन. म्हणजेच पृथ्वीचा पाया पाणी आहे. आणि जो पर्यंत पृथ्वीचा पाया पाणी आहे तो पर्यंत मानवी जीवनाहा पाया अश्रू असणार.' - वाहतो दूर्वांची जुडी - लेखकः बाळ कोल्हटकर. असं कांहीसं वाक्य वरील नाटकात होतं. शब्द चुकत असतील पण आशय असाच होता. आयुष्यात दु़:ख शाश्वत आणि अफाट आहे. आणि सु़ख किंचित आणि ते ही क्षणभंगुर. माणसाचा, सुखापेक्षा दु:ख गोंजारत बसण्यातच जास्त वेळ जातो.