ब्रह्मरन्ध्र

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जनातलं, मनातलं
16 Nov 2018 - 9:29 pm

ब्रह्मरन्ध्र
*************
आबा रिसबूड एकदम जिंदा दिल माणूस
लोभस रुबाबदार व्यक्तिमत्व
जय भवानी सहकारी पतपेढीत आबा चीफ रिकव्हरी ऑफिसर म्हणून कार्म करत होता
आबा खूप हुशार ऑफिसर होता
रिकव्हरी चे तंत्र -त्यातल्या खाचा खोचा -कायदे कोर्ट -पळवाटा यात आबा वाकबगार होता
आबा रिकव्हरी ला गेला अन हात हलवत परत आला असे कधीच घडले नव्हते
काही तरी वसुली झाल्या शिवाय आबा हालत नसे
संचालक मंडळाचा आबा विश्वासू माणूस होता
खर तर रिकव्हरी चे काम कटकटीचे -शिव्या शाप खाण्याचे धंदे
आबांचे नित्य काम असे कर्जदाराचे भेदरलेले चेहरे पाहणे -जप्तीच्या नोटीसींनी झालेली लाचार अवस्था -उधार उसनवार करून जमवलेले पैसे -
हे सारे रोज बघणे आबा चे नित्य कर्म असे -
कुठला खरंच नाडलेला कुठला नाटक करतो आबाच्या चाणाक्ष नजरेला समजत असे
जरी कर्जदार आबा समोर गरीब बनून गयावया करत असले ;त्याच्या हातापाया पडत असले तरी ते मनातून त्याला शिव्या शाप देतात तळतळाट देतात हे आबा ओळखून असे
आबा आपलं काम सगळी कडे दुर्लक्ष करत शांत डोक्याने करत असे
*
शारदा आबांची पत्नी
शारदा दिसायला सुंदर होती
रेखीव नाकडोळे -घनदाड केशसांभार -प्रमाणबद्ध बांधा
आबाला शोभेसी अशी होती
आबा पण दिसायला स्मार्ट होता
तांबूस गौर वर्ण दाट केस पाच फूट सात इंच उंची
कांदे पोहे कार्यक्रमात तिने आबा ला पाहिले अन ती त्याच्या प्रेमातच पडली
याची ती मूर्त तिने ह्र्दयाच्या कप्प्यात कोरून ठेवली
आबाचा होकार यावा म्हणून तिने देवाला साकडे घातले होते
होकार येई पत्तोर रुख्मिणी स्वयंवराची पाठ तिचे चालूच होते
खर तर आबा ला पण शारदा आवडली होती
त्याने होकार कळवला
शारदा च मन पाखरू झाले - जीवन धन्य झाले
दोघांचे सहजीवन मजेत चालू होते
*
आबा मुलता कोमल संवेदन शील मनाचा होता
पण जप्त्या लिलाव -कर्जदारांचा तो आक्रोश -अब्रू च्या भीतीने काळवंडलेले चेहेरे पाहात आबाच मन निब्बरास झालं होते
पैश्याची ताकद किती प्रचंड असते याच्यची त्याला समज होती
पैशाचे महत्व व व्यवहार तो जाणून होता
*
रात्री चे १२ वाजत आले होते आबांनी शेवटचा "टीचर "चा लास्ट पेग रिचवला
ऑफिस स्टाफ बरोबर पार्टी होती -मोठी रिकव्हरी झाली होती सारे जण खुश होते -रिकव्हरी चा शिल्प कार म्हणून आबाच सारे कौतुक करत होते
मित्रानो चला आटोपते घेऊ यात -उद्या परत कामाला जुंपायच आहे
आपण निघुयात
आबा आणखीन एक लास्ट पेग मारू सावंत म्हणाला
नको सावन्त -आज आधीच प्रमाणाबाहेर झाली आहे आपण निघू यात
सर्वानी गुड नाईट केले
-आबा जपून जा -आज अमोश्या आहे सावंत म्हणाला
ओके म्हणत आबा चालू पडला
मद्याने मनाचा डोक्याचा ताबा घेतला होता
मद्यधुंद अवस्थेत आबा चालत होता
डोळ्यावर मद्याची झापड आलेली होती
लटलटत्या पायाने झोक सांभाळत आबा चालत होता
