Catharsis - 1 घालमेल

अमलताश_'s picture
अमलताश_ in जनातलं, मनातलं
1 Jan 2019 - 3:12 pm

तर आडवी आली ती जात.

म्हणजे कसं, तो एक राजा नाही का जो जन्माला यावा पण शेजाऱ्याच्या घरी असं सगळ्यांना वाटत असतं? तस्साच attitude . पण इथे झाला घात.

सोयी-सुविधांनी सज्ज असं समुद्रा - काठचं राज्य. त्यात गाई गुरं , कुत्रे मांजरं , असलेलं , हसतं खेळतं घर. अश्या घरावर स्वारी केली आंतरजातीय विवाहाने.

मग राजे लढले.

लढाईच्या गोष्टी तेवढ्याच मधुर असतात हं , बाकी सगळं कडू.

म्हणजे कल्पना करा , तुम्ही ज्या मुलांना कष्टाने वाढवलं , आपल्या पायावर उभं राहायला शिकवलं , ती मुलं चक्क त्या ज्ञानाचा वापर करू लागली ? काय ते संकट. निर्णय काय घेतात, तार्किक उत्तरं काय देतात .... कैच्याकै !!!

मग करावं काय ते कुणाला कळेना. मग उगीचच 'समाजमान्य' म्हणून घरी सुद्धा मान्य असा नियम झाला. " निर्णय तू घेतलाच आहेस, पण हे लग्न झालं तर या घराची दारं तुझ्यासाठी कायमची बंद ".

वाटलं यार एकचदा "Alohmora " काम करो. wand हवीय मला. पण नाही. ह्या वेळी स्वतः विश्वकर्मा सुद्धा तिथे माझ्यासाठी उघडणारं दार बनवू शकणार नाही हे मला माहित होतं .

यात काही दिवस, नव्हे काही वर्षं गेलीत. हि गोष्ट त्या वर्षातल्या इमोशनल baggage ची. वरवरच्या हसण्याची. रुतून बसलेल्या संघर्षाची. मऊ मऊ वाळूची. वाईट्ट हरण्याची.खारट वाऱ्याची. सोडलेल्या किनाऱ्याची. आणि किनारा आणि समुद्र दोन्ही मनापासून आवडणाऱ्या होडीची.

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

श्वेता२४'s picture

1 Jan 2019 - 6:17 pm | श्वेता२४

आवडलं

पिशी अबोली's picture

2 Jan 2019 - 12:29 pm | पिशी अबोली

छान.

मनस्वी मानस's picture

4 Jan 2019 - 10:12 am | मनस्वी मानस

समकालीन पिढीतील अनंत प्रेमविवाहग्रस्त जोडप्यांची व्यथा अगदी मोजक्या आणि नेमक्या शब्दांत मंडळीत त्याबद्दल विशेष कौतुक!!!

कित्येकदा 'जात' हा मुख्य अडसर असला तरी प्रामुख्याने कालपर्यंत स्वतःचा हातरुमालदेखील आमच्या पसंतीने घेणारा मुलगा/मुलगी अचानक आयुष्याचा एवढा मोठा निर्णय घेऊन येतो/येते, हेच मुळी पालकांच्या पचनी पडत नाही. मग त्याकरिता काहीही कारण पुरते, किंबहुना शोधून काढतात हे लोक.

कहर म्हणजे काही काळानंतर राग निवळला तरी 'समाज काय म्हणेल?' ह्या भीतीपोटी (अर्थात हे सर्व त्यांच्या मनाचे खेळ असतात, बऱ्याचदा सो कॉल्ड समाजाला काहीच देणेघेणे नसते) किंवा स्वतःचा इगो सुटत नसल्या कारणाने स्वतः आणि मुले दोघांचा त्रास उघड्या डोळ्यांनी पाहत बसतात ही मंडळी.

वाढते वय आणि बदलत्या कालानुरूप स्वतःच्या जगण्याविषयीच्या संकल्पना ठराविक काळाने पुन्हा तपासून त्यात सकारात्मक बदल केल्यास सर्वांचेच आयुष्य सुकर होते. हीच वेळ जेंव्हा आपल्यावर येईल तेंव्हा आपण ह्या गोष्टीकडे डोळसपणे पाहत जजमेंटल न होता आपल्या मुलाना आधार देऊ एवढाच काय तो निर्धार आपण करू शकतो.

बाकी अमलताश' टोपणनाव विशेष आवडल्याचे देखील इथे नमूद करावेसे वाटते.

- मनस्वी 'मानस'