कंपनी मध्ये मॅनेजर होणे किती शहाणपणाचे आहे?

mayurdublay's picture
mayurdublay in काथ्याकूट
4 Aug 2018 - 8:32 pm
गाभा: 

एखाद्या कंपनी मध्ये मॅनेजर होणे किती शहाणपणाचे आहे?

मॅनेजर म्हणून काम करताना तुम्हाला काय वाटते?

तुमच्या टीम ने काय काम केले त्यावरच तुमची लायकी ठरते का?

तुमच्या स्वतःच्या कामाला काही किंमत राहते का?

तुमची टीम कसे वागेल त्याचे खापर तुमच्यावर फोडले जाते का?

आणि तुमच्या वर खापर फुटणार म्हणून तुमची टीम निवांत असते का?

तुम्हाला काय वाटते याबद्दल? तुमचा काय अनुभव आहे?

प्रतिक्रिया

एखाद्या गोष्टीचे आपल्या खापर फुटेल याची भीति/ विचार करत असाल तर मॅनेजर व्हायच्या भानगडीत पडू नका
जो पुढाकार घेवून काही करतो त्याला टीकेचा धनी व्हावे लागतेच. जो काही करतच नाही त्याच्यावर टीका होत नाही.
स्टीफन कवे यांचे सेवन हॅबीट्स ऑफ मोस्ट एफेकटीव्ह पीपल हे पुस्तक वाचून पहा. कधीतरी

तुषार काळभोर's picture

5 Aug 2018 - 7:13 am | तुषार काळभोर

हेच सांगू इच्छितो.

पीटरच्या काकांनी सांगितलंय, ताकदीसह जबाबदारीही येते.

डँबिस००७'s picture

5 Aug 2018 - 7:38 pm | डँबिस००७

पीटरच्या काकांनी म्हणजे ?
पिटर पारकर (स्पायडर मॅन ) का
पिटर ड्रक्कर (मारकेटींग मॅनेजमेंट गुरु)

मनिमौ's picture

5 Aug 2018 - 8:55 pm | मनिमौ

हो. ड्रकर गुर्जी नवेत

कानडाऊ योगेशु's picture

5 Aug 2018 - 11:43 pm | कानडाऊ योगेशु

एखाद्या कंपनी मध्ये मॅनेजर होणे किती शहाणपणाचे आहे?

मी उलट प्रश्न विचारतो. एखाद्या कंपनीमध्ये खालच्याच हुद्यावर राहण्याचा प्रयत्न करणे किती शहाणपणाचे आहे. समजा आय.टीत असाल तर किती वर्षे कोडींग वगैरे करत बसणार? एखाद्या फॅक्टरीत असाल तर किती वर्षे ते लेथ/मिलिंग मशीन ऑपरेटर म्हणुन राहणार.? ह्याच पातळीवर जर राहीलात तर दरवर्षी येणार्या नव्या बॅचसोबत स्पर्धा करावी लागणार. कंपनीत टिकण्याचा एकमात्र उपाय म्हणजे उतरंडीत वर चढत राहणे.(!) काहीएक वर्षांचा अनुभव आल्यावर तुमच्याकडुन केवळ टेक्निकल कामाची अपेक्षा कोणी करणार नाही. तर तुम्हाला टीम मॅनेजमेंटचा किती अनुभव आहे/लीडरशीप क्वालिटीज आहेत का नाही हेच पाहिले जाते. म्हणजे तर तुम्ही एकाच कंपनीत केवळ मॅनेजर व्ह्यायचेच नाही म्हणुन बढती नाकारत राहीलात तर एक वेळ अशी येईल कि तुम्ही कंपनीवर लाएबिलिटी बनुन जाल. काहीजण इतके महत्वाकांक्षी नसतात वा अल्पसंतुष्ट असतात (कारणे काही असु शकतील ) अश्यावेळी देखील व्यवस्थापनामध्ये एक किमान पात्रता गाठणे गरजेचे ठरते.

