विचारांचे सोने

दिनेश५७'s picture
दिनेश५७ in काथ्याकूट
19 Oct 2018 - 12:03 pm
गाभा: 

शिवसेनेचा ५२ वा दसरा मेळावा काल मुंबईत शिवाजी पार्कात पार पडला. बाळासाहेबांच्या काळात हा मेळावा म्हणजे विचारांचे सोने लुटण्याचा सोहळा असे म्हटले जायचे. ते खरेच होते. बाळासाहेबांचे भाषण, त्यांचे वक्तृत्व, त्यांची देहबोली, हजरजबाबीपणा, कोपरखळ्या, यांमुळे दसरा मेळावा ही पर्वणी असायची. बाळासाहेबांच्या पश्चात त्यांचे पुत्र, शिवसेनाप्रमुखांचे उत्तराधिकारी, उद्धव ठाकरे यांनीही दसरा मेळाव्याची परंपरा सुरू ठेवल्याने, ‘विचारांचे सोने लुटण्यासाठी लाखोंच्या संख्येने वाजत गाजत या’ अशी साद घालण्याची प्रथाही शिवसेनेने पुढे सुरू ठेवली, आणि त्याच अपेक्षेने शिवसैनिक मैदानावर हजर राहू लागले. मराठी माणूस घरबसल्या टीव्हीवरील भाषणाकडे कान लावून बसू लागला.
कालच्या भाषणानंतर मात्र, विचारांवर केवळ सोन्याचा मुलामा चढविण्याची कसरत सुरू असल्याचे जाणवले. कोणताही नवा विचार, ठोस भूमिका, पुढची दिशा, असे काहीच हाती न घेता शिवसैनिक परतले.
पुढच्या निवडणुकीत युती होणार की नाही, भाजपच्या नावाने खडे फोडायचे की नाही, सरकारसोबत रहाणार की नाही, मोदींच्या पाठीशी उभे रहायचे की विरोधात दंड थोपटायचे, स्वबळाची तयारी करायची की युतीचे दरवाजे उघडे ठेवायचे, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतील अशा अपेक्षेने आलेले श्रोते हे प्रश्नच सोबत घेऊन परतले असावेत.
विचारांचे सोने लुटण्याच्या त्या ज्वलंत परंपरेची धग कमी होत आहे का?

प्रतिक्रिया

इथे विचाराचीच वानवा आहे. सोने ही फार पुढची बाब झाली.
शिवसेना इतकी वर्षे नुसतेच दसरा मेळावे घेते.
सेने ने केलेले एखादे भरीव कार्य कोणी साम्गू शकेल का? दुष्काळ रोजगार या बाबी सेनेसाठी त्यांच्या डिक्षनरीतही नाहीत.
खरे तर सेने साठी महारष्ट्राचा भुगोल हा मुंबई आणि ठाण्या त संपतो. बाहेरचा महाराष्ट्र त्यांच्यासाठी नसतोच.
असो.
विचारंचे सोने वगैरे शब्द वापरले आहेत याचे हसू ही आले नाही. इतके अती झालंय.
कालच्या भाषणात कोणतेच स्वतंत्र मुद्दे नव्हते. खरेतर राम मंदीरापेक्षाही अनेक मुद्दे आहेत ज्यावर व्यक्त होता आले असते.
पण सेनेच्या तथाकथीत अभ्यासू नेत्याना ( हो विचार हे अभ्यासातून येतात म्हणुन ) शिक्षण , आरोग्य , उद्योग व्यवसाय हे विषय बीनगरजेचे वाटत असावेत.
पण असो. ज्याचा त्याच्या बुद्धीचा आवाका.
आपले दुर्दैव हे की कथीला ला सोने म्हणावे लागते
दगाबाज, पाठीत खंजीर , लखोबा लोखंडे , अफजलखान , तलवारी, दळभद्री ,पोलादी मनगट , रक्त उसळेल,
या शब्दांबरोबर काल शनी मंगळ या दोन नव्या शब्दांची काल भर पडली इतकेच.

खरे तर सेने साठी महारष्ट्राचा भुगोल हा मुंबई आणि ठाण्या त संपतो.... आणि त्या दोन्ही ठिकाणांची वाट लावली.

सुबोध खरे's picture

22 Oct 2018 - 7:38 pm | सुबोध खरे

विजुभाऊ

सेने ने केलेले एखादे भरीव कार्य कोणी साम्गू शकेल का?

दरवर्षी रस्त्यावर होणारे खड्डे भरण्याचे भरीव कार्य ते करत असतात.

इतकेही तुम्हाला दिसेनासे झाले आहे.

किती तो द्वेष?

विजुभाऊ's picture

23 Oct 2018 - 11:33 am | विजुभाऊ

खीक्क.......