अडनिडी मुलं-२

जेडी's picture
जेडी in जनातलं, मनातलं
16 Dec 2018 - 8:31 pm

मागच्या भागात काही मुलांच्या हट्टीपणाबद्दल लिहिले, काहींच्या मानसिक प्रोब्लेम बद्द्ल लिहिले... आता पोंगडअवस्थेतेतिल परिस्थिती मधुन उद्भ्वनार्या प्रश्नांविषयी...

टिचर वर्गात आली... शिकवायला सुरवात... रोज पंजाबी घालणारी टिचर आज छान, पारदर्शक साडी नेसली होती. मुलं थोडी बावरुन ... आपआपल्या वह्यात डोकं खुपसुन... थोड्या वेळाने टिचर वर्गात फेर्या मारु लागली.. आता मुलांना टिचरला अगदी जवळुन पाहणे शक्य झाले... टिचर ने वहीत डोकावले.. आणि पुढे पाठ वळताच... "कैसी दिख रही रे, मस्त ऐटम, तेरे को कैसी लगती" , एकजण चार पाच लोकांना आवाज जाईल इतपत जोराने ... टिचर ने मागे वळताच.. एक मस्त स्माईल... टिचर ने एक टपली मारली फक्त... दुसरे काय करणार होती?

एकजण स्वप्नातली राजकुमारी रोज रफ बुकवर काढायचा... त्याला सुटेबल वाक्य लिहायचा... पुर्ण वही अशा स्केचेस नी भरली होती... मुलींना तो काय काढतो ह्या बद्दल उत्सुकता होती.. मग तो क्लासमध्ये नसताना त्यांनी त्याची ब्याग उचकटुन पाहिली... तर तो छान छान स्केचेस काढुन त्या मुलीला कोठे पाहीले, कशी दिसते, कोणत्या ड्रेस मध्ये छान दिसते, कोणत्या ड्रेस मध्ये आपल्याला आवडेल... असे बरेच लिहिले होते.

एक मुलीबद्दल लेक सांगत होती... ती मुलगी खुप हुशार आहे पण ती दर आठवड्याला एक बोयफ्रेंन्ड बदलते. शिवाय तिच्या बोयफ्रेंन्डस ला नंबर आहेत. नंबर १,२,३,४,५,६,७,८,९,१०.... अजुन एक समजलेली गोष्ट म्हणजे तीला आई नाही.घरी कोणीच समजावायला नसल्याने ती असे करत असेल का?

अजुन एक मुलगी खुप हुशार, ९९ मार्क्स मिळाले की आख्खे खानदान १ मार्क कोठे गेला म्हणुन विचारणार?त्या एक मार्कचा तिला हिशोब द्यावा लागणार म्हणुन ती मुलगी सतत धास्तावलेली.. तिची आई डॉक्टर किंवा अशीच काही मेडिकल रिलेटेड जॉब करणारी . तिच्या हॉस्पिटलच्या शिफ्ट्स .. भरीतभर तिला एक सिनिअर केजीत असणारी बहीण . त्या छोट्या मुलीलाही तिला सांभाळावे लागायचे . घरात आई वडिलांची सतत भांडणे . त्या प्रेशर ने ती वैतागलेली .प्रेमासाठी आसुसलेली . मुलीजवळ तासंतास रडणारी ."वेगळं का राहत नाही?", असे एकदा माझ्या मुलीने विचारलेच. तर ती सरळ म्हणाली ,"गुडियाला कोण सांभाळायचं ?" असे ते म्हणतात ,पण शाळेतून घरी आले की अभ्यासाबरोबर तिला सांभाळायचे काम माझेच . अशा वातावरणातच तिला एक सोसायटीला मुलगा आवडू लागला , त्याच्यावर एकतर्फी प्रेम करायला लागली.त्याच्या साठी चिट्ठ्या काय ,कविता काय असे बरेच उद्योग करायची. पण ते सर्व स्वतःजवळच ठेवायची . आई बापाला तिच्याकडे बघायला सवड कोठे होती ? घरी एकत्र आले कि भांडणे . तिला जास्त काय विचारायची तर पंचाईत . सतत चेहऱ्यावर बारा वाजलेले. म्हणून पोरी पण टाळायच्या . एक दिवशी तिने स्वतःच त्या मुलाला प्रपोज केले . तो मुलगा ठामपणे नाही म्हणाला .अजून आपण खूप लहान आहोत आणि मला माझ्या करिअर वर कॉन्सन्ट्रेट करायचे आहे असे म्हणाला .मग तर हिने खूप दिवस सदम्यातच काढले . तिच्या कवितांना पूर आला . नशीब हे सर्व दहावीच्या सुरवातीलाच पार पडले आणि पोरगी क्लास शाळेत रमली .दहावीला १० सिजीपीए . मनातून मी देवाचे आभारच मानले .