पिलीयन रायडर's picture

6 Aug 2018 - 1:23 pm | पिलीयन रायडर

मला नाही वाटत असं असतं. दोन मार्ग आहेत वर जायचे. एक तर टेक्निकल मध्ये पुढे जा किंवा मॅनेजमेंट मध्ये. लेथ ऑपरेटर स्किल्स वाढवत नेऊन टेक्निकल लाईन मधते वर चढत जाऊ शकतो. टेक्निकल अडव्हाजर वगैरे पोस्ट आमच्या कम्पनी मध्ये ह्या व्हर्टिकलच्या टॉप पोस्ट होत्या. सगळे अनुभवी लोक टेक्निकल सोडून मॅनेज करत बसले तर टेक्निकल कपैबिलिटी कोण डेव्हलप करणार? तेव्हा मॅनेजर न होणे म्हणजे प्रमोशन नाकारणे असं होऊ शकत नाही. टेक्निकल काम आवडत असेल तर त्यात फारसे नॉन टेक्निकल काम न करता तुम्ही हायर ग्रेड ला जाऊ शकता. (किरकोळ मॅनेजमेंट कुणालाही चुकलेले नाही. टीम तयार करून पुढची फळी तयार करणे हे सगळ्याच अनुभवी लोकांचं काम आहे)

* माझ्या नोकरीच्या अनुभवात हे पाहिलं आहे. माझे वडील सुद्धा मोठ्या पोस्टवर पण टेक्निकल मध्येच आहेत.

कानडाऊ योगेशु's picture

6 Aug 2018 - 1:56 pm | कानडाऊ योगेशु

मॅनेजमेंट कुणालाही चुकलेले नाही. टीम तयार करून पुढची फळी तयार करणे हे सगळ्याच अनुभवी लोकांचं काम आहे

मी ही तेच म्हणतोय. मॅनेजर व्हायचे जरी नसेल तर व्यवस्थापनामध्ये एक किमान पात्रता गाठणे गरजेचे आहे.

चौथा कोनाडा's picture

6 Aug 2018 - 7:20 am | चौथा कोनाडा

+१

मॅनेजर व्ह्यायचेच नाही म्हणुन बढती नाकारत राहीलात तर एक वेळ अशी येईल कि तुम्ही कंपनीवर लाएबिलिटी बनुन जाल. काहीजण इतके महत्वाकांक्षी नसतात वा अल्पसंतुष्ट असतात (कारणे काही असु शकतील ) अश्यावेळी देखील व्यवस्थापनामध्ये एक किमान पात्रता गाठणे गरजेचे ठरते.

अगदी सहमत!

सिरुसेरि's picture

6 Aug 2018 - 10:20 am | सिरुसेरि

"डॉन" मधे प्राण जसे दात ओठ चावत "इनिसपेक्टर साहिब" म्हणतो , त्याच सुरात "म्यानिजर साहिब" असे म्हणायला आणी ऐकायला छान वाटते .

चौथा कोनाडा's picture

6 Aug 2018 - 1:17 pm | चौथा कोनाडा

:-)))

सिरुसेरिसाहेब / साहिबान, तुमी धागा हायजॅक करणार अन "डॉन, प्राण किंवा गेला बाजार एंशीच्या दशकातले सिनेमे कसे भारी होते" या विषयावर धागा भरकटवणार !

विषय काढलाच आहात तर माझे आवडते फेबुलेखक जेव्ही यांचा एक सुंदर लेख :

सत्तर एमएम चे आप्त (७)…. अमजदखान... १६ १० १५

सिरुसेरि's picture

7 Aug 2018 - 3:22 pm | सिरुसेरि

चौथा कोनाडा साहेब , आपण दिलेला लेख खुप छान आहे . मुळ धागा विषयावर सांगायचे झाले तर , आज काल अनेक कंपन्या employees ना ठराविक कालावधी पुर्ण झाल्यावर , employees च्या choice नुसार technical आणी management असे / अशा प्रकारचे career growth options देतात . technical मधे उदा. जसे की - SME ( Subject Matter Expert , Architect ) .

मी उलट प्रश्न विचारतो. एखाद्या कंपनीमध्ये खालच्याच हुद्यावर राहण्याचा प्रयत्न करणे किती शहाणपणाचे आहे. समजा आय.टीत असाल तर किती वर्षे कोडींग वगैरे करत बसणार?

