[शशक' १९] - कोंडमारा

Primary tabs

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
2 Feb 2019 - 5:18 pm

आज ऑफीसहुन तो लवकरच परतला.
प्रमोशनचा आनंद लपवता येत नव्हता.

हळुच दार उघडलं... नको त्या अवस्थेत 'तो आणि ती'

धक्काच बसला. शांतपणे बाहेर थांबला.
चल, तु येतेय का ? की त्याच्याबरोबर येणार ?

'मला माफ कर प्लीज'

हं, जाऊ देत. आज बाळाचा वाढदिवस.
काय घेऊन येऊत त्याला आपण ?

नाही, नको.

'काय गं तुझा वर्गमित्र ना तो, माझी तू ओळख करुन दिलेली आठवते.
'त्याच्या नौकरीसाठी आपण आर्थिक मदत केली,
राहण्यासाठी घर नव्हतं, भाड्यासाठी पैसे दिले.
अपघात झाला म्हणुन हॉस्पिटलचा खर्च.
तोच ना तो. काहीतरी आठवत तो विचार करु लागला.

झालं ते झालं.
काही गोष्टी विसरलेल्याच बर्‍या.

आणि तो बाहेर पडला.

प्रतिक्रिया

नावातकायआहे's picture

2 Feb 2019 - 7:44 pm | नावातकायआहे

+१

सतिश म्हेत्रे's picture

2 Feb 2019 - 8:01 pm | सतिश म्हेत्रे

ज्यांना कळाली त्यांनी कृपया समजावून सांगावं ही विनंती.

खिलजि's picture

2 Feb 2019 - 8:10 pm | खिलजि

अहो काय राव , समजली नाय म्हणताय .. त्याची बायको आणि तिचा मित्र आणि डिंगडोंग आणि तो स्वतः संजय ( महाभारतातला ) .. वाजली का घंटी आता तरी ... टिंग टॉंग .. टिंग टॉंग ... लेखक राव तुम्ही आमच्याकडन घेऊन टाका बरं +१ .. त्याच काय आहे , सध्या ह्ये बराच बघायला मिळतंय , घरातलंच कुणीतरी दुसरीकडं सापडतंय ..

मराठी कथालेखक's picture

2 Feb 2019 - 9:32 pm | मराठी कथालेखक

नीटशी समजत नाहीये. कोणते संवाद कोण म्हणत आहे हे नीट उमजत नाहीये. कथालेखकांना सुचवावेसे वाटते की कथा समजायला सोपी असेल याकडे कृपया लक्ष द्या.

गामा पैलवान's picture

2 Feb 2019 - 9:55 pm | गामा पैलवान

विसरायची गोष्ट अशी की ते मूलसुद्धा लेखकाचं नसून त्याच्या बायकोच्या जाराचं आहे.

आपल्याकडून +१.

-गा.पै.

किसन शिंदे's picture

3 Feb 2019 - 12:08 am | किसन शिंदे

-१

ज्योति अळवणी's picture

3 Feb 2019 - 12:16 am | ज्योति अळवणी

कळली नाही

वकील साहेब's picture

3 Feb 2019 - 1:09 pm | वकील साहेब

शशक मध्ये कळेल अशी कथा लिहीण म्हणजे २०-२० सामन्या पेक्षा अवघड.

प्रचेतस's picture

3 Feb 2019 - 2:25 pm | प्रचेतस

+१

जव्हेरगंज's picture

3 Feb 2019 - 2:59 pm | जव्हेरगंज

गूढ वाटली.
म्हणूनच +१

ज्ञानोबाचे पैजार's picture

4 Feb 2019 - 9:25 am | ज्ञानोबाचे पैजार

आवडली
पैजारबुवा,

सिद्धार्थ ४'s picture

4 Feb 2019 - 1:28 pm | सिद्धार्थ ४

+१

प्रशांत's picture

7 Feb 2019 - 1:50 pm | प्रशांत

आवडली

राजाभाउ's picture

13 Feb 2019 - 12:59 pm | राजाभाउ

+१