Long Term Capital Gain - Help Needed

NiluMP's picture
NiluMP in काथ्याकूट
16 Sep 2018 - 12:15 am
गाभा: 

लाग टर्म कपिटल गेन टक्स वाचविण्यासाठी घर दोन वर्षानंतर विकावे लागते (जर होम लोन बेनिफिट घेतले असल्यास घर पाच वर्षानंतर विकावे लागते). CII वापरुन लाग टर्म कपिटल गेन टक्स रक्कम काढावी लागते व नविन घर दोन वर्षात किंवा एक वर्ष आधी नवीन घर घ्यावे लागते. समजा लाग टर्म क्पिटल गेन टक्स रक्कम 10 लाख आहे सेल प्रोसीड 30 लाख आहे 10 लाख नवीन घरात गुतविले तर उरलेले 20 इतर कारणासाठी वापरु शकतो का?

प्रतिक्रिया

ट्रम्प's picture

16 Sep 2018 - 2:19 pm | ट्रम्प

संपादक मंडळ ,
कृपा करून अर्थविश्व विभाग सुरू करण्याची कृपा करावी जेणेकरुन मिपाकरांना अर्थविषयक अडचणी सोडविण्यासाठी मदत होईल व नवीन सभासदांना एका क्लीक वर अर्थविषयक घडामोडी , अर्थ संकटे व त्यावरील उपाय , शेअर बाजारातील गुंतवणूक आशा सगळ्या विषयावर माहिती भेटेल.

डॉ सुहास म्हात्रे's picture

16 Sep 2018 - 3:19 pm | डॉ सुहास म्हात्रे

खालील लिंक्स उपयोगी पडू शकतील...

https://www.businesstoday.in/moneytoday/tax/property-selling-profit-lowe...

https://economictimes.indiatimes.com/wealth/personal-finance-news/tax-re...

government-notified bonds या पर्यायाचा विचार करू शकता.

You can claim exemption under Section 54 (EC) by investing the long-term capital gains for three years in bonds of the National Highways Authority of India and Rural Electrification Corporation Limited within six months of selling the house. Budget 2017 proposes new list of companies whose bonds can be used for such purpose. However, one can invest only up to Rs 50 lakh in these bonds in a financial year.

धन्यवाद सर, पण मला लाग टर्म कपिटल गेन टक्स नाही तर उरलेली सेल प्रोसीड रक्कमेबददल माहिती हवी आहे ते पैसे मी इतर ठिकाणी गुंतवू किंवा इतर गोष्टीवर खर्च करु शकतो का?

मी लाग टर्म कपिटल गेनची रक्कम होम लोन कमी करण्यासाठी वापरली बंद करण्यासाठी नाही आणि उरलेली सेल प्रोसीड रक्कम इतर गुंतवून त्यातून येणा-या रक्कमेवर उरलेले होम लोन कमी करुन बंद करण्यासाठी वापरावे असा विचार आहे दुस-या शब्दात सांगायाचे तर सेल प्रोसीड रक्कमेतून पगारा व्यतिरीक्त उत्पन्न वाढविण्यासाठी अजून एक मार्ग असावा.

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 Sep 2018 - 3:16 am | डॉ सुहास म्हात्रे

अच्छा ! वरचा सल्ला लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स एक्झम्पशनसाठी होता.

टॅक्स भरून उरलेले पैश्यांची गुंतवणूक कशी करावी यासाठी अनेक उपाय आहेत आणि त्यांची निवड तुमची खाजगी परिस्थिती, इच्छा व धोका स्विकारण्याची कुवत (रिस्क टॉलरन्स), इत्यादी अनेक गोष्टींवर अवलंबून आहे. त्यासंबंधी सर्व माहिती तुम्ही इथे, सार्वजनिक मुक्त संस्थळावर, देऊ शकणार नाही आणि देऊही नये. अर्धवट माहितीवर मिळालेला सल्ला धोक्याचा ठरू शकतो व तो धोका तुम्ही मोठ्या रकमेसाठी तरी घेऊ नये असे माझे मत आहे.

तेव्हा, तुमच्या मते विश्वासू असलेला एखादा गुंतवणूक सल्लागार गाठून, त्याच्याशी तपशीलवार चर्चा करून त्याचा सल्ला घेणे, हेच योग्य होईल.