वरचा हुद्दा = मॅनेजर हे समीकरण अनेकांच्या डोक्यात अगदी पक्के बसले आहे.
पण तसे नसते. मॅनेजर म्हणजे अनेकांकडून काम करुन घेता येण्याची हातोटी असलेली व्यक्ती. मग त्या अनेकांत स्वतःची टीम असू शकते किंवा इतर काही लोक आणि ग्राहक देखील. सगळ्यंशी गरजेप्रमाणे संपर्क करणे, आपले काम पुढे सरकवणे, आलेल्या अडचणींतून मार्ग काढणे ई. उदा आय टी मध्ये (मी स्वतः ४ वर्षापासून मॅनेजर आहे म्हणून सांगतो) स्वतःची टीम आणि ग्राहक या व्यतिरिक्त आय टी सपोर्ट (ओडीसी सेट अप करिता वगैरे) , फायनान्स , सेल्स , अ‍ॅडमिन , इमिग्रेशन सपोर्ट (व्हिसा बनवण्यसाठी) या सगळ्यांशीही संपर्क येतो. विविध प्रकारचे काम असते. मॅनेजर =सिनिअर असेही नेहमी नसते. एखादा व्यक्ती कमी अनुभव असतानाही मॅनेजर बनू शकतो. आणि त्याच्यासोबत काम करणारे काही त्याच्यापेक्षा सिनिअर (फक्त अनुभवानेच नव्हे तर हुद्द्यानेही) असू शकतात. मॅनेजर म्हणजे कुणीतरी फार मोठा आणि टीमचा 'बॉस' असं काही नसतं. 'मॅनेजमेंट'चं काम करणारा एक तो ही एक मेंबरच असतो.
कुणाला या कामात रस नसेल तर तो टेक्निकल मध्येच कायम राहूनही पुढे जावू शकतो. त्याने आयुष्यभर कोडिंगच केले पाहिजे असे नाही तर सोल्यूशन आर्किटेक्ट वा टेक्निकल आर्किटेक्ट असा त्याचा जॉब असू शकतो. थोडक्यात काय तर टेक्निकल आणि डोमेन दोन्हीत सखोल ज्ञान घेवून , बाजारत येणारे नव्या तंत्रज्ञानाची माहिती घेत स्वतःला अद्ययावत ठेवत कुणी स्वतःची प्रगती करतात. आजकाल आय टी कंपनीत 'सेंटर ऑफ एक्सीलन्स (सीओई) वा प्रॅक्टीस' नावाची अशा तज्ञ व्यक्तींची एक छोटी टीम असते. ही टीम नवीन प्रोजेक्ट मिळवताना डिलिवरी /सेल्स टीमला मदत करते, चालू असलेल्या प्रोजेक्टमध्येही काही आव्हानात्मक तांत्रिक बाबीत गरजेप्रमाणे मदत करते. यामुळे या टीम मधील लोकांना खूप एक्स्पोजर मिळतो उलट एखादा दीर्घकाळ चालणारा प्रोजेक्ट घेवून बसलेला प्रोजेक्ट मॅनेजर बर्षानु वर्षे त्याच प्रोजेक्टमध्ये अडकून पडलाय असेही होवू शकते ...
अर्थात मॅनेजमेंट जरी करायचे नसले तरी तांत्रिक कौशल्यासोबत काही गुण असणे आवश्यक आहे म्हणजे तुमच्या/कंपनीच्या तांत्रिक कौशल्याचे योग्य प्रेजेंटेशन , संभाषण कौशल्य ई ई.
आय टी शिवाय इतर क्षेत्रांतही हे बदल आता होत असावेत अशी अपेक्षा आहे.
मुळात तांत्रिक किंवा ज्या क्षेत्रात कंपनी कार्यरत आहे त्या क्षेत्रात तज्ञ असणार्‍याची कदर व्हावी (तशी ती होवू लागलीये बहूधा) म्हणून हा प्रतिसाद.

कानडाऊ योगेशु's picture

6 Aug 2018 - 12:23 pm | कानडाऊ योगेशु

मॅनेजरशिप ही एक जबाबदारी आहे. म्हणजे तुम्ही ४-५ वर्षे टेक्निकल क्षेत्रातच काढली तर पुढे तुम्हाला टीमचे नेतृत्व करावेच लागेल. भले तुम्ही सो कॉल्ड मॅनेजमेंट मध्ये जायला जरी उत्सुक नसाल तरी. डिझायनर,आर्किटेक्ट वगैरे झालात तरी तुम्ही इतरांना मार्गदर्शन करावे ह्याची अपेक्षा व्यवस्थापनाने केली तर त्यात काही वावगे नसावे.

मराठी कथालेखक's picture

6 Aug 2018 - 12:26 pm | मराठी कथालेखक

डिझायनर,आर्किटेक्ट वगैरे झालात तरी तुम्ही इतरांना मार्गदर्शन करावे ह्याची अपेक्षा व्यवस्थापनाने केली तर त्यात काही वावगे नसावे.

आर्किटेक्ट बनून मार्गदर्शन करणे आणि मॅनेजर बनून प्रोजेक्ट मॅनेजमेंट करणे या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहे.

