माळढोक पर्वाचा अंत झाला

Primary tabs

खिलजि's picture
खिलजि in जे न देखे रवी...
8 Oct 2018 - 8:03 pm

माळढोक पर्वाचा अंत झाला

आता हळूहळू माळरानही संपेल

अशीच भूक वाढत राहिली

तर उद्या फक्त माणूसच उरेल

तो डौलदार असेल ,

रुबाबदार असेल

तो कसा होता ?

ते मात्र आता पुस्तकात दिसेल

त्याचाही पुतळा बनेल

निर्लज्जासारखे रोवत सुटतील त्याला

प्रत्येक बागेत

किंवा करतील त्याची पेंग्विनसारखी थुकदाणी

आणि लीहितील त्यावर " माझा खाऊ मला द्या "

मी फक्त ऐकलं होतं त्याच्याबद्दल

भरभरून मिळणाऱ्या अनुदानाबद्दल

निसर्गप्रेमींच्या त्यागाबद्दल

अन गहाणवट पडलेली सरकारी अक्कल

अखेर बघायचं राहूनच गेलं त्याला

माळरानाच्या माळेतला कोहिनूर निखळला

तो जाताच क्षणी , लांडग्याने नंबर लावला

एकदा का त्याला कायमचा गिळला

मग प्रगतीचा मार्ग मोकळा झाला

): प्रगतीचा मार्ग मोकळा झाला ):

सिद्धेश्वर विलास पाटणकर

इतिहास

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

8 Oct 2018 - 8:25 pm | यशोधरा

शेवटचा माळढोक संपला? कधी? केव्हा? कसा?

अभ्या..'s picture

8 Oct 2018 - 8:48 pm | अभ्या..

शेवटचा माळढोक पाहिला? कुणी? कधी? कुठे?

सप्टेंबर 2017 मध्ये झालेल्या सर्वेमध्ये महाराष्ट्रात माळढोक दिसला नाही. तरीही Wii मधील शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की इतक्यात माळढोक नामशेष झाला असे म्हणता येणार नाही. सलग 4- 5 वर्षे पक्षी कुठेच दिसला नाही तर तो नामशेष झाला असे म्हणता येते.

आत्ता आत्ताच कुठेतरी माळढोक दिसल्याचे वाचले होते म्हणून विचारले.

असो.

अथांग आकाश's picture

8 Oct 2018 - 8:56 pm | अथांग आकाश

अप्रतिम समयोचित कविता.

sad

प्रचेतस's picture

8 Oct 2018 - 9:09 pm | प्रचेतस

मला दोनेक वर्षांपूर्वी भुलेश्वरच्या पठारावर माळढोकसदृश एक भलामोठा पक्षी दिसला होता, छायाचित्र टिपण्याआधीच उडून गेला. नक्की सांगता येणार नाही माळढोकच होता किंवा कसे पण कमालीचे साम्य होते इतके निश्चित.

सुबोध खरे's picture

9 Oct 2018 - 10:10 am | सुबोध खरे

Once common on the dry plains of the Indian subcontinent, as few as 150 individuals were estimated to survive in 2018 (reduced from an estimated 250 individuals in 2011)
https://en.wikipedia.org/wiki/Great_Indian_bustard

दुर्गविहारी's picture

9 Oct 2018 - 11:41 am | दुर्गविहारी

उत्तम कविता ! महाराष्ट्रामधून माळढोक पुर्णपणे नाहीसे झाले आहेत. आता थोडेफार राजस्थानात आहेत. एका नष्ट झालेल्या पक्ष्यावर उत्तम कविता. बाकी पहिले काव्यही एका पक्ष्यावरच होते. अशाच तुमच्या कविता येत राहोत. पु.ले.शु.

Ganesh Dwarkanath Mhatre's picture

9 Oct 2018 - 12:47 pm | Ganesh Dwarkana...

अतिशय छान कविता,

आवडली
--

खिलजि's picture

9 Oct 2018 - 1:57 pm | खिलजि

कसा धन्यवाद देऊ , या सांत्वनाला

माळढोक महाराष्ट्रातून निघून गेला

आज महाराष्ट्रातलं माळरान पोरकं झालं

चला दोन अश्रू गाळूया

दोन मिनिट श्रद्धांजली फक्त

पुढं अजून कोण संपतंय ते पाहूया ( आता लांडगा असेल बरं का )

पुन्हा तेच नवीन मुखवटा घातलेले ( अ डा ण * ट सरकार )

पुन्हा दोन अश्रू

पुन्हा दोन मिनिट श्रद्धांजली

पुन्हा पुढं जायचं

असंच पुढं पुढं करत करत

एकमेकांचं थोबडे बघायचं

ईश्वरदास's picture

13 Oct 2018 - 7:45 pm | ईश्वरदास

एका मित्राची जमीन होती अभयारण्य क्षेत्रात, दिसला तर त्याचं फ्राय चिकणच बनवतो म्हणायचा.