Skip to main content

[शशक' १९] - कोंडमारा

लेखक साहित्य संपादक यांनी शनिवार, 02/02/2019 17:18 या दिवशी प्रकाशित केले.
आज ऑफीसहुन तो लवकरच परतला. प्रमोशनचा आनंद लपवता येत नव्हता. हळुच दार उघडलं... नको त्या अवस्थेत 'तो आणि ती' धक्काच बसला. शांतपणे बाहेर थांबला. चल, तु येतेय का ? की त्याच्याबरोबर येणार ? 'मला माफ कर प्लीज' हं, जाऊ देत. आज बाळाचा वाढदिवस. काय घेऊन येऊत त्याला आपण ? नाही, नको. 'काय गं तुझा वर्गमित्र ना तो, माझी तू ओळख करुन दिलेली आठवते. 'त्याच्या नौकरीसाठी आपण आर्थिक मदत केली, राहण्यासाठी घर नव्हतं, भाड्यासाठी पैसे दिले. अपघात झाला म्हणुन हॉस्पिटलचा खर्च. तोच ना तो. काहीतरी आठवत तो विचार करु लागला. झालं ते झालं. काही गोष्टी विसरलेल्याच बर्‍या. आणि तो बाहेर पडला.

वाचने 5948
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

+१

ज्यांना कळाली त्यांनी कृपया समजावून सांगावं ही विनंती.

अहो काय राव , समजली नाय म्हणताय .. त्याची बायको आणि तिचा मित्र आणि डिंगडोंग आणि तो स्वतः संजय ( महाभारतातला ) .. वाजली का घंटी आता तरी ... टिंग टॉंग .. टिंग टॉंग ... लेखक राव तुम्ही आमच्याकडन घेऊन टाका बरं +१ .. त्याच काय आहे , सध्या ह्ये बराच बघायला मिळतंय , घरातलंच कुणीतरी दुसरीकडं सापडतंय ..

नीटशी समजत नाहीये. कोणते संवाद कोण म्हणत आहे हे नीट उमजत नाहीये. कथालेखकांना सुचवावेसे वाटते की कथा समजायला सोपी असेल याकडे कृपया लक्ष द्या.

In reply to by मराठी कथालेखक

विसरायची गोष्ट अशी की ते मूलसुद्धा लेखकाचं नसून त्याच्या बायकोच्या जाराचं आहे. आपल्याकडून +१. -गा.पै.

-१

शशक मध्ये कळेल अशी कथा लिहीण म्हणजे २०-२० सामन्या पेक्षा अवघड.

आवडली पैजारबुवा,

आवडली

+१