कानडाऊ योगेशु's picture

6 Aug 2018 - 12:32 pm | कानडाऊ योगेशु

माझ्या आकलनानुसार मूळ प्रश्न "प्रोजेक्ट मॅनेज" करण्याबाबत नसुन "टीम मॅनेज" करण्याबाबत असावा.

मराठी कथालेखक's picture

6 Aug 2018 - 2:26 pm | मराठी कथालेखक

मूळ प्रश्न मला तसा फारसा झेपलाच नव्हता :)
पण तुमच्या प्रतिसादातून 'मॅनेजर न बनणे' = "प्रगती न करणे" असं काहीसं ध्वनीत होतंय असं वाटलं म्हणून प्रतिसाद दिल.

sagarpdy's picture

7 Aug 2018 - 1:53 pm | sagarpdy

सहमत.
मॅनेजर असणे आणि (सीनियर, उच्च हुद्दा, अधिक पगार) या एका नाण्याच्या दोन बाजू नाहीत, जरी बहुतांश वेळा निरीक्षण हेच असले तरी.
आमचा मॅनेजर अनुभव, हुद्दा, पगार सर्व बाजूने टीम मधील सिनियर कामगारांपेक्षा कमी आहे.

दुसरीकडून डिझायनर, आर्किटेक्ट वर्षानुवर्षे डायरेक्टर ला रिपोर्ट करतायत, ते कामगारांना मार्दर्शन करतात - त्यात खापर/श्रेय या भानगडी डायरेक्ट प्रोजेक्ट च्या यशापयशावर अवलंबून नसतात तर त्यांनी सुचवलेल्या बाबी किती योग्य होत्या यावर असतात.

सुधीर कांदळकर's picture

6 Aug 2018 - 7:42 pm | सुधीर कांदळकर

उत्तरे देत आहे.:
एखाद्या कंपनी मध्ये मॅनेजर होणे किती शहाणपणाचे आहे?
हे त्या कंपनीचे धोरण कसे आहे त्यावर अवलंबून आहे. धोरण एक्स (मॅकग्रेगर) कडे झुकणारे असेल तर शहाणपणाचे नाही. वाय कडे झुकणारे असेल तर शहाणपणाचे आहे. उदा आमचे संचालक फार उदारमतवादी आहेत. (आता मी सेवानिवृत्त झालो आहे) कधीही कुणाचीही रजा नाकारीत नाहीत. त्यामुळे कोणी कधी खोटे कारण देऊन रजा घेत नाही. विनाकारण उशीर झाल्यास उठायला उशीर झाला असे खरेच कारण सांगतात.

मॅनेजर म्हणून काम करताना तुम्हाला काय वाटते?
मला पंख फुटल्यासारखे वाटते. आपल्या अधिकाराकडे आणि आपल्या वरिष्ठांकडून तसेच कनिष्ठांकडून मिळणार्‍या आदराकडे जेव्हा आपल्या कार्यालयात आलेले खाजगी तसेच सरकारी पाहुणे जेव्हा कौतुकाने वा हेव्याने पाहातात तेव्हा आपला रुबाब वाढतोच.

तुमच्या टीम ने काय काम केले त्यावरच तुमची लायकी ठरते का?
अर्थात. सर्व टीम मेंबर्सच्या वैयक्तिक उत्पादनाच्या बेरजेपेक्षा किती जास्त उत्पादन वा उत्पादकता आहे, चांगल्या व्यवस्थापनामुळे तसेच मॅनेजरच्या प्रभावशाली व्यक्तिमत्त्वामुळे कामाची वाढलेली अचूकता, कामाचा वाढलेला दर्जा, सेवेची तत्परता आणि प्रत्येक टीम मेंबरची वाढलेली सकारात्मकता हीच मॅनेजरची किंमत.

तुमच्या स्वतःच्या कामाला काही किंमत राहते का?
कामाची किंमत ही असतेच. ती मोजण्यासाठी व्यवस्थापन शास्त्रात तंत्रे इव्हॅल्यूएशन टेक्निक्स आहेतच.

