पाकीस्तानी निवडणूका आणि अस्थिरता पुढेही कायम रहाण्याची चिन्हे

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
14 Jul 2018 - 2:09 pm
गाभा: 

पाकीस्तानी लोकशाही अद्याप लष्करी प्रभावातून बाहेर येण्यास बराच अवकाश असावा. पण कमीतकमी मागच्या निवडणूका नंतर प्रत्यक्ष लष्करी हस्तक्षेप न होता पाकीस्तान पिपल्स पार्टी चे सरकार जाऊन मुस्लिम लीग नवाज शरीफ सरकारच्या हाती सत्ता सुपूर्द होऊन पाच वर्षे सरकार चालले हिच पाकीस्तानसाठी मोठी गोष्ट असावी.

पाच वर्षांनतंर पुन्हा एकदा येत्या २५ जुलैला पाकीस्तानात निवडणूका होऊ घातलेल्या दिसतात. ओपीनीयन पोल्सच्या एक दोन बातम्या आल्या आहेत. त्यानुसार पाकीस्तानी पंजाबात मुस्लिम लीग नवाझ शरीफ यांचा प्रभाव अद्याप कायम असावा, पाकिस्तानची त्यातल्या त्यात सेक्युलर पार्टी पाकीस्तान पिपल्स पार्टीची मात्र पडझड होऊन ईम्रान खानची PTI पार्टी पाकिस्तानातील मुख्य विरोधी पक्षाची जागा घेईल असे दिसते. ईम्रान खान हे नाव क्रिकेट मुळे भारतीयांना माहित असले तरी ईम्रान खानने आता पर्यंत घेतलेल्या भूमिका सर्वसाधारणपणे कट्टरतावादावर पांघरूण घालणार्‍या घेतल्या असाव्यात . त्यात ओपिनीयन पोल्स नुसार मुस्लिम लिग- नवाज शरीफ मोठा पक्ष राहीला तरी पूर्ण बहुमताची शक्यता कमी असून त्रिशंकू स्थिती संभवण्याची शक्यता असावी. म्हणजे परिणामी सत्तेत कोणतेही सरकार आले तरी छोट्या ते मोठ्या कट्टरतावादी पक्षा सोबत संसार करण्याची वेळ येऊ शकते.

अर्थात गेल्या पाच वर्षातील पाकीस्तान मधील बातम्या पाहील्या तर कट्टरतावाद कमी होण्या एवजी वाढण्याकडे कल राहीला असावा. पाकीस्तान पिपल्स पार्टी , मुस्लीम लीग आणि ईम्रान खानची पार्टी मिळून राजकारणाला स्टॅबिलीटी देतील आणि अधिक कडव्या कट्टरांवर अवलंबून असणार नाहीत तो पर्यंत अणवस्त्रे अतिरेक्यांच्या प्रत्यक्ष हातात पडण्याची शक्यता कमी राहील. पण त्रिशंकू स्थिती झालीतर कडवेपणा वाढून त्याचा अफगाणीस्तान विषयक भूमिकात असहकार्याची भूमिका वाढून अफाअणिस्तान - ट्रंप समोरचे आवाहन वाढते, आणि भारतासाठी आहे नित्याच्या कटकटींना तोंड देण्याची पुढची मानसिक तयारी करावी लागणार असे वाटते.