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Sep 2018 - 1:22 pm | डॉ सुहास म्हात्रे

परत एकदा तुमच्या लेखाचे शीर्षक वाचले. ते जरासे फसवे आहे. तुमच्या मते ज्या रकमेची गुंतवणूक करायची आहे ती लाँग टर्म कॅपिटल गेनवरचा कर भरून उरलेले उत्पन्न आहे... म्हणजे ते तुमचे, करपश्चात सर्वसामान्य उत्पन्न, झाले आहे... मग ते इतर कोणत्याही प्रकारच्या करपश्चात उत्पन्नापेक्षा वेगळे रहात नाही. म्हणून, (कॅपिटल गेनचा मुद्दा विसरून,) ते सर्वसामान्य उत्पन्न समजून त्याच्या गुंतवणूकीचा विचार केल्यास निर्णयप्रक्रियेत गुंतागुंत राहणार नाही.

दुसर्‍या शब्दांत, "माझ्याकडे क्ष रुपये करपश्चात/करमुक्त उत्पन्न आहे आणि त्याची गुंतवणूक करायची आहे", असा विचार योग्य होईल.

सुबोध खरे's picture

19 Sep 2018 - 7:56 pm | सुबोध खरे

आपण घर १० लाख रुपयात घेतले असेल आणि ते ३० लाख रुपयाला दोन वर्षानंतर विकले तर आपला लाँग टर्म कॅपिटल गेन २० लाख रुपये झाला.
यात इंडेक्सेशन बेनिफिट म्हणजे जर दरवर्षी होणाऱ्या महागाई मुळे आपल्या पैशाची किंमत कमी होते त्या प्रमाणे या १० लाखाची किंमत ५ वर्षांनी समजा १९ लाख होत असेल तर हे १९ लाख रुपये ३० लाखातून वजा करून आपला लाँग टर्म कॅपिटल गेन ११ लाख येईल.
हे ११ लाख रुपये एकतर आपण दुसऱ्या घराच्या खरेदीसाठी वापरावे किंवा लाँग टर्म कॅपिटल गेन चे सरकारी बॉण्ड असतात त्यात गुंतवले तर त्या वरिल लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स वाचेल.
बाकी १९ लाख रुपये आपण जेथे हवे तेथे वापरू शकता. उदा युरोपच्या टूरसाठी किंवा होंडा सिटी विकत घेण्यासाठी सुद्धा वापरू शकता.

ता क ---वरील आकडेवारी हि उदाहरणार्थ दिलेली आहे. प्रत्यक्ष आपला लाँग टर्म कॅपिटल गेन किती इंडेक्सेशन बेनिफिट किती आणि कर किती हि आकडेवारी आपल्या अर्थ सल्लागाराला विचारा.

धन्यवाद डॉक्टर साहेब.

घर लोनवर घेतले असल्यास आणि टँक्स बेनिफिट घेतले असल्यास पाच वर्षाच्या आत विकल्यास पूर्ण टँक्स बेनिफिट reverse होते का ?

सुबोध खरे's picture

20 Sep 2018 - 6:26 pm | सुबोध खरे

However, in case an owner transfers a residential house property that was acquired with a housing loan, within five years from the end of the financial year in which the possession was obtained, then, s/he cannot claim any deduction for repayment made during the year. Moreover, any deduction availed in respect of such house property, for housing loan repayment, stamp duty and registration charges, in earlier years, shall be treated as income of the year in which you transfer the property. Please note that there is no similar provision, for reversal of benefits, in respect of interest claimed under Section 24(b), nor is there any similar provision for reversal of benefits claimed, in case you prepay your housing loan even before completion of the five-year period.
https://housing.com/news/holding-period-house-impact-income-tax-benefits/

NiluMP's picture

20 Sep 2018 - 6:48 pm | NiluMP

Thanks again Sir.

त्या १९ लाख रुपयांना आपले त्यावर्षीचे income दाखवून त्यावर income tax भरावा लागतो का?

सुबोध खरे's picture

20 Sep 2018 - 6:28 pm | सुबोध खरे

नाही
हे उत्पन्न धरले जात नसून दूरत्वाचा भांडवली नफा Long Term Capital Gain म्हणून धरले जाते त्यामुळे त्यावर आयकर लागत नाही.

एमी's picture

20 Sep 2018 - 8:32 pm | एमी

अच्छा. धन्यवाद :)

अनुप ढेरे's picture

20 Sep 2018 - 9:56 am | अनुप ढेरे

दोन वर्ष (कींवा पाच) ही अग्रीमेंट तारखेपासुन मोजायची का पझेशन तारखेपासुन मोजायची यातही वाद आहेत.

दोन वर्ष (कींवा पाच) ही पझेशन तारखेपासुन मोजायची.

सुबोध खरे's picture

20 Sep 2018 - 6:29 pm | सुबोध खरे

वर लिहिल्याप्रमाणे
within five years from the end of the financial year in which the possession was obtained,
म्हणजे पाच नव्हे तर साडेपाच पावणेसहा वर्षे सुद्धा होऊ शकतात.