तुमची टीम कसे वागेल त्याचे खापर तुमच्यावर फोडले जाते का?
टीमचे वागणे हे मॅनेजरच्या व्यवस्थापन कौशल्याचा व्यक्तिमत्त्वाच्या प्रभावावर अवलंबून असतेच. व्यवस्थापनाचे तांत्रिक प्रकल्प व्यवस्थापन, धोरणात्मक आणि उद्योगव्यावसायिक व्यवस्थापन, नेतृत्त्व इ. पैलू आहेत. यात नेतृत्त्व आणि व्यवस्थापन या दोन कौशल्यांची तुलना फारच रोचक आहे. उदा. व्यवस्थापन कौशल्य हे प्रसंगानुरूप तात्कालिक वापरायचे असते तर नेतृत्त्व हे दूरदृष्टीने करायचे असते. नेतृत्त्व हे विश्वास निर्माण करते तर व्यवस्थापन हे नियंत्रणावर भर देणारे असते. चांगला व्यवस्थापक हा व्यवस्थापन आणि नेतृत्त्व यांचा समतोल साधतो. हे सारे साधतांना कंपनीच्या हिताला आणि संचालकांच्या धोरणाला बाधा न येता करावे लागते.

आणि तुमच्या वर खापर फुटणार म्हणून तुमची टीम निवांत असते का?
टीम मेंबर्सना संरक्षण दिले तरच ते चांगले काम करतील. त्यांच्या मनात तुमच्याबद्दल आदर आणि विश्वास निर्माण करता आला पाहिजे. प्रत्येक समस्या ही संधी मानून समस्येचे निराकरण करता वा समस्येला समाधानकारक उत्तर शोधता आले पाहिजे.

व्यवस्थापनाचा अतिशय महत्त्वाचा पैलू म्हणजे अतिगंभीर अशा अचानक उद्भवलेल्या समस्येतून वेळीच (टाईमली) मार्ग/तोडगा काढणे. तोही कंपनीच्या हिताला आणि संचालकांच्या धोरणाला बाधा न येता. इथे आपली सर्जनशीलता आणि प्रसंगावधान कसाला लागते.

तुम्हाला काय वाटते याबद्दल? तुमचा काय अनुभव आहे?
अनेक अनुभव आहेत परंतु विस्तारभयास्तव फक्त एकच देतो. ..... टीम निवांत असते का .... या मुद्द्यावर.
माझ्या शेवटच्या नोकरीत नुकतेच रुजू झाल्यावर एकदा मी चष्मा विसरून गेलो. कंपनी यंत्रे बनवणारी. प्रशासनाव्यतिरिक्त ग्राहकांना पुरवायच्या सुट्या भागांच्या विक्रीचा समन्वय हे अतिरिक्त काम माझ्याकडे होते. किंमतपत्रकात नसलेल्या भागांचे मूल्यांकन करून किंमत टाकणे हे माझे काम होते. मी पेन्सिलने किंमत टाकत असे. एका भागाची किंमत होती रु. १३५/- मी १ हा आकडा टाकतांना पेन्सिल मोडली. मी टोक काढून पुन्हा १ गिरवला. पण तो किंचित बाजूला पडल्यामुळे मला चष्म्याविना कळले नाही. मी १३५/- ११३५/- केले. ५० नगाचे ५०,०००/- वाढले. + एक्साईज + विक्रीकर. देकाराचा (कोटेशन)

महाजाल येण्यापूर्वी तेव्हा फॅक्स वापरला जात होता. संध्याकाळी फॅक्स मिळाल्यानंतर दुसरे दिवशी ग्राहकाने दूरध्वनीवरून संचालकांकडे विचारणा केली. त्या दिवशी देकार पाठवणारी कालची मुलगी गैरहजर. संचालकांनी मला बोलावून काय ते पाहायला सांगितले. त्या दिवशी मी कच्चे कागद काढून नीट पाहिले. काय झाले ते कळल्यावर मी नवा देकार बनवला. संचालकांना काय झाले ते आत्मविश्वासाने सांगितले आणि त्वरित दुरुस्ती केलेला देकार दाखवला. चूक सुधारण्याबरोबर नव्या नोकरीत संचालकांचा तसेच कार्यालयांचा विश्वास देखील संपादन केला.

व्यवस्थापन शास्त्रात कोड ऑफ कॉन्डक्ट हाही एक धडा असतो. प्रामाणिकपणाची, खिलाडूपणाची, न्याय्य म्हण्जे काय, फेअरनेस म्हणजे काय याच्या सुरेख व्याख्या देखील केलेल्य आहेत. महाजालावर तत्संबंधी मस्त चित्रे, तसेच व्यंगचित्रे आहेत.

