सामाजिक प्रतिष्ठा

Primary tabs

सखाराम_गटण्या's picture
सखाराम_गटण्या in काथ्याकूट
9 Oct 2018 - 4:43 am
गाभा: 

नमस्कार मिपाकरानो, काही दिवसांपूर्वी एक बातमी आली होती की (खोट्या)सामाजिक प्रतिष्ठेसाठी वडील आणि सावत्र आईने मुलीची हत्या केली. मुलगी mbbs करत होती बहुतेक आणि मुलगा शेत गड्याचा होता शिक्षण वगैरे काही सांगितलेले नाही.तर ह्या बातमी वरील प्रतिक्रया वाचल्या बहुतेक करून बापाने योग्यच केले किंवा ज्यानी त्या मुलीचे समर्थन केले त्यांना उलट प्रश्न आले की तुमची बहिण असती व मुलगी असती तर काय केले असते ? मुळात हत्येचे असे समर्थन कसे काय होऊ शकते ?.आता जे काही झाले मुलीचीही त्यात चूक असू शकते-आहे. अगोदर साळगाड्याच्या मुलाबरोबर लग्न केले म्हणून समाजाने छि- थू केली असती।।।अन आता पोटच्या पोरीला मारले म्हणून समाज छि थू करेल। तर अश्या सामाजिक प्रतिष्ठेला खरच महत्व देण्याची गरज आहे का ? ह्यावर आपले काय मत आहे ?

प्रतिक्रिया

पैलवान's picture

11 Oct 2018 - 6:56 pm | पैलवान

चहासारख्या उत्तेजक पेयांपासून आणि सैराटसारख्या हिंसक चित्रपटांपासून मी स्वतःस अलिप्त ठेवले आहे.