अतृप्त आत्मा 13

प्रमोद पानसे's picture
प्रमोद पानसे in जनातलं, मनातलं
17 Dec 2018 - 7:24 pm

एरवी आमच्याशी प्रेमाचे धड चार शब्दही न बोलणारी आमची बायडी आज आमच्या विरहाने एवढी व्याकुळ झालेली बघुन आम्हालाही गलबलुन आलं.

थोड्या वेळात सावरलेली बायडी अचानक सावध होत तिथुन उठली.आणी आलेच असं म्हणत स्वयंपाकघरात गेली.तीच्या एकंदर हलचाली संशयास्पद वाटल्याने आम्हीही तरंगत तीच्या मागे गेलो.आत सर्व सन्नाटाच होता .भराभरा तांदुळाचं पिंप उघडत तीने आतुन रुमालाचं एक छोटंस गठुडं बाहेर काढलं.

अॉ ! आम्ही आश्चर्याने बघत होतो.तीथेच ओट्यावर ते उघडत तीने पुडक्यातल्या नोटा त्यात उपड्या केल्या.एकंदरीत प्रकार बघुन आम्ही हादरलोच.

रुमालात आधीच्याच बर्याच नोटा बांधलेल्या दिसल्या.अंदाजे वीस पंचवीस हजार तरी असावेत.

काल संध्याकाळ पासुन भुत बनुन आम्ही बाबल्या आणी नानाला ज्या पॉवरचा धक्का दिला नव्हता तो धक्का आत्ता आम्हाला बसला होता.

मेल्यावर देखील आपल्या कुटुंबाच्या काळजीने आम्ही काल नानाला आमच्या दहशतीने जे द्यायला भाग पाडलेलं होतं ते एका क्षणात शुन्य झालं.

आमची बायडी भलतीच कर्तव्यदक्ष निघाली .आमच्या अपरोक्ष तीने बरीच माया राखली होती. उर भरुन आलं गर्वाने.आम्ही मुर्ख समजत होते तीनेच आज आम्हाला संसार कशाला म्हणतात हे दाखवलं होतं.

एवढ्यात दरवाजापाशी हालचाल जाणवल्याने आम्ही तिकडे वळलो.मंदा मावशी आत येत होती.

या थेरडीला सगळीकडे लक्ष घालण्याची फार सवय .जरा कुठं काही अक्षेपार्ह्य अढळलं की खोलांत शिरुन चौकश्या करणे ,समजलेल्या गोष्टीची गावभर बोंबाबोंब करणे असले भोचक कारभार करण्यात भयंकर उत्साही होती ती.आमचं जयडीबरोबरचं प्रेम प्रकरण देखील याच बयेने आप्पाच्या निदर्शनास आणून दिलेलं.

जयडीची कॉलेजला जाण्याची आणी आमची प्रेसमधे जाण्याची वेळ एकच कशी काय ?आणी कॉलेजला निघालेली जयडी हिच्या लेकीसोबत का जात नाही ?? एकच वर्ग दोन वेगवेगळ्या वेळी कसा चालू होतो ??? हे सर्व प्रश्न तीलाच सर्वात आधी पडलेले.हिच्याच कार्टीने आमचं झेंगट हिच्या कानी घातलेलं.आणी एक दिवस वाडीतच दबा धरुन बसलेल्या मावशीने जयडीला आमच्या हातात हात घेतलेलं रंगेहात पकडलं.

स्वयंपाकघरात घुसून आमच्या कलंत्राच्या खाजगी गोष्टींत लक्ष घालू पहाणार्या मावशीला कोणताही विचार न करता आम्ही मागे ढकलले.आमच्या कुटुंबाचा आर्थिक घोटाळा तीच्या नजरेस येउ द्यायचा नव्हता आम्हाला.

धप्पदिशी मागे असलेल्या खुर्चीचा आधार घेत ती जमिनीवर आदळली.आणी भयचकीत होत आमच्या दिशेने बघु लागली.धक्का मारताना झालेल्या स्पर्शाने तीला आमचं दर्शन घडलं होतं.

"बापु !! मला बापुने ढकललं ,आत्ता इथे दिसला बापू" तीला सावरायला आलेल्या महिलामंडळाला ती रडत बोंबलत सांगू लागली.

झालेल्या गदारोळाने बायडा देखील भराभरा पिंपाचं झाकण लावत बाहेर आली.

आता हे सगळं प्रकरण गावभर होणार होतं.आणी ते होउ नये म्हणुन म्हातारीला गप्प करणं गरजेचं होतं.

भेदरलेली मंदा मावशी भराभरा उठुन तीच्या खोलीकडे निघाली .नाइलाजाने आम्हालाही तीच्यामागे जावे लागले.घरी पोहचल्या पोहचल्या तीने हात पाय धुवून देवासमोर बैठक मारली.आणी रामरक्षा म्हणायला सुरुवात केली.आम्ही देखील लगेच हात जोडुन तीच्याच शेजारी बैठक जमवली.

नाट्यलेख

प्रतिक्रिया

टवाळ कार्टा's picture

17 Dec 2018 - 8:01 pm | टवाळ कार्टा

खिक्क

नावातकायआहे's picture

17 Dec 2018 - 9:04 pm | नावातकायआहे

भाग मोठे टाका कि ओ मालक....

आनन्दा's picture

18 Dec 2018 - 10:06 pm | आनन्दा

येवद्या

जेडी's picture

18 Dec 2018 - 11:00 pm | जेडी

सर्व भाग वाचले. पुढच्या भागाची वाट पाहतेय. मजा आली वाचताना.

पद्मावति's picture

19 Dec 2018 - 2:47 pm | पद्मावति

<<<तीने हात पाय धुवून देवासमोर बैठक मारली.आणी रामरक्षा म्हणायला सुरुवात केली.आम्ही देखील लगेच हात जोडुन तीच्याच शेजारी बैठक जमवली.>>> हे मस्तंय =)) पु.भा.प्र

हॅहॅहॅ मस्त लिहिलंय एकदा, फक्त मोठे भाग टाका ना प्लिज

शित्रेउमेश's picture

20 Dec 2018 - 8:53 am | शित्रेउमेश

रामरक्षा म्हणायला सुरुवात केली.आम्ही देखील लगेच हात जोडुन तीच्याच शेजारी बैठक जमवली.

लय भारी.....

दुर्गविहारी's picture

20 Dec 2018 - 9:52 am | दुर्गविहारी

मस्तच लिहीताय पानसे साहेब, फक्त मोठे भाग टाका.

नावातकायआहे's picture

19 Apr 2019 - 8:41 am | नावातकायआहे

पु भा प्र!!!!!!१

आम्हाला वाटल गुरुजींची खेचली असेल, असो वेगळी कथा आवडली.

वीणा३'s picture

19 Apr 2019 - 11:09 pm | वीणा३

पु भा प्र!!

नावातकायआहे's picture

19 Jun 2019 - 2:09 pm | नावातकायआहे

आत्मा विलीन झाला कि काय?