सुनील's picture

6 Aug 2018 - 8:12 pm | सुनील

व्यवस्थापन कौशल्य हे प्रसंगानुरूप तात्कालिक वापरायचे असते तर नेतृत्त्व हे दूरदृष्टीने करायचे असते. नेतृत्त्व हे विश्वास निर्माण करते तर व्यवस्थापन हे नियंत्रणावर भर देणारे असते

आमच्या PMI च्या पुस्तकातील एक चित्र हा फरक व्यवस्थित समजाऊन देते.

ML

चौथा कोनाडा's picture

6 Aug 2018 - 9:35 pm | चौथा कोनाडा

+१

दोन्ही अनुभव घेतलेत ! आणि अर्थातच खालच्या चित्रात दाखवलेल्या वातावरणात काम करणे अत्यंत सुखवह व सुरक्षित वाटते ....
... पण गेले ते दिवस ... !

चौ. को. साहेब, क्लिअर करा प्लिज.
बॉस म्हणून कसा अनुभव होता आणि लिडर म्हणून कसा अनुभव होता?

चौथा कोनाडा's picture

13 Aug 2018 - 12:50 pm | चौथा कोनाडा

सुरुवातीला साहेब म्हणून जे होते ते लिडर कॅटेगरीतले होते ..... इनोव्हेटिव्ह वातावरण, प्रि-आटोमेशनचा काळ, खुप अयकाम करायला, अतिशय विश्वासाचं वातावरण.
अन नंतर जे लिडर म्हणवले जाणारे मॅनेजर होते ते बॉस होते, मग काय इचारुच नका !
तुमचेही अनुभव वाचायला आवडतील.

शाम भागवत's picture

6 Aug 2018 - 8:14 pm | शाम भागवत

विश्वासाच्या वातावरणात काम करता येण्यासारखी मजा नाही. तसे वातावरण निर्माण करण्याची कुवत असेल तर मॅनेजर व्हा किंवा सीईओ व्हा. काही फरक पडत नाही. कोणतीही बढतीची पायरी न चढता, अगदी त्याच पदावर राहिलात तरी मान सन्मान मिळतच राहतो व काम करण्याचा आनंद देखील. अट फक्त एकच. सतत शिकत राहण्याची वृत्ती हवी.

एखाद्या कंपनी मध्ये मॅनेजर होणे किती शहाणपणाचे आहे?

ते आपल्या शहाणपणावर अवलंबून आहे .. त्याच काय आहे काही कंपन्यांमध्ये मॅनेजर आणि कामगार यांची एकाच औकात असते .

मॅनेजर म्हणून काम करताना तुम्हाला काय वाटते?

मला सद्गदित झाल्यासारखे वाटते .. कधीकधी मी नाकात बोट घालतो आणि चाचपतो कोण काही बोलत आहे का ते . कुणीतरी थोडा जवळचा बोलला कि यार मॅनेजर सारखं राहा बघू .. तेव्हा मला पुन्हा मॅनेजर झाल्यासारखे वाटते .

तुमच्या टीम ने काय काम केले त्यावरच तुमची लायकी ठरते का?

लायकी हि एखाद्या चड्डिप्रमाणे आहे . कवचकुंडल नाही . उतरली कि सर्वांची उतरते . अगदी कंपनीचीही ...

तुमच्या स्वतःच्या कामाला काही किंमत राहते का?

घर सोडून बाकी सर्व ठिकाणी आपण एकदम मोजूनमापून घेतो , एकदम रुबाबात , काय .. बोलायचेच काम न्हाय .. डायरेक्ट सांगतो समोरच्याला " कामात वाघ आहे पण पगाराचे तेव्हढे बघा "

तुमची टीम कसे वागेल त्याचे खापर तुमच्यावर फोडले जाते का?

टीम गेली ...त . आपण कसे वागतो ते महत्वाचे आहे काय . तुम्ही ठरवायचं टीमने कास वागायचं ते .

आणि तुमच्या वर खापर फुटणार म्हणून तुमची टीम निवांत असते का?

मॅनेजरने मला वाटत कामाचं नाही केलं तर टीम आपोआप काम करत राहते . म्हणून मॅनेजरने निवांत नाकात बोट घालत राहावं आणि कोण मॅनेजर म्हणताय ते पाहत राहावं .

तुम्हाला काय वाटते याबद्दल? तुमचा काय अनुभव आहे?

मला काय वाटणार . मी तर जनरल मॅनेजर आहे एका नामांकित कंपनीत . माझी टीम एकदम जोरदार काम करतेय सध्यातरी आणि मी मस्त निवांत आहे ..