पिपळाच्या पारा जवळ आल्यावर आबाच्या डोळ्यावर झोपेची झापड आली
तसाच उभा राहात आबाने डोळे मिटले -दीर्घ श्वास घेतला अन शांतपणे जरा वेळ डोळे मिटून उभा राहिला
डोळे उघडले अन आबा समोर ५-६ व्यक्ती उभ्या होत्या
आबाला अंधुकसे दिसत होते
तू आबा रिसबूड का ? असे कुणीतरी विचारत असावेे असे त्याला वाटले
हो मी आबा रिसबूड जीभ जाड झाल्याने तो तोंडातल्या तोंडात पुटपुटला
चला घुसा रे - याला सम्पवल्या शिवाय आता मुक्काम हलवायचा नाही
असं कुणी तरी बोलल्याचं त्याच्या कानी पडले
अन त्या ५-६ व्यक्ती नी त्याच्या शरीरात प्रवेश केला
आबा ला एक विचित्र अनोळखी संवेदना जाणवली
आबा स्वताशीच हसला -इंग्लिश व्हिस्की घेतली की असं काही होत म्हणत आबा चालू लागला
घरी आल्यावर शारदा कहि विचारणार इतक्यात त्याने पलंग गाठला व तो पलंगावर धाडकन पडला
गाडी ला पाठ टेकताच त्याला हळुवार झोप लागू लागली
शारदा काही विचारणार होती पण त्याची अवस्था बघता तिने विचार बदलला
शांत पणे तिने त्याचे शूज उतरवले मोजे काढले
बुटात मोजे सरकवले व बूट जागच्या जागी ठेऊन दिले
एक पातळीशी चादर त्याच्या अंगावर टाकली
दिवा विझवला
अन ती पण झोपायला गेली
*
नेहमी प्रमाणे आबाच रुटीन चालू होते
३-४ दिवस झाले अन आवास जाणवू लागले की आपल्या शरीरात कुणीतरी वास्तव्य करून राहिले आहे
कुणीतरी ठाण मांडून बसले आहे
*
आठवडा झाला अन आवास खूप हल्लक स वाटायला लागले
त्याचा अंगात त्राण असे राहिले नाही
कुणीतरी ठाण मांडून बसलेल अव्याहत आपला जीवन रस शोषित आहे अशी चमत्कारिक जाणीव त्याला झाली
वजन पण वेगानं घटत होत
डोळे पण आताओढल्यागत खोल जात होते
गोरापान चेहरा काळवंडू लागला होता -
शारदाच्या लक्षात हि गोष्ट आली
*
तुमची तब्बेत अचानक अशी खराब का झाली ?चेहरा काळवंडला -डोळे खोल गेलेत -शारदा विचारात होती
हो ना आग हल्ली खूप थकल्या सारखे वाटते -अंग गाळून गेल्यागत वाटते
उद्या आपण दवाखान्यात जाऊ -मला नाही बघवत -उद्या रजा घ्या -शारदा म्हणाली
ठीक आहे आबा म्हणाला
*
डॉ आफळे आबाला चेक करत होते बी पी नॉर्मल होते
डॉ नी एक लिस्ट देत म्हणाले ह्या टेस्ट्स आहेत त्या करून घ्या -रिपोर्ट आले की मी नंतर बोलतो
रक्त चाचण्या हृदय किडनी चे फोटो अश्या काही टेस्ट्स होत्या
आबा सा-या यंत्राखालून जाऊन आला
रिपोर्ट्स मिळायला ३-४ तास लागणार होते
आबाला भूक लागली होती
ते दोहे कॅन्टीन मध्ये गेले
नाश्टा करत असताना शारदा म्हणाली तुम्हाला भूक तर चांगली लागलेली दिसते
हो ना आबा म्हणाला जेवण व्यवस्थित जाते पण ऍन अंगी लागत नाही
आत कुणीतरी त्यावर ताव मारताय असे वाटते
तुमचा आपलं काही तरीच -शारदा हसून म्हणाली
*
रिपोर्ट्स मिळाले होते
डॉ ते बघत होते -रिपोर्ट्स नॉर्मल आहेत -पण काठावर आहेत
आता रिसबूड आपलं वय ५४ च्या आसपास
या वयात साधारण हृदयरोग बीपी शुगर आदी रोग शरीरात येण्याची शक्यता असते शेवंता शरीर पण एक मशीन आहे
