श्रद्धा हाच मानवी जीवनाचा महत्त्वाचा ऊर्जास्रोत असतांना रामसेतूचा विध्वंस का ?

सनातन's picture
सनातन in काथ्याकूट
31 Oct 2008 - 8:26 am
गाभा: 

श्रद्धा हा मानवी जीवनाच्या अनेक ऊर्जास्त्रोतांमधील एक महत्त्वाचा ऊर्जास्त्रोत आहे. याला डावलून कोणतेच सामाजिक शास्त्र पुढे जाऊ शकत नाही. या ऊर्जेने मानवी जीवन सुखी होण्यास अथवा आलेली दु:खे भोगण्यास मदत होते. विज्ञानाची इच्छा, त्याचा उपयोग मानवी जीवन अधिक सुखी करण्यासाठीच आहे. विज्ञान हे एक माध्यम आहे, ते ध्येय नव्हे. ध्येय तर समाजाचे जीवन अधिक आनंदी करणे हेच आहे व असलेही पाहिजे. यासाठी त्या समाजाला काही घटना, काही वस्तू, वास्तू व व्यक्‍ती उपयुक्‍त ठरतात. सेतूसमुद्रम प्रकल्पासाठी सत्तेतील काहिजन त्यांच्या सहकार्‍यांसह धिंगाणा घालत आहे व रामसेतू उद्ध्वस्त करून श्रद्धांवरच घाला घालत आहे. श्रद्धाच कशी मानवाला तारक असते, याची भारतातीलच नव्हे, तर संपूर्ण जगभरातील सर्वधर्मियांना जाणीव आहे.

प्रतिक्रियाचे स्वागत आहे.

प्रतिक्रिया

सर्किट's picture

31 Oct 2008 - 8:37 am | सर्किट (not verified)

सनातनपंत,

आपले म्हणणे मला नेहमीच पटत आले आहे. समाजाचे जीवन आनंदी करण्यासाठी आपण जी धडपड करताहात, ती स्तुत्य आहे.

रजिस्टर कुठे करू ?

एक दुरुस्ती सुचवतो, श्रद्धा हा हिंदूंचा उर्जास्रोत आहे, असे म्हणा.

कारण उद्या आपण मशिदी फोडू तेव्हा हे म्लेंच्छ आपले शब्द आपल्यावरच उलटवायचे.

तेव्हा मशिदी फोडल्या तर उर्जास्रोत नष्ट होणार नाहीत, असे म्हटले, की आपण वाचलो.

कसे ?

-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

भास्कर केन्डे's picture

1 Nov 2008 - 8:54 pm | भास्कर केन्डे

श्री सर्किट महाशय,

हे काय, उगीच कुठचा विषय कुठे नेत आहात तुम्ही? किती मशिदी फोडल्यात हिंदूंनी आतापर्यंत? जी एक पाडली त्या बाबरीत कधितरी कुणी नमाज आदा केला होता का? उलट मुसलमानांच्या (बाहेरुन होणार्‍या वा आंतरिक) प्रत्येक स्वारी दरम्यान शेकडो, हजारो देवळे बेचिराख करण्यात आली. शेकडो वर्षांच्या इतिहासात एक बाबरी सोडून किती मशिदी हिंदूंनी तोडल्यात?

रामसेतू तोडला गेला तर पर्यावरणाची होणारी हाणी, तसेच गाळ व उथळपणा यामुळे वाहतुकी समोर येणारे प्रश्न याबद्दल खाली प्रतिसाद आलेले आहेतच. परंतू रामसेतू हा करोडो हिंदूंच्या श्रद्धेचा भाग आहे हे आपण नाकारु शकत नाही. असे प्रयत्न हिंदूंच्याच गळी का उतरवले जातात हा प्रश्न मला पडतो. काश्मिर मधल्या त्या दर्ग्यात पैगंबराचा केस आहे हे तरी कशावरुन? मग त्याच्या देखभाली साठी आपल्या करातून करोडो रुपये सरकार का उधळते? श्रद्धेमुळेच ना?

आता राहिला प्रश्न मुस्लिमांच्या श्रद्धेला हिंदुंकडून मिळणार्‍या वागणुकीचा. माझ्या घरापासून जवळच पाच मशिदी आहेत. त्या सर्व मशिदीतून दररोज पाच वेळा अदा केलेला नमाज आम्ही बहुसंख्य हिंदू दररोज ऐकत आहोत. कधिही कोणीही तक्रार केलेली ऐकीवात नाही. का? कारण हा त्यांच्या श्रद्धेचा प्रश्न आहे. मग भलेही ते त्यांच्या बांगेतून आपल्या धर्माचा अपमान का करेनात... त्यांच्या बांगेत पहिली ओळ असते "अल्ला शिवाय दुसरा कोणताही देव नाही". जर दररोज आपल्या श्रद्धांवर होणारा बलात्कार हिंदू सहन करत असेल तर आपल्या राम सेतूला किमान उध्वस्त करु नये ही अपेक्षा अशी झिडकारणे हे माणुसकीला शोभा देते का?

ता. क. - सनातन यांच्या वैयक्तिक विचारांना/मतांना आमचा पाठिंबा नाही. तसेच ते ज्या प्रकारे त्यांचे विषय मांडतात त्यास आमचा अजिबात पाठिंबा नाही. हा प्रतिसाद केवळ श्री सर्किट यांचे ओढून ताणून विषयांतर करण्याबद्दल आहे.