ट्रम्प's picture

7 Aug 2018 - 7:49 am | ट्रम्प

एकदम फटाकडा प्रतिसाद _/\_

नाखु's picture

6 Aug 2018 - 9:16 pm | नाखु

टाळ्यांच्या अभिलाषी असेल तर वेळप्रसंगी शिव्यांचा धनी व्हावे लागेल याची कणखर मानसिक तयारी असेल तरच व्यवस्थापक होणे योग्य.
बर्याच कंपन्यांमध्ये पुढारी पण करणार्या व तोडपुंजी जमणारी जमातीस मैनजर बनवायची प्रथा आहे ती वरील नियमास अपवाद आहे.

चरकातील ऊस समान नाखु वाचकांची पत्रेवाला

ट्रम्प's picture

7 Aug 2018 - 8:05 am | ट्रम्प

मी एका मारवाडी मॅनेजमेंट असलेल्या कं म्यानेजर पदावर 10 वर्ष होतो , भरपूर कष्ट केले आणि टीम कडून करून घ्यायचो , प्रत्येक वेतनवाढी ला मालक खर्च कमी करण्यासाठी बोलायचा की टीम चे जास्त न वाढवता तुला ज्यास्त वाढवून घे . मी तो प्रस्ताव हसून घालवायचो , कारण टीम यशशवी तर मी यशशवी . शेवटी म्यानेजमेंट ने राजकारण खेळून माझ्या सहकार्याला माझ्या शेजारी बसवले . मी कुठलाही वाद न घालता एक वर्षा पूर्वी सरळ राजीनामा देऊन टाकला आणि जी काही कंपनी कडून येणे होते ते घेऊन सरळ शेअर व फांडा मध्ये गुंतवले . लग्न ,पूजा , वाढदिवस आणि सायकल चालवणे मध्ये आनंद उपभोगत आहे .

कानडाऊ योगेशु's picture

7 Aug 2018 - 11:39 am | कानडाऊ योगेशु

ह्यावर सविस्तर वाचायला आवडेल.
मागे ५०फक्त ह्यांची "छगनलालचे सापळे" ही अनुभवावर आधारित मालिकाही वाचनीय होती.

सगळे जण मोठी झेप घेऊ शकत नाही , काही असतात आमच्या सारखे संकटे कायम मार्गात असणारे . डिप्लोमा नंतर ज्यास्त शोधत न बसता ज्या नोकऱ्या भेटल्या त्या करत गेलो आणि शेवटी छगनलाल सारख्या मारवाड्याच्या दावणीला बांधून घेतले . नावाला pvt ltd कंपनी पण एखाद्या शोरूम सारखा कारभार 90 च्या आसपास सगळे कर्मचारी एकाच तीन मजली इमारतीत 6 कंपन्या फक्त नावाला सुरू केलेल्या कारण कामगार कायद्याचे नियम चा ज्यास्त त्रास होऊ नये , इलेक्ट्रॉनिक वजन काटे, टॅक्सी रिक्षा फेअर मीटर प्रोडक्शन व्हायचे .लग्ना अगोदर गोवा , हिमाचल मध्ये प्रोडक्शन सेट करण्यासाठी साठी रात्रंदिवस काम केले . फक्त कौतुकाने भारावून जायचो , आर्थिक फायदा करून घेणे कधीच जमले नाही . इन्कम , एक्साईज,सेल्सटॅक्स वाल्यांच्या धाडी पडण्याची खबर मालकाला अगोदर लागायची मग आम्ही दोनचार सिनियर स्टाफ घरच कार्य असल्यासारखे फायली लांबवायला मदत करायचो फक्त कौतुक ऐकण्यासाठी .

पण ' त्या' छगनलाल मध्ये आणि आमच्या मारवड्यात एक साम्य होते ते म्हणजे सिल्क स्मिता सारख्या टंच मुली अपॉइंट करने , थोडे जरी डायमेंशन कमी भरले तर लगेच हकालपट्टी .तर अशा सिल्क रुपी स्टाफ सिनियर लोकांच्या डोक्यावर बसवायला सुरवात केली की जेणे करून जुनी लोक ज्यास्त आर्थिक वाद न घालता निघून जातील . माझ्या ही बाबतीत त्याने तोच प्रकार केला , कोर्टात केस टाकून मला जे काही भेटले असते त्याच्या दीडपट वर मी तडजोड करून एक वर्षा पूर्वी कंपनी सोडली .
कम्पनी सोडल्या नंतर मात्र मी दिल्ली epf ऑफिस आणि प्रधानमंत्री ऑफिस ला मेल पाठवून कम्पनी ची यशोगाथा (90 कामगार विदाऊट pf , ग्रॅच्युयेटी ) पाठवून दिली , दोन तीन दिवसात पुण्याचं सोडा मुंबईतील epf चा कमिशनर स्वतः धाड मारायला आला .
आता सरसकट सगळ्या लोकांना pf चालू केला आहे .

