किंचित अस्वस्थ वाटते आहे !

Primary tabs

फुत्कार's picture
फुत्कार in जे न देखे रवी...
6 Jan 2019 - 12:30 am

उत्स्फूर्तपणे की कोणी घडवून आणते आहे?
याच विचारांनी किंचित अस्वस्थ वाटते आहे !

उगम असो काहीही घटत्या तीव्रधार घटनांचा
वाहवत रहावे की कोरे? कूट ग्रासते आहे

समर्थन विचारांना वा तीव्र निषेध असू शकतो
समाज माध्यम त्यास्तव का वेठीस जुंपते आहे?

होवो थोडा वा जबरदस्त परिणाम प्रतिक्रियांचा
खारीचा वाटा देता, मन का सुखावते आहे?

काय महत्वाचे, कशास प्राधान्य योग्य द्यावे?
राष्ट्राचे व नागरिकांचे निधान कोणते आहे?

इतके सारे पडले का हो प्रश्न मूढ कोणा? अन्
उत्तर त्यांना का उलटे माझ्याहून मिळते आहे?

घडत्या घटनांनी किंचित अस्वस्थ वाटते आहे
किंचिततेचे तुम्हास का भय भेडसावते आहे?

संदीप लेले

कवितासमाज

प्रतिक्रिया

खिलजि's picture

7 Jan 2019 - 2:26 pm | खिलजि

जे जे घडले आणि घडत आहे

बदल होत जाणे , स्वाभाविक आहे

कलिमनाचा तुरा खोल रुजत चालला

हरिनामाची तिरडी जात आहे

कुणी काय राखतो ?

कुणी काय ठेविले ?

कसे धरून आणिले ?

हिशेब सारा , वर होत आहे

जडत्वाची व्याख्या सर्वत्र लागू

जा सत्वरी, नका वेळ दवडू

द्यावा जरा खांदा

पुढे व्हा पुढे, तिरडी जात आहे

सिद्धेश्वर विलास पाटणकर