अजून एक सांगायचे म्हणजे माझी लेक आई बरोबर सगळे शेअर करते तर लेक तिला सांगायची, "आईला सर्व सांग , मन मोकळं कर, म्हणजे जास्ती टेन्शन येत नाही". तर ह्या पोरीचा विचार..आपणही आपल्याला वाटणाऱ्या प्रेमाबद्दल आईला सांगावे . पोरगीने ठरवले आईला आदी आपल्या अजून एक मैत्रिणीच्या प्रेम कहाणीबद्दल सांगावे म्हणून तशी बोलायला आईबरोबर सुरवात केली तर आईने जमदग्नी अवतार धारण केला . त्या मैत्रिणीच्या घरी सांगण्याची धमकी दिली . तिच्याबरोबरची मैत्री पूर्ण तोडण्यास भाग पाडले. का ? तर अशा वागणाऱ्या मुली वाईट असतात . स्वतःच्या लेकीला असे काय वाटतंय असे कळले असते तर? तर काय केले असते आईने ? नशीब आई डॉक्टर आहे .अशिक्षित नाही.

अजून एक मुलगी ,खूप हुशार . आई वडील घटस्फोटित . पण वडील बहुदा सर्व खर्च करत असावेत . आजी मामा कडेच राहते . मामाचाही घटस्फोट झालाय . पण बाकी सर्व घर वैगेरे अगदी टॉप च्या सोसायटीत. आई तशी चांगली शिकलेली आहे . मैत्रिणी वैगेरे अगदी मापकच . स्वतः अभ्यास ,खेळ ,योगा असा ब्लॅलन्स तिने पाळलाय . पण मुलगी मला ह्याच्यावर क्रश , त्याच्यावर क्रश असे बिनधास्त सांगते . लेकीने काही काळजीत विचारले... तर म्हणते ,"काळजी करू नकोस , हा फक्त क्रश आहे . तसेही मी लव्ह म्यॅरेज च करेन . आणि तेही वयाच्या पंचविशी नंतर". ही एक दिलासा देणारी गोष्ट होतीच. मला वाटले लागली जिगीषा ची गाडी रुळावर तर कसले काय ... आईला कॅन्सर झालाय असे सांगून लेकीजवळ रडली . परत परत ती ठीक झालीय ,ठीक होतीय असे लेक सांगायची. पण परवा तिच्या आईला पाहिले ,उभा न राहता यायची ताकद . केस पूर्ण गेलेले . न जाणो तिच्या आईचं काय झालं तर काय करायचे तिने? वडील पुसटसे पण आठवत नाहीत ... आता आईचे हे असे .. घरून खोटा आधार मिळाल्याने आई ठीक होणार ह्या भ्रमात पोरगी... तिलाही आई वडिलांच्या वेगळ्या होण्याची झळ लागलीय पण ती ते असे एकावेळी दोन तीन बॉयफ्रेंड ठेवून मी वरचढ असेल, माझे खपवून घेईल त्याच मुलाशी लग्न वैगेरे करीन अशी स्वप्ने बघते . स्टील शी गोट १० सिजीपीए .असेच यश तिला आयुष्यभर मिळो आणि तिच्या आईची तरी निदान तिला साथ मिळो.

तिसरी मुलगी , आई वडील रोज भांडण . वडील आईला सतत मारायचे .सतत संशय घ्यायचे . आईचं जगणं नको केलेलं वडिलांनी . पोरगी मग दिवसभर टी व्ही मध्ये तोंड खुपसून . अभ्यास नावालाही नाही . आईला नोकरी करणे भाग होते . आई बाप नोकरी करणार . बाप घरी आला कि आईला मारणार . पोरगी दिवसभर टी व्ही सिरीयल मध्ये मग्न . बसून बसून पोरगी गोल गब्बू झाली . सर्वच आत्मविश्वास गमावलेला . हुशार नसल्याने शाळेतही कोणी मैत्री करायचे नाही . सतत काहीतरी होतंय ,पोटात दुखतंय म्हणून घरी राहणार . घरी बसून खात राहणार . नंतर नंतर बाप तिलाही मारायला लागला . मग मात्र पोरगी बिथरली . तिला सतत टोकायला लागला . मला हिला मुलगी म्हणायची लाज वाटते असे एकदा बाप म्हणाला. मग मात्र पोरगी इरेला पेटली . ह्या घरातून निघून जाऊ नाहीतर मी घरातून पळून जाईन अशी पोरगी धमकी घालायला लागली . आईनेही मग विचार करून वेगळं व्हायचं ठरवलं. शेवटी आई वेगळी राहिली लेकीला घेऊन आणि पोरगीची गाडी रुळावर आली. अभ्यास करू लागली. मैत्रिणी मिळवायला लागली . दहावीला ८. सिजीपीए . पण पुढच्या गोष्टी खूप वाईट आहेत त्याविषयी पुढच्या भागात .