* पाकीस्तानी ओपिनीयन पोल संदर्भ १

* पाकीस्तानी ओपिनीयन पोल संदर्भ २

प्रतिक्रिया

सोमनाथ खांदवे's picture

14 Jul 2018 - 6:10 pm | सोमनाथ खांदवे

हमारे पडोसी मुल्क में चुनाव होने जा रहे है | तू उन्हे सही रास्ता चुनने में मदत कर ताकी वाहां की जनता अपने दिलोजही से अपनी हुकूमत चुन सके | नई हुकूमत आने के बाद भी अपनी जान पे खेल कर वाहां की समाज सेवी संघटनाओ का पाकिस्तान की आबादी कम करने का काम चलता रहे | वो लोग पाकिस्तान को सबसे बढिया और सस्ता मेडिकल टूरिझम डेस्टिनेशन बनानेवाले है | खुद की ईच्छा से अल्लाह से मीलना , बॉडी पार्टस होलसेल बिजनेस बढाना ऐसे और उनके समाजके हीत वाले मकसद पुरे करने में मदत कर |
और उनही संघटना को हमारे हिंदुस्तानी लोग आतेरिकी संघटना कह के बदनाम करते है , मेरे आका ऊन हिंदुस्थानी की सोच बदल दे |
वाहां की हुकूमते और वाहां की आर्मी अब तक अमेरिका से भीक मांग के जी रही थी और अब चायना के परवरिश पे जी रहे है |
या खुदा अब तू उनको खुद के कदम पर खडा रहने में मदत कर ताकी वो लोग सर उंचा करके हिंदुस्तान से भी भीक मांगे |
मेरे आका कितने सोशल ऍक्टिव्हिस्ट को बहत्तर हुरे मिली एक बार तो हमें बता दो , कश्मीर में ऐसे ऍक्टिव्हिस्ट बहत्तर हुरे पाने के लिये लाईन में रुके है

शशिकांत ओक's picture

15 Jul 2018 - 7:16 am | शशिकांत ओक

सोमनाथ खांदवे, मुख्य पोस्ट पेक्षा आपली प्रतिक्रिया व '७२हूरे' वगैरे वगैरे वाचून तिखट मीठ लावून मसाला मस्त जमलाय. कयामत तक थांबून तुंबलेल्या लांबलचक क्यू तील आतूर पुरुषांना हूरेबहत्तर कामाला येतील. मग त्यांच्या बायकांची सोय कशी काय केली जाणार? माहितगारांकडून खुलासा व्हावा...

शशिकांत ओक's picture

15 Jul 2018 - 7:23 am | शशिकांत ओक

नमस्कार, तुकाराम बुवांच्या सासुरवाडीने प्रसिद्ध लोहगाव येथे बरेच खांदवे मंडळींची शेती आहे. त्यांच्या पैकी पैकी एक आपण आहात काय ❔

सोमनाथ खांदवे's picture

15 Jul 2018 - 9:28 am | सोमनाथ खांदवे

कैसे क्या पैचाना ? चारो तर्फ आपके आदमी फैले है क्या ?.

जेम्स वांड's picture

15 Jul 2018 - 9:13 am | जेम्स वांड

तुम्ही नक्की एअरफोर्स मधे होता न हो? असो! खांदवेंचे सोडा, ते बरोबर देतात प्रतिक्रिया (जमेल तश्या, पण देतातच नेटाने)

@माहितगार जी,

पाकिस्तान निवडणुकीसारख्या महत्वाच्या विषयवार बोलावे तितके कमी आहे. ह्यावेळी लढत विचित्र आहे

१. भुट्टो गट सिंध बाहेर नाहीये (तसं तर बिलावलने आपले सगळे कार्यक्रम रद्द केलेत म्हणे प्रचाराचे)

२. पीएमएल - एन पंजाब बाहेर नाहीये, त्यात नवाझ शरीफने 'शहीद' कार्ड खेळायचा पूर्णपणे शर्थीचा प्रयत्न केलाय (संदर्भ शरीफने केलेलं पाकिस्तानात यायच्या पूर्वीचं विधान - मी हे तुमच्यासाठी करतोय (जनतेला उद्देशून) )

३. इम्रान खान (पाकिस्तान तेहरिक ए इंसाफ उर्फ पीटीआय) - पाकिस्तानी केजरीवाल म्हणावे असले हे 'अनऑर्थोडोक्स' (वाचा माकडचाळे करणारे) ,राजकारणी होत, आपल्याच अध्यात्मिक गुरुशी लग्न करणे (बुशरा बेगम) वगैरे प्रताप ह्यांनी केलेत (तिला म्हणे स्वप्नात आदेश दिला गेला होता की इम्रानला पंतप्रधान व्हायचं असलं तर त्याने तिच्याशी लग्न करावे, हे स्वप्न सत्य करायला तिच्या नवऱ्याने तिला 'राष्ट्रोद्धारा' करता तलाक दिला) , गंमत म्हणजे जिथून हा माणूस निवडणूक लढवतो त्या खैबर पख्तुनखवा मधल्याच मंजीर पश्तीन संचालित 'पख्तुन लोंग मार्च' मध्ये ह्यांचे सहभाग थातूरमातूरच होते. पण जितका सहभाग होता तो लोंगमार्चला थंड करण्याकडे ढकळणार होता, त्यामुळे इम्रान तूर्तास तरी पाकिस्तान आर्मी अन आयएसआयच्या गुड बुक्स मध्ये आहे.

