अवदसा

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जनातलं, मनातलं
12 Nov 2018 - 6:12 pm

लक्ष्मी पूजनाचा दिवस होता
दिलीप चित्रे झपाझप पावले टाकत निघाला होता
रात्र अमावास्येची असल्याने काळोख होता
मात्र रस्त्यावर दिवे पणत्या मिणमिणती होत्या
आसमंता तील वातावरणात एक भेसूर अमंगल अशी छटा जाणवत होती
दिवाळीची थंडी -वा-याचे गार सपके त्याला जाणवत होते
बाजूच्या रस्त्याने तो निघाला
एक शॉर्ट कट होता
रस्त्यावर अंधार मातला होता
तो रस्त्याने कडे कडेने चालला होता
त्याच वेळी समोरूम एक ट्र्क भरधाव वेगात आला -हेड लाईट्स फुल्ल ऑन होते
चित्रे रस्त्याच्या कडेला अंग चोरून उभाहोता
हेड लाईट्स च्या प्रकाशात त्याला दिसले तो उभा होता त्या बाजूलाच कुणी व्यक्ती झोपलेली होती
ट्रक चा आवाज प्रकाशा झोत याने ती खडबडून जागी झाली अन उठून बसली
चित्रेंनी प्रकाशाच्या झोतात तिचा चेहरा पाहिला-ते एक स्त्री होती
तिचा चेहरा ओंगळ वाणा होता केस विस्कटलेले होते
अंगावर जीर्ण वस्त्रे होती -मात्र डोळ्यात एक गूढ अमंगल भाव होता
चित्रेंची अन तिची नजरानजर झाली चित्रे घाबरला पण त्या नजरेत तो कैद झाला
कोण आहेस तू? अन इथे काय करते आहेस ?
ती क्षिणसी हसली -आज लक्ष्मी पूजन आहेना आज अवसेची रात आहे
मी अलक्ष्मी -अवदसा आहे
चित्रें गडबडला - स्वताला सावरत तो तिच्या जवळ बसला अन म्हणाला "माते नमन " मी तुझा दास आहे आपल्या पदराखाली मला घे
वेडा आहेस का ? अरे मी अवदसा आहे आज सारे जग माझी बहीण नारायणी ची आराधना करत आहे धन धान्य आरोग्य सारे लाभावे म्हणून तिचे पूजा करत आहेत - तू तिची आराधना कर
मी दुख्ख दैन्य दारिद्र्य आरोग्य याची देवता आहे माही आराधना करून तुला काय मिळणार ?
माते तू शुद्ध दैवत आहेस -लक्ष्मी अन अवदसा एकाच नाण्याच्या दोन बाजू -तू ऊर्जा देवता आहेस -मला पदरात घे
ती विकट पणे हसली व म्हणाली ठीक आले मी काय देऊ दैन्य दारिद्र्य आजारपण काय देऊ ?
काही नको मी सांगतो त्या प्रमाणे वाग - मी मानव आहे मला तू बुद्धीचे वरदान दिले आहे त्याचा वापर करत मी तुझ्या मदतीने लक्ष्मी मातेस तुझ्या चरणाची दासी बनवेन
तथास्तु - माझे स्मरण कर मी येईन मदतीस असे म्हणत ती अंतर्धान पावली
*
शेट दामोदरदास च्या पेढी वर लक्ष्मी पूजनाची धूम होतो
परिवारातले सदस्य काही खास मित्र हजार होते
शेट दामोदरदास मालदार आसामी
तिजोरीत पाच कोटी अन रत्नहार होता लाखो रु किमतीचा
पेढी प्रकाशाने उजळून निघाली होती
चित्र नी पिढीत प्रवेश केला
दारवानाने अडवण्याचा प्रयत्न केला चित्रेंनी भेदक नजरेने त्याचाकडे पाहिले -तो घाबरून संमोहित झाला
शेट दामोदरदास दीपावलीच्या हार्दिक शुभेछया चित्रे म्हणाला
शेटजी ने पाहिले अन म्हटले अरे हा कोण आहे बाबा -दारवन हा आत मंदी कसा आला ? तेला आदुगर बाहेर काढ -
शेटजी तुमच्या तिजोरीत पाच कोटी आहेत व रत्नहार आहे चित्रे
बर मंग ? शेटजीने म्हणताच चित्रेंनी एक पिशवी त्याचा अंगावर फेकली अन म्हणाला एक कोटी कॅश व रत्नहार त्या पिशवीत टाका- अन्यथा परिणाम भोगण्यास तयार राहा
ए दमबाजी करते हाकला रे त्याला
शेटजी तुमची मुलगी प्यारी असेल तर मुकाट्याने करा अन्यथा चित्रे
अन तु काय जादुवाला हायस का ?काय करशील ?
चित्रे नी मुलीस ओरडून हाक मारली मुलीने चित्रेकडे बघितले अन नजरानजर होताच ती किंचाळली अन भीतीने धाडकन जमिनीवर आपटली
शेटजी व इतर भयचकित नजरेने तो नजारा पाहात होते सारे घाबरलेले होते
तुला पोरगी प्रिय की धन ? चित्रेंच्या आवाजात जरब होती नजरेत विखार
शेटजी बोलेना तेवढ्यात चित्रेंनी मुलीकडे पाहिले नजरेस नजर मिळताच मुलगी जिवाच्या आकांताने ओरडू लागली
पप्पा माझा पोट फुटताय खूप वेदना होत आहेत -मला वाचावा
अरे धनी पैसा दे बाबा त्याला पोरगी बघ गुरासारखी वरडताय शेटाणी म्हणाली
शेटजींनी विलंब न करता पैसे व हार पिशवीत टाकला व पिशवी चित्रे कडे फेकली
चित्रेंनी ती पिशवी घट्ट धरली अन म्हणाला हा प्रसन्ग विसरा काय झालं नाही -पूजा करा वाच्याता केली अन माझ्या कानावर आला तर पोरगी हकनाक गमवाल असे म्हणत चित्रे पिढीच्या बाहेर पडला
*
घरी आल्यावर चित्रे पैश्या कडे बघत होता बाजूला रत्नहार चमचम करत होता तो खप खुश होता
त्याने बाजूला पाहिले कोप-यात अवदसा माता उभी होती तो पटकन उठला व म्हणाला "माते नमन
माते तुझ्या कृपेने आज मी लक्षमीला पायाची दासी बनवली चित्रे म्हणाला

माता म्हणाली अरे मानावा तुझ्या बुद्धीची कमाल आहे -मला कल्पना नव्हती तू माझा असा उपयोग करशील -दैन्य दुख्ख त्याला दिलेस कमाल आहे

असे म्हणत ती अंतर्धान पावली
अकुकाका

कथा