समाजजीवनमानआरोग्य

प्रतिक्रिया

प्रमोद पानसे's picture

16 Dec 2018 - 9:24 pm | प्रमोद पानसे

फँटास्टिक सब्जेक्ट

जेडी's picture

17 Dec 2018 - 11:56 am | जेडी

तुमचेही अनुभव शेअर करा

मालविका's picture

17 Dec 2018 - 9:22 am | मालविका

वाचतेय .
सीजीपीए म्हणजे काय?

सीबीएससी बोर्ड ला सिजीपिए मध्ये गुण मिळतात, टक्केवारीनाही. १० सिजीपीए म्हणजे ९५-१००% च्या रेंज मधले मार्क्स

मुलं अडनिडी म्हणण्यापेक्षा परिस्थिती अडनिडी म्हणायला हवी.

नाही, मुलंच अडनीडी, पुढेही लिहीन त्यात समजुन येईल

ठीक आहे, वाचेन, सध्या तरी मला ते योग्य वाटत नाहीये.

आनन्दा's picture

17 Dec 2018 - 9:50 am | आनन्दा

वाच्तोय

जेडी's picture

17 Dec 2018 - 12:01 pm | जेडी

धन्यवाद

विनिता००२'s picture

17 Dec 2018 - 12:47 pm | विनिता००२

माझा मुलगा पण मनातले सर्व सांगतो मला :)

मुलांना समजून घेवून वळणावर आणणे आवश्यक असते.

ते काही वयापर्यंतच शक्य आहे,त्याच्यापुढे नाही असे मला वाटते.

विनिता००२'s picture

18 Dec 2018 - 10:00 am | विनिता००२

तो आता २० वर्षाचा आहे :) त्याला योग्य ती स्पेस व रीस्पेक्ट मी देते. त्यामुळे त्यात काही फरक पडेल असे वाटत नाही. :)

गामा पैलवान's picture

17 Dec 2018 - 5:59 pm | गामा पैलवान

च्यायला, अडनिडे आईबाप म्हणा ! किंवा अडनिड्या आईबापांची मुलं म्हणा !!
-गा.पै.

मराठी कथालेखक's picture

17 Dec 2018 - 11:49 pm | मराठी कथालेखक

किस्से रंजक आहेत.
मला काठावर बसून वाचायला मजा येतेय.. पण जे यातून जात असतील ते स्वतःला कसे सांभाळत असतील याचा विचार करतोय.

माझा मुलगा अजून लहान आहे, पण पालक होणं अजूनच अवघड होतंय हे मान्य आहे. काही कारण माझ्या मनात अली.
१. मी लहान असताना (१९८०-१९९०), मध्ये मॉल / ब्रँड एवढे बोकाळले नव्हते. एकूणच सगळ्यांकडेच (माझ्या ओळखीतल्या कुटुंबाकडे) खरेदी दिवाळीलाच व्हायची वर्षभर नाही. कोणाकडेच सतत नवीन गोष्टी दिसायच्या नाहीत. त्यामुळे "त्याच्या कडे आहे, माझ्याकडे नाही" म्हणून वाईट वाटणं हा प्रकार कमी होता. आणि ह्या प्रकारचा त्रास मुलापेक्षा पालकांना जास्त होतो असं निरीक्षण आहे.
२. पालकांची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नसल्यामुळे, काही जास्त मागायची हिम्मत पण नव्हती, दिसत असायचं कि तेच कसे बसे भागवतायत. आता बऱ्याच जणांकडे आर्थिक सुबत्ता असते, आई बाबा खर्च करतायत तर मला पण कायतरी हवं असं मुलांना वाटतं.

