विलक्षण १.०

Primary tabs

दीपक११७७'s picture
दीपक११७७ in जनातलं, मनातलं
9 Jan 2019 - 11:18 am

अमेरिकेतील अलबामा राज्यातील गॉंडस डेन शहरातील एका विद्यर्थ्याला त्याच्या मित्रांची खिल्ली उडवण्याची-टिंगल करण्याची इच्छा झाली. जसे कोकिळेला चिडवण्यासाठी तिच्या कुहू-कुहू नंतर आपण ही कुहू-कुहू करतो तसले. पण या मुलाची पद्धत एकदमच वेगळी होती, केवळ वेगळी नसून विलक्षण सुद्धा होती. ज्याला केवळ अतींद्रिय क्षमताच म्हणता येईल.

हा विद्यार्थी त्याच्या मित्रांना चिडविण्यासाठी जे करायचा ते म्हणजे मित्र जे बोलेल तेच, ज्या चालीत बोलेल त्याच चालीत, आणि विलक्षण म्हणजे मित्र ज्या क्षणात बोलला त्याच क्षणात हा सुद्धा बोलायाचा.

त्या विद्यार्थ्याच नाव होत फ्रांक रेन्स!

फ्रांक रेन्स टेलीव्हिजन शो १

फ्रांक रेन्स टेलीव्हिजन शो २

विद्यार्थी जीवना पासूनच त्याने त्याच्या अतींद्रिय क्षमतेचे प्रदर्शन करायला सुरुवात केली व लवकरच त्याला अंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त झाली.
जगभरातील कोणत्याही भाषेत समोरच्याने बोलायला सुरुवात केली की फ्रांक सुद्धा त्याच क्षणी त्याच भाषेत बोलत असे.

एकदा न्युयॉर्क मध्ये फ्रांक यांची अदभूत परिक्षा घेण्यात आली. यात एका डॉक्टर ने अत्यंत अवघड अश्या चिकित्सा शास्त्रात वापरल्या जाणा-या शब्दांचा भडीमार असलेल्या २० पानांचा लेख तयार केला. मग हा डॉक्टर एका कोप-यात उभा राहिला व दुस-या कोप-यात फ्रांकला उभा केले गेले. डॉक्टर ने ज्याक्षणी लेख वाचायला सुरु केला त्याच क्षणी फ्रांक ने सुद्धा तेच उच्चारायला सुरुवात केल. हे सर्व एका टेपरेकॉर्डर मध्ये रेकॉर्ड केले गेले. नंतर हे रेकॉर्ड जेंव्हा त्या डॉक्टरला ऐकवले गेले तेंव्हा तोही फ्रांकची विलक्षण शक्ती पाहून आश्चर्य चकित झाला.

कलालेख

प्रतिक्रिया

विजुभाऊ's picture

9 Jan 2019 - 12:08 pm | विजुभाऊ

खरेच विलक्षण आहे हे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Jan 2019 - 1:18 pm | डॉ सुहास म्हात्रे

अती अती विलक्षण आहे हे !!!

अद्भुत आहे, विलक्षण २.० च्या प्रतीक्षेत.

मराठी कथालेखक's picture

9 Jan 2019 - 2:55 pm | मराठी कथालेखक

ही रंजक माहिती इथे दिल्याबद्दल धन्यवाद

अनिंद्य's picture

9 Jan 2019 - 3:01 pm | अनिंद्य

जबरदस्त !

नि३सोलपुरकर's picture

9 Jan 2019 - 4:28 pm | नि३सोलपुरकर

अद्भुत आहे .

२.० च्या प्रतीक्षेत

चांदणे संदीप's picture

9 Jan 2019 - 5:06 pm | चांदणे संदीप

एखादा माणूस काय बोलेल कसा बोलेल हे त्याच्याकडे पाहून त्याच्यासारखेच आणि नेमके तेच बोलणे, त्याच वेळी, सरावाने जमू शकते पण न बघता बोलणे हे म्हणजे अद्भुत आहे!

Sandy

खिलजि's picture

9 Jan 2019 - 7:33 pm | खिलजि

मस्तय

दीपक११७७'s picture

11 Jan 2019 - 3:20 pm | दीपक११७७

प्रोत्साहन दिल्याबद्दल सर्वांचे आभार

राघव's picture

15 Jan 2019 - 7:55 pm | राघव

च्यायला.. काय काय असतं जगात! अफाट.. माहित नव्हते या व्यक्तीबद्दल आतापर्यंत. धन्यू. :-)

पैलवान's picture

16 Jan 2019 - 12:53 pm | पैलवान

विलक्षण १.० आधी वाचला नव्हता.

विलक्षण २.० शीर्षक वाचून वाटलं होतं की कोणा रजनी फॅनने कौतुकास्पद लेख लिहिला असेल. मग एकदा तो वाचला. आणि मग १.० शोधला.

हा माणूस आता असता तर प्रिया वारियार पेक्षा जास्त वायरल झाला असता.