दाभोळकरांना श्रद्धांजली (आज पाच वर्ष झाली)

बाजीगर's picture
बाजीगर in जे न देखे रवी...
20 Aug 2018 - 9:03 am

साधना

नराधम वार करी
नरोत्तम 'देवा' घरी
आता तो नाही उरी
ही अंधश्रध्दा !

शोषीत न रहावं भोळं
म्हणून कोणी कर दाभोळ
झेली आगीचा लोळ
न हो व्यर्थ.

पुन्हा येतील कुंभमेळे
रंगती स्नानाचे खेळे
मात्र नाही या वेळे
तो साधक.

(लिहीली या दिवशी 25/08/2013)

कविता

प्रतिक्रिया

चाणक्य's picture

20 Aug 2018 - 11:15 am | चाणक्य

छान आहे. आवडली.

charming atheist's picture

21 Aug 2018 - 8:48 pm | charming atheist

छान आहेत विचार.

माहितगार's picture

21 Aug 2018 - 9:15 pm | माहितगार

पहिल्या दोन कडव्यातील दाबोळकरांना सआदर__/\__ .

तिसर्‍या कडव्याचा संदर्भ न उमजल्यामुळे प्रतिसादास विलंब केला.

ट्रम्प's picture

22 Aug 2018 - 5:50 pm | ट्रम्प

त्यांनी कधी
खतना , तीन तलाक , पहिल्या नवऱ्याबरोबर लग्न करायचे असल्यास काजी बरोबर लग्न करणे , चर्च मधील ब्रेड आणि ते दैवी पाणी या बद्दल काही बोलले का हो ?

माहितगार's picture

22 Aug 2018 - 6:22 pm | माहितगार

मदर तेरेसाच्या संतपदाच्यावेळी चमत्कारांची अपेक्षा केली गेली तेव्हा महाराष्ट्रीय अंधश्रद्धा निर्मुलकांनी त्या बाबत विधान केल्याचे पुसटसे समरते. बाकी काही उदाहरणे असतील तर त्यांच्या चळवळीतील इतर मंडळी देतीलच, पण ट्रंप मालक आपल्या परंपरावादी गटातील मंडळींनी मी इतर धर्मीय अंधश्रद्धांबद्दल लिहिले तिथे सुद्धा ट्रोलींगच केल्याचे रेकॉर्ड आहे. आणि मी सर्वत्र सारखी टिकाकरतो तरीही आपण माझ्या वाट्याला ट्रोलींगच दिले आहे. म्हणजे जो कौतुक आणि कठोर टिकेत सर्वांशी सारखा आहे त्याला तशीही आपुलकीची वागणूक मिळताना दिसत नाही. तेव्हा दाभोळकरांना असे प्रश्न विचारण्यातील नैतीक आधिकाराबद्दल साशंकता वाटते.

ट्रम्प's picture

22 Aug 2018 - 6:32 pm | ट्रम्प

नाही हो बऱ्याच वेळा मी तुमच्या बाजूने असतो हो !!!!