काळजी घेणे जरुरीचं मी काही औषधे व टोनिक्स लिहून दिले आहेत ते घेत चला
दोन महिन्यांनी परत या
आणि हो -मद्यपान नॉन व्हेज टाळा पालेभाज्या खा तणाव मुक्त जीवन जागा
*
काळ पुढे सरकत होता
आबांचे जेवण व्यवस्थित चालू होते मात्र तब्बेत ढासळत चालली होती
*
आबां अंथरून धरलं
*
त्या रात्री दीड दोन चा सुमार असेल आबाला जाग आली
कुणाच्या तरी बोलण्याचे आवाज कानात पडले
काय रे आबा जागा झालास का ?
कोण बोलताय ?
अरे नालायका आम्ही वायू तत्वात असलेले कर्जदार तुझ्या शरीरात वसलो आहोत -आम्ही बोलतोय
मग असे रागावून का बोलता आहात -
मग काय करू? तुझ्या सारख्या हलकटा शी काय प्रेमाने बोलायचं अरे नालायका कीती चे संसार मातीत मिळवलेस तू वसुली च्या नावाखाली
आबाला अंदाज आला व म्हणाला मी काय केले मी तर माझे काम करत होतो
आबाला काय बोलावे सुचत नव्हते
त्याला भयानक गिल्ट आला होता
विचार करता करता आबाला झोप लागली
*
रात्री आबाला जाग आली दचकून तो उठून बसला
त्याला सारे आठवले
कर्जदाराचे मलुल चेहेरे
त्यांचे ते गयावया करत रडणे भेकणे
आबा वर वर दयाळू भाव चेहे-या वर आणत असला तरी तो मजा घेत असे
हळूहळू त्याला त्यात विकृत आनंद मिळू लागला
अन तो प्रसंग आठवला
त्या कर्जदाराच्या घरातील मुलीवावर त्याचे लक्ष गेले
मग ते असाह्यतेचा फायदा घेत ओरबाडणे
आबाला घाम फुटला
सार आठवलं -पण वेळ गेली होती
आबाला ग्लानी आली
शरीरात वसलेले ते सारे त्याला हसत होते शिव्या शाप देत होते
*
आबांनी ऑफिस ला जणं सोडले प्रकृती अगदी तोळामासाच झाली होती
सावंत त्याला भेटायला आला होता त्याचा खास मित्र
आबांची अवस्था पहाता तो चकित झाला
हाडाचा सापळा उरला होता
गप्पा सुरु झाल्या -आबा एक सांगू तुझा विश्वास नसेल पण माझा आहे
तुला बाधा झाली आहे तुझ्यावर कुणी करणी केली आहे
आबा म्हणाला ठीक आहे खर कि खोट नंतर बघू पण सांग उपाय काय ?
पुढे काय करायचे ?
गाणगापूर हा एकाच मार्ग गुरुदेव दत्ताचे स्थान आहे -सिद्धेश्वर गाणगापूरकर अधिकारी माणूस आहे तो मार्ग दाखवील
*
शारदाला सावंतने सारे समजावले
शारदा व आबा गाणगापूरला आले
सिद्धेश्वर नी पाहिल्या पाहिल्या ओळखले
मामा गुरव देवऋषी आहे त्याच्याशी मी बोलतो बघा तो काय म्हणतो ते
*
मामा गुरवाच्या मठात आबा व शारदा बसले होते
मामा सांगत होता -मोठी बलवान टोळी बसली आहे ठाण मांडून
आबा ला लगेच ते उमगले
मी काहीही मन्त्र म्हणतो असे म्हणत मामा मंत्रोच्चार करू लागला अन
कुणीतरी मामाला ढकलून दिल्यागत झाले
मामा जमिनीवर आडवा पडला
त्याला ऐकू येत होते - हे गोसावडूया आमच्या नादाला लागून नाग लै वाईट रीतींन मरशील - चाल हात बाजूला हो
मामा घाबरला होता
त्याने आबांची काही थातुर मातुर बोलत समजूत घातली
कसला तरी मंत्र दिला
*
आबा व शारदा घरी आले
आबाने अंथरून धरले
वेळ कालक्रमण करत होता
आबा थकला
सारा जीवन रस संपला होता
पहाटेची वेळा होती
आबाने जीव सोडला
*