भारतीय पॉलिसीला सुटेबल काही हवे असले तर ते एकच आहे, पाकिस्तानी जनतेला कुठूनही कुठल्याही अँगलने पाकिस्तानात लोकशाही रुजते आहे अशी आशा वाटायला नको, सुदैवाने सध्या (नवाझ अटकेनंतर) चित्र तसे सशक्तपणे उभे राहिले आहे. पाकिस्तानचे अलटीमेट तुकडे पाडून बाल्कनायजेशन करायचं असेल तर तिथल्या जनतेचा आर्मीवरील रोष उत्तरोत्तर वाढत जाईल असे पाहायला हवे, तिथे लोकशाहीची झुळूक तूर्तास तरी वाहायला नको इतकं मात्र खरं.

तुषार काळभोर's picture

20 Jul 2018 - 3:06 pm | तुषार काळभोर

टीप: मला आंतरराष्ट्रीय राजकारणाची माहिती शून्य आहे

म्हणून... शंका-

भारतीय पॉलिसीला सुटेबल काही हवे असले तर ते एकच आहे, पाकिस्तानी जनतेला कुठूनही कुठल्याही अँगलने पाकिस्तानात लोकशाही रुजते आहे अशी आशा वाटायला नको, सुदैवाने सध्या (नवाझ अटकेनंतर) चित्र तसे सशक्तपणे उभे राहिले आहे. पाकिस्तानचे अलटीमेट तुकडे पाडून बाल्कनायजेशन करायचं असेल तर तिथल्या जनतेचा आर्मीवरील रोष उत्तरोत्तर वाढत जाईल असे पाहायला हवे, तिथे लोकशाहीची झुळूक तूर्तास तरी वाहायला नको इतकं मात्र खरं.

पाकिस्तानचे अलटीमेट तुकडे पाडून बाल्कनायजेशन होण्यापेक्षा पाकिस्तानात लोकशाही रुजून, तिथले लष्कर लोकशाहीच्या अधीन होणे, हे भारतासाठी जास्त सुखकर नसेल का?

शाम भागवत's picture

15 Jul 2018 - 1:35 pm | शाम भागवत

मी काही पाकीस्तानी मिडियातील निवडणूक चर्चा युट्युबवर ऐकल्या. प्रत्येकात मोदींचा उल्लेख येतोच.

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 Jul 2018 - 1:52 pm | डॉ सुहास म्हात्रे

पाकिस्तानातल्या निवडणूकांच्या निर्णयांचा कितीही आणि कोणत्याही प्रकारे विचार-विश्लेषण केले तरी सर्वांचा निर्णय एकच येतो... लोकशाहीचा बुरखा घेतलेले व जबरदस्तीने का होईना पण पाकिस्तानी लष्कराच्या पूर्ण नियंत्रणाखाली असलेले प्रशासन स्थापन होईल.

जेम्स वांड's picture

15 Jul 2018 - 2:33 pm | जेम्स वांड

मणभर साखर पडो काकाश्री.

पाकिस्तानी जनतेला अजून काही वर्षे असेच रगडलं तर निवांत अंतर्गत यादवी माजेल तिथं, मजा येईल.