ट्रम्प's picture

7 Aug 2018 - 6:59 pm | ट्रम्प

तिथे प्रदूषण तपासणीसाठी co2 मीटर तर इथे रिक्षा तील इलेक्ट्रॉनिक फेअर मीटर ,
दोन्ही मीटर परिवहनमंत्री , आर टी ओ कमिशनर नां पैसे चारून सक्तीचे करायला लावले ,
प्रत्येक एक दोन वर्षांनीं त्या मीटर ची आर टी ओ कडून तपासणी असते त्यात कम्पन्या आणि आर टी ओ दोघेही माला माल ,
फक्त नावाला च दोन्ही मीटर इलेक्ट्रॉनिक आहेत पण त्यातील सॉफ्टवेअर द्वारे मेकॅनिकल मीटर प्रमाणे फेरफार करून ग्राहकां चीं फसवणूक करता येते .

ट्रम्प's picture

7 Aug 2018 - 12:10 pm | ट्रम्प

काय लिहलय राव , एकदम कडक !! ताबडतोब दोन पार्ट वाचून काढले .
कुठे गेले ते मुक्तविहारी ?
धन्यवाद योगेशु तुमच्या मूळे मारवाड्यांचे अजून प्रताप सापडले .
https://www.misalpav.com/node/22087

शाम भागवत's picture

7 Aug 2018 - 3:17 pm | शाम भागवत

माझे पण झाले वाचून.
फारच भारी आहेत सगळे भाग.

कोणतीही लोककल्याणकारी योजना कागदावर येण्याअगोदर त्या लोककल्याणकारी योजनेतून पैसे कसे मिळवायचे याबाबतची योजना प्रथम बनते. असो.

चौथा कोनाडा's picture

8 Aug 2018 - 10:33 pm | चौथा कोनाडा

ही छगनलालची लेखमाला संपुर्ण वाचून काढली, एकदम भारीय ! जबरी रोचक !

राजेंद्र मेहेंदळे's picture

9 Aug 2018 - 12:19 pm | राजेंद्र मेहेंदळे

पण बहुतेक धागा आणि बरेच प्रतिसाद आय. टी. क्षेत्राला अनुसरुन आहेत. ईतर क्षेत्रात काय चालते ते वाचायला आवडेल.

मी स्वतःबरीच वर्षे टेक्निकल आणि मग सोल्युशन आर्किटेक्ट वगैरे करुन आता रितसर मॅनेजर झालोय(अर्थात आय. टी. मध्ये) . आणि सध्या २-३ वर्षेच झाल्याने (आणि हे ही काम जमत असल्याने) मला तरी मजा येत आहे. टीमही चांगली आहे आणि मी मायक्रो मॅनेज् मेंट करत नाही.

वर बाकीचे म्हणताहेत त्या प्रमाणे करीयरमध्ये तुम्ही एकाच जागी राहु शकत नाही. रॅट रेस प्रमाणे तुम्ही पुढे गेला नाहित तर मागचे आहेतच तुमची जागा घ्यायला. आणि पगार वाढत राहणे हे सुद्धा मह्त्वाचे आहेच. घरच्यांना तुम्ही ऑफिसमध्ये मॅनेजरगिरि करता की झाडु मारता याच्याची काही कर्तव्य नसते, १
तारखेला पगार आला पाहिजे आणि घरचे शाळेचे किराणामालाचे बिल भागले पाहिजे.

त्यामुळे सध्या तरी जे समोर येईल ते मन लावुन करणे एव्हढेच खरे.

घरच्यांना तुम्ही ऑफिसमध्ये मॅनेजरगिरि करता की झाडु मारता याच्याची काही कर्तव्य नसते, १
तारखेला पगार आला पाहिजे आणि घरचे शाळेचे बिल भागले पाहिजे.

त्यामुळे सध्या तरी जे समोर येईल ते मन लावुन करणे एव्हढेच खरे.
ह्या लॉजीकसाठी कडक सॅल्युट

हे लाॅजिक लावणारेच सुखी होतात.

सिरुसेरि's picture

10 Aug 2018 - 5:01 pm | सिरुसेरि

व्यवहारी आणी उपयोगी लॉजिक .