आपला,
(डोळस) भास्कर
आम्ही येथे वसतो.

विनायक प्रभू's picture

31 Oct 2008 - 8:55 am | विनायक प्रभू

सामाजिक जिवन आनंदी करणारे बरेच कार्यक्रम माझ्या कडे आहेत. सहभागी होणार का?
मानसिक रित्या नव्हे. आर्थिक, आणि शारिरीक रित्या.

विजुभाऊ's picture

31 Oct 2008 - 9:41 am | विजुभाऊ

राम सेतू तुटला म्हणून बिघडले कोठे? ते पूजा स्थळ नाही. भारतात अशी कितीतरी पडीक देवळे आहेत की जेथे कोणीच येत्जात सुद्धा नाही. तेथे कुठे असते श्रद्धा? आणि एखाद्या मूर्तीभन्जनामुळे श्रद्धेला तडे जात असतील तर देव हा फक्त दगड आहे आणि श्रद्धा म्हणजे तो दगड आपले बरेवाईट करु शकतो असेच नाही का?

झोंबणार्‍या थंडीने तुम्ही गारठले जात नाही याचे आश्चर्य बाळगु नका. अशा थंडीतही तुम्हा उब देणारी कोणतीतरी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम

मदनबाण's picture

31 Oct 2008 - 9:48 am | मदनबाण

राम सेतू तुटला म्हणून बिघडले कोठे?
हिंदूस्थानाच्या सुरक्षेला धोका होऊ शकतो असे कुठल्यातरी (नक्की नाव माहित नाही) नौदल प्रमुखाने वक्तव्य केल्याचे आठवते !!
कृपया ज्यांना या संबंधी अधिक माहिती असेल त्यांनी ती इथं ध्यावी ही विनंती..

(जय श्रीराम)
मदनबाण.....
"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda

राघव's picture

31 Oct 2008 - 1:53 pm | राघव

बहुतेक याचा संबंध पर्यावरणाशी जास्त असावा. त्सुनामी लाटा भारत व श्रीलंके दरम्यान येऊ शकल्या नाहीत त्याचे कारण काही पर्यावरणवादी हा रामसेतू असेच देतात, म.टा. मधे मागे वाचलेले होते. खरे खोटे त्या पर्यावरणवाद्यांनाच ठाऊक.
मुमुक्षु

राघव's picture

31 Oct 2008 - 1:53 pm | राघव

बहुतेक याचा संबंध पर्यावरणाशी जास्त असावा. त्सुनामी लाटा भारत व श्रीलंके दरम्यान येऊ शकल्या नाहीत त्याचे कारण काही पर्यावरणवादी हा रामसेतू असेच देतात, म.टा. मधे मागे वाचलेले होते. खरे खोटे त्या पर्यावरणवाद्यांनाच ठाऊक.
मुमुक्षु

अभिजीत's picture

31 Oct 2008 - 9:53 am | अभिजीत

गेले १५० वर्षे ह्यावर चर्चा चालू आहेत. अजून काही वर्षेतरी कदाचित दशके हा विषय असाच चालेल. तोवर जहाजे/तेलाचे टँकर महाकाय होतील आणि प्रकल्पचा एकूण खर्च खूप वाढेल आणि हा प्रकल्प आपोआप निकाली लागेल.

बाकी चालु द्या.

- अभिजीत

माझे आवडते टाईम्स स्तंभलेखक स्वामीनाथन अय्यर यांचा ह्या विषयावरचा धार्मिक टिपण्णी टाळुन आर्थिक भाष्य सांगणारा एक सुंदर लेख देतोय.
त्यांचे काही मुद्दे:
१ आजच्या महाकाय जहाजांसाठी हा प्रकल्प निरुपयोगी आहे.
२ यामुळे होणारी जैव-हानी
३ कितीही गाळ आज उपसला तरी समुद्र पुन्हा हा गाळ भरणार म्हणजे यावर खर्च केलेला पैसा व्यर्थ जाणार.

http://www.swaminomics.org/articles/20070923.htm

विकि's picture

31 Oct 2008 - 1:13 pm | विकि

सनातन तु लिहीत असलेले लेख दै.सनातन प्रभात(आता प्रकाशित होते की नाही ते मला माहीत नाही)जर प्रकाशित होत असेल तर त्यातील नाही आहेत ना?
रामसेतू आणि श्रध्दा,विज्ञान यांचा योग्य तो संबंध दाखवून सनातनने आपली भूमिका कशी योग्य ते दाखवून दिले आहे.

ज्या वाचकांना 'रामसेतु - इतिहास, भूगोल , विज्ञान व तंत्रज्ञान' यासंबंधी वस्तुस्थिती जाणून घेण्याची इच्छा असेल त्यांनी ती खाली दिलेल्या दुव्यावर वाचावी अशी नम्र विनंती आहे.
http://blog.360.yahoo.com/blog-5cZC9noweaGQh0WnBom7?p=1039

http://blog.360.yahoo.com/blog-5cZC9noweaGQh0WnBom7?p=1039

ज्यांना श्रध्दा या नांवाखाली डोळे मिटूनच घ्यायचे असतील त्या लोकांनी तसे खुषाल करावे. सत्यवचनी रामचंद्राच्या नांवावर लिहितांना किंवा बोलतांना सत्याचे भान ठेवण्याची सद्बुद्धी लोकांना मिळो एवढीच प्रार्थना आपण करू शकतो.