शारदा सकाळी सातच्या सुमारास बेडरूम मध्ये गेली
अहो जागे आहात का ? चहा तयार आहे आणू का ?
तिने त्याला हलवत पुन्हा विचारले आबा ने काहीच हालचाल केले नाही -
तिने पुन्हा त्याला हलवले अन तिच्या मनात अशुभ शंका आली
तिने जोरात मामा जालनापूरकरांना हाक मारली
मामा देवी डॉकटर म्हणून नगरपालिकेतून रिटायर्ड झाले होते
मामा धावत आले हाक ऐकून
पाठोपाठ मन्या नेने पण आला
बघा ना हे उठत नाहीत -काळजीच्या स्वरात शारदा म्हणाली
मानानी नाडी तपासली त्यांना शंका आली अन मन्याला म्हणाले माझा स्टेथोस्कोप आन
त्यांनी चेक केले अन म्हणाले वहिनी आबा आपल्याला सोडून गेला
हे ऐकताच शारदाने हंबरडा फोडला
सोसायटी तले सदस्य पण जमा झाले
महिला वर्ग शारदेस धीर देत उठवले अन बाजूच्या खोलित नेल
मृत्यू झाला आबाच्या वायू रूप तत्वां शरीर सोडले होते
आपल्या कलेवराच्या अवती भवती त्याचे वायू रूप आकृती उभी होती
कवटी फुटून ब्रह्म रंध्रातून वायुरूप देह ब्रह्माण्डात विलीन होत नाही तो पर्यंत आबॅ स मुक्ती मिळणार नव्हती
आबा पाहात होता त्याला ऐकू येत होते
शारदा रडत होती तिच्या कपाळावर कुंकू नव्हते
अनुभवी बोलत होती
बर झालं आबा सुटला फार भोगलं त्यानं
हो ना बिछान्यावर खिळून होते सारे विधी बिछान्यात
बाहेरच्या खोलीत लोक्स बोलत होते
अरे मन्या आला का? तो म्हणजे गेला की गेला -एक सदस्य
बिचारा करतो त्याच काहीच नाही स्वताला बूड हलवायला नको नुसती पोपट पंची करायची - दुसरा सदस्य
३ तास लागणार -तो मस्त मिसळ चापून येणार
अरे पास काढायला वेळ लागतो बाबा -तिकडे पण नंबर असतात
आबा गप्पा ऐकत होता त्याला हसू येत होत
एकदाचा मन्या आला
मामा त्यानं हाक मारली
मामा सार सामान मिळालं हे मडकं -बांबू कापड फुल कुंकू गुलाल बुक्का सारे आणले आहे
सामान येताच मरगळलेल्या सदस्या मध्ये चैतन्य आले
चला सुरु करा मामा म्हणाले
बांबू ची तिरडी बांधली गेले त्या वर कापड
बॉडी आणा
आतून आबांची बॉडी बाहेर आणताना शारदेन हंबरडा फोडला
अनुभवींनी तिला धीर देत शांत केले
बॉडी तिरडीवर ठेवली कापड गुंढाळले
अरे बॉडी गच्चं बांधा लूज नाय पडायला पायजे
बॉडी तिरडी वर बांधली गेली
राम नाम सत्य है चा जप करत यात्रा निघाली
विधी झाले डाके फुटले अन बॉडी फर्नेस जवळ आणली गेली
सर्वानी हात जोडले
बॉडी फर्नेस मध्ये आत गेली
एक्झॉस्ट फ्यान चा मोठा आवाज झाला
कवटी फुटली असावी आत
पंचतत्वात प्राण पाखरू विलीन झाले
लोक पांगले
आपापल्या घरी निघाले

कथा

प्रतिक्रिया

प्रमोद पानसे's picture

16 Nov 2018 - 10:06 pm | प्रमोद पानसे

मस्त

माहितगार's picture

16 Nov 2018 - 11:26 pm | माहितगार

फ्रँकली कथेचा लेखकास अभिप्रेत मतितार्थ नीटसा उमगला नाही .

ज्योति अळवणी's picture

17 Nov 2018 - 7:12 pm | ज्योति अळवणी

असं का ते कळलं नाही. पण कथा चांगली लिहिली आहे. मात्र लेखन चुका कमी असत्या तर वाचायला अजून मजा आली असती