आई वडील धड असलेल्या घरात सुद्धा मुलं विचित्र वागताना बघितली आहेत, आई वडिलांचेच प्रॉब्लेम असतील तिथे अजूनच गोंधळ असणं स्वाभाविक असावं :(

समीरसूर's picture

18 Dec 2018 - 3:15 pm | समीरसूर

मी तर आईसक्रीम, इडली, डोसा, भेळ, चॉकलेट, वगैरे पदार्थ पुण्यात आल्यानंतर (म्हणजे वयाच्या १७ व्या वर्षी) पहिल्यांदा खाल्ले. खरं म्हणजे काही काही पदार्थ अगदी उशीरा म्हणजे १९९६ मध्ये वगैरे (वयाच्या २० व्या वर्षी) खाल्ले. याचा एक फायदा मला असा झाला की माझे खाण्याविषयीचे कुठलेच नखरे नाहीत. मी अगदी काहीही खाऊ शकतो. जे तयार असेल आणि पटकन मिळेल ते घेऊन खाण्यावर माझा भर असतो. त्यामुळे खूप वेऴ वाचतो. हीच सवय माझ्या मुलात बिंबवण्याचा माझा प्रयत्न आहे. ;-) महत्वाच्या कामांना जास्त वेळ देणे आणि खाण्यासारख्या विषयावर कमीत कमी वेळ दवडणे महत्वाचे आहे.

बाकी आजकाल आई-वडीलच बिघडलेले आहेत तर मुलांना काय दोष देणार? सगळ्यात संतापजनक प्रकार म्हणजे लहान मुलांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात धीटपणे रिटर्न गिफ्ट मागणारी मुले! साला, आम्ही कधी कुणाकडे साधं बिस्कीट नाही मागीतलं लहानपणी. अशा मुलांच्या आई-बापांना चौकात फटके मारले पाहिजेत. मुळात हे वाढदिवस प्रकरणच फडतूस आहे. निष्कारण स्तोम! मी मुलाचा एक वाढदिवस करणार आणि त्यानंतर नो दिखाऊ समारंभ अ‍ॅट ऑल!! आधीच डिक्लेअर करून ठेवले आहे. बघू, कितपत जमते ते. मुलाला अजून एक शिकवण्याचा मानस आहे. अंधानुकरण टाळणे. दुसर्‍यांच्या अपेक्षांचं ओझं आपल्या मानगुटीवर घेण्यात काहीच अर्थ नाही.

सुबोध खरे's picture

18 Dec 2018 - 9:56 am | सुबोध खरे

गुण मिळवणे म्हणजे आयुष्याची इतिकर्तव्यता झाली असे समजणारे पालक पैशाला पासरी झाले आहेत.
CGPA १० आजकाल शेकडा ५० मुलांना मिळतात. मुलांना विषय किती समजला आहे हे समजून घेण्याची किती पालकांची तयारी आहे?
तुला ८ वीत १० CGPA मिळाला तर तुला आयफोन घेऊ असे सांगणारे पालक माझ्या पाहण्यात आहेत. उद्या हाच आय फोन विकत घ्यायचा तर तुला किती कष्ट करावे लागतील हे समजावून देण्याची तयारी असणारे पालक किती आहेत?
स्वतः दर वर्षी नवा आयफोन घेणारे पालक (एक महिन्याचा पगार दरवर्षी आयफोन मध्ये टाकणारे) मुलाला पैशाची किंमत कशी समजावून देणार?
या तुलनेत माझ्या मित्राची डॉक्टर बायको डोळ्यासमोर येते. मुलगा अतिशय हुशार आणि सालस आहे पण आळशी आहे. अभ्यास वेळेत करतो पण त्याला जमिनीवर ठेवण्याचे काम त्याच्या आईने केले आहे. १० वी, १२ ला उत्तम गुण मिळाले. नंतर मुंबई आय आय टी मध्ये इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीला प्रवेश मिळाला तरी आईचे म्हणणे एवढेच असते कि तुझे हात काही आभाळाला लागलेले नाहीत. आय आय टी मध्ये दर वर्षी ५००० मुले प्रवेश घेतात अशाच मोठ्या प्रथितयश संस्थेत प्रवेश घेणारी मुले असंख्य आहेत. मी सुद्धा उत्तम गुण मिळवून डॉक्टर झाले आहे.
या सर्व गोष्टीमुळे मुलगा जमिनीवरच आहे.
आमचा मुलगा पिझ्झ बर्गर शिवाय अभ्यासच करत नाही असे कौतुकाने सांगणारे पालक भरपूर आहेत पण पिझ्झा बर्गर चे वाईट परिणाम मुलाला सांगणारे पालक नगण्य आहेत. अमेरिकन संस्कृतीमधील केवळ सहज करता येणाऱ्या गोष्टींचे अवास्तव कौतुक करताना दिसतात पण तेथील लोक "अपार कष्ट" करत असतात हे समजावणार पालक अभावानेच आढळतात.
कोण चूक कोण बरोबर समजेनासे झाले आहे.

अनिंद्य's picture

18 Dec 2018 - 1:32 pm | अनिंद्य

वाचतोय, रोचक किस्से आणि मुद्दे आहेत.
सध्यातरी पुढच्या पिढीशी संवाद उत्तम आहे आणि काही मोठे इशू नाहीत.
नॉक ऑन द वूड.