डँबिस००७'s picture

15 Jul 2018 - 5:17 pm | डँबिस००७

पाकिस्तान नावाच्या देशाचा शेवट जवळ आलेला आहे. देशाच्या स्थिरतेला अनेक पैलु असतात जसे की, सैन्य, राजकीय स्थिरतेवर , देशाची आर्थिक स्थिती. त्यातील प्रत्येक पैलुवर पाकिस्तान देश फेल गेलेला आहे. पाकिस्तान देशाची आर्थिक स्थिती फारच डबघईला आलेली आहे. गेल्या तीन वर्षात पाकिस्तानने वर्ल्ड बँकेकडुन , आय एम एफ कडुन पुर्वी घेतलेल्या लोनवरचे व्याज परत करण्यासाठी घेतलेले आहे. पाकिस्तानचा निर्यात ३० बीलीयन डॉ वरुन घसरुन आता १५ बिलीयन पर्यंत खाली आलेला आहे. त्यामुळे ट्रेड डेफिझीट खुप वाढलेल आहे. निर्यात वाढण्याची शक्यता नाही. पाकिस्तानात देशातले बरेच लोक मोजक्या आखाती देशात ( आखाती देशात ) मजुर म्हणुन काम करतात, (हे कामगार वर्षाला कित्येक बिलीयन डॉ पाकिस्तानला पाठवत असतात,) त्यातील काही देशांनी राजकिय निर्णय म्हणुन पाकिस्तान्च्या ह्या मजुर लोकांना घ्यायच बंद केलेले आहे. त्यावर जागतीक आर्थिक परिस्थीती मुळे क्रुड ऑईलच्या उतरलेल्या किमतींमुळ रोजगारात कमी आलेली आहे .

येत्या तिन चार महीन्यात पाकिस्तानच्या आर्थिक परिस्थीतीवर पाकिस्तान हा देश म्हणुन एकत्र राहील का हे क्लियर होईल. पाकिस्तानचे तुकडे हे यादवी नंतर होतील.

बहत्तर हुरे पाने के लिये लाईन में रुके है
ज्यांना घाईने हुर दर्शन घडवायचे असते त्यांना सरळ बॉम्ब स्फोट करुन पाठवले जाते !

ज्यांना झेपेल त्यांनीच हा व्हिडियो पहावा ! खरं तर या देशातल्या अनेक मंडळीना तप्तरते ने हुर दर्शन करण्यासाठी पाठवले पाहिजे उगाच आपल्या देशात येउन हुर दर्शन करण्याचा लांबचा पल्ला गाठावा लागतो ! आपल्या देशात राहुन नव्याने वेगळा देश मागणार्‍यांना इथली मोफत सैर घडवुन आणण्याची आणि किमान ५ वर्ष तिथे सुखनैव राहण्याची सोय करण्याची गरज आहे म्हणजे आपण सगळ्यात जास्त हिंदुस्थानातच कसे सुखी आहोत आणि जे जगात करता येत नाही ते केवळ आणि केवळ हिंदुस्थानातच करण्याची मोकळीक आहे याची अनुभुती त्यांना घेता येइल.
संदर्भ :- Nation mourns as death toll from Mastung blast rises to 131
Cleric wants separate country for Indian Muslims if Sharia courts are not allowed

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- बेदर्दी बालमा तुझको मेरा मन याद करता है, बरसता है जो आँखों से वो सावन याद करता है... :- Arzoo [ 1965 ]

शशिकांत ओक's picture

16 Jul 2018 - 8:14 pm | शशिकांत ओक

जन्नत या जहन्नुम? हे कयामत च्या दिवशी अल्लाह ठरवणार... बहत्तर हूरे, शराब का नशा, शहद की नदियाँ, सब कुछ बाद में भाई!...
तो पर्यंत या धरतीवर जहन्नुम बनवायची कारिगरी चालू राहील...!
पवित्र भूमीत चाललेला धुडगूस व अराजकता ही संपूर्ण जगाला विनाशाकडे नेणारी आहे. तुकडे करून फारसा फरक पडत नाही. कारण मानसिकता जोवर विनाशबुद्धीची आहे तोवर मानवतेच्या संकल्पना धोक्यात आहेत.

एकुलता एक डॉन's picture

16 Jul 2018 - 1:02 am | एकुलता एक डॉन

samjha pakistan che tukde jhale tar

chaina ani baki lok karj konakadun wasul karnar

डँबिस००७'s picture

16 Jul 2018 - 5:55 pm | डँबिस००७

samjha pakistan che tukde jhale tar
chaina ani baki lok karj konakadun wasul karnar

चायना पाकिस्तानात प्रोजे क्ट वर पैसे खर्च करत आहे पण त्यांचे मॉडेल वेगळे आहे. CPEC ( CHINA PAKISTAN ECONOMY CORRIDOR ) हा प्रोजेक्ट पुर्ण व्हायच्या आधीच चायनाच्या लोकांनी पाकिस्तानात गाव वसवायला सूरुवात केलेली आहे. काही
भागात चीनी भाषा , चीनी पेपर सुरु झालेले आहेत. पाकिस्तानचे तुकडे पडले तर ते त्यांच्या पथ्यावरच पडेल. काही तुकडे अनायास गिळंकृत करायला मिळतील , पाकिस्तानात त्यांना विरोध करणारा कोणी नसेल, बाकि च्या जगात कोणाकडे तेव्हढी धमक नाही,
अमेरीकेला त्याची पडलेली नाही.

निकाल काहीही येवो, पाकिस्तानी सैंन्यानी प्रत्यक्ष सत्ता ताब्यात घेण्याची शक्यता फारच कमी आहे. त्याऐवजी पाकिस्तानात कळसूत्री बाहुल्याचे सरकार आणण्यासाठी कंबर कसलेली दिसते आहे.

पाकिस्तानच्या सैन्याचे आणि त्या अदृश्यवत 'एस्टॅब्लिशमेंट'चे इम्रान खान किंवा अपक्षांचे सरकार निवडून आणण्यासाठी चाललेले अविरत प्रयत्न आणि त्यासाठी योजल्या जात असलेल्या साम-दाम-दंड-भेद अश्या सर्व युक्त्या वाचून पाकिस्तान आणि लोकशाही हे विरुद्धार्थी शब्द वाटावे अशी परिस्थिती आहे.

एक पाकिस्तानी पत्रकार आहेत, वुसअतुल्लाह खान नावाचे. देशातच राहून निष्पक्ष आणि निर्भीडपणे लिहू शकणाऱ्या काही मोजक्या पाकिस्तानी पत्रकारांपैकी एक. गेली काही दिवस त्यांचे कव्हरेज वाचतो आहे.
ते लिहितात -

"पाकिस्तान में इलेक्शन नहीं सेलेक्शन होने जा रहा है. जिसके पास भी मुस्लिम लीग - नवाज़ का टिकट है, उस पर ऊपर-नीचे, दाएं-बाएं से दबाव है - टिकट वापस करो या दूसरी पार्टी में शामिल हो जाओ या फिर आज़ाद चुनाव लड़ो या फिर फलां फलां मुकदमे में सरकारी गवाह बन जाओ. वरना ये बताओ इतने ठाटबाट से अब तक कैसे रह रहे हो, टैक्स कितना दिया, कितना छुपाया, फलां ठेके में कितना कमाया, अदालतों की तौहीन क्यों की, लोगों को तोड़-फोड़ के लिए क्यों उकसा रहे हो? "

हिंसाचार आहेच, २५ जुलैच्या मतदानापर्यंत तो वाढतच जाणार आहे. अपहरणाच्या भीतीमुळे अनेक शरीफ समर्थक भूमिगत झाले आहेत. भुत्तोंच्या पाकिस्तान पीपल्स पार्टीने लढत वाऱ्यावर सोडून दिल्याचे चित्र आहे. अन्य छोटे पक्ष आणि बाजारबुणगे ह्यांच्यातच ही लुटुपुटुची निवडणूक होत आहे.

सैन्याची पसंती इम्रानच का तर हवे तेंव्हा 'हनी टॅप' वापरून सैन्याच्या मनाप्रमाणे सर्व करायला सहज भाग पाडता येऊ शकणारी सुमार राजकीय व्यक्ती.

एकाधिक सत्ताकेंद्रे असलेला अस्थिर पाकिस्तान भारतासकट संपूर्ण जगासाठी एक मोठी डोकेदुखी ठरणार यात संशय नाही. :-(

अनिंद्य

सोमनाथ खांदवे's picture

16 Jul 2018 - 6:28 pm | सोमनाथ खांदवे

आता पर्यंत चा इतिहास पाहता डोईजड झालेले प्रत्येक सरकार पाकिस्तानी लष्कराने उलथून टाकले आहे . तेथील लष्कराला जगाला दाखविण्यासाठी बुजगावणे रुपी सरकार पाहिजे असते . पण पाकिस्तान मधील जनते ची लायकी पण तीच आहे असे वाटते , तेथील जनता व सर्व पक्ष मिळून लष्कराच्या दडपशाही च्या विरोधात का नाही जात ? नवाज ला आत टाकलाय तर इम्रान गुढग्या ला बाशिंग बांधून तयार , उद्या इम्रान ला आत टाकतील तर दुसरे कोणीतर बाशिंग बांधून तयार अस पाकिस्तान च्या निर्मिती पासून होत आले आहे पण ना जनता ना तेथील पक्ष शहाणे झाले .
जेव्हां जेव्हां तेथील लोकशाही चा गळा लष्कराने घोटला त्या प्रत्येक वेळी तेथील सगळे पक्ष आर्थिक गणिते करत बसले असतील पण लष्कराच्या दडपशाही च्या विरोधात एकत्र आले नसतील म्हणून तिथे लोकशाही कधी रुजलीच नाही .
शाळेत घुसून शंभर सव्वाशे मुले क्रूरपणे ती लोक मारतात कसे ? , मुलींच्या शिक्षणा साठी आग्रह करणाऱ्या मलाला च्या डोक्यात गोळ्या , पोलिओ लसीकरण कार्यकर्त्यांच्या हत्या हे काय दर्शविते ? कसली रानटी टोळ्यांची मानसिकता ? जो पर्यन्त ही मानसिकता बदलत नाही तो पर्यंत तिथल्या भाता ची परीक्षा आपल्या इथे शिता मध्ये दिसणारच .

If a South Asian Armageddon is to be prevented, it is essential to build a structure of stable deterrence between India and Pakistan and find ways to deal with Kashmir and other outstanding disputes. Reviving consideration of a strategic restraint regime (पुर्व नियोजित संयमाची व्यवस्था) would be a good place to start.
.........

पाकिस्तानातील दै. डॉन मधे आलेल्या वरील लेखावर अनेकांनी 230च्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यातील काहींच्या मतांचे विश्लेषण –
अनेक पाकिस्तानी भारतीय प्रतिक्रिया देणाऱ्यांना उद्देशून म्हणतात, ‘आमच्यापेक्षा कितीतरी अधिक भारतीयांच्या प्रतिक्रिया कशा काय येतात बुवा?’, ‘काहो, आमचे वर्तमानपत्र वाचून आम्हालाच दूषणे द्यायला बरीच सवड असते वाटते!’. एक म्हणतो, मला स्तंभ लेखकाचे म्हणणे मुळीच मान्य नाही की पाकिस्तानची सैन्यबळ तुटपुंजे आहे म्हणून आपण भारताला पारंपारिक युद्धात हरवू शकत नाही व अहो जरा इतिहासाची चाड ठेवा. गझनवी, अबदाली, मुघल राजे, लोदी वगैरेकडे हिंदूंच्या मानाने नेहमीच कमी सैन्य व शस्त्रास्त्रे होती पण त्यांनीच हिंदूंच्या अपार सैन्याचा फडशा वेळोवेळी पाडला होता. मग आपल्याला चिंता कशाला? पुन्हा एकदा भारताला पाणी पाजायला पाकिस्तानला सहज शक्य आहे. लेखक महाशयांनी आपल्या लेखात विविध 10 कारणातून पाकिस्तानला हा एकमेव (उरलासुरसा) पर्याय वापरायला भाग पाडू नये. भारताला व पर्यायाने जगाला ते महागात पडेल. यावर भारतीय प्रतिक्रियातून दिलेली तंबी की पाक भारताचा काही भूभाग जायबंदी करेल पण पाकिस्तानाचे जगाच्या नकाशातून अस्तित्व नष्ट होईल याची नोंद आपण घ्याल... आम्ही मरूच पण तुम्हाला बरोबर घेऊन स्वर्गात पदार्पण करताना आम्हाला काश्मीरसाठी आत्मसमर्पण केल्याचे समाधान मिळेल त्याचे काय असा उलट प्रश्न केला आहे. फक्त एका पाकिस्तान्याने म्हटले आहे. या काश्मीरसाठी आपण इतके का इरेला पडावे? आहेत त्यांना खूष ठेवायला आपण काय करतोय? या शिवाय उरलेल्यांना आपल्या उरावर घेऊन त्यांना काय मिळणार हेच मला कळत नाही? एकांनी मुनीर महाशयांची 2003 साली अमेरिकेतील एका बाईबरोबर झालेल्या लफड्याची आठवण करून दिली. राजनैतिक प्रभावाखाली ते त्या भानगडीतून कसेबसे सुटले होते म्हणून संभावना केली. 370 कलम, न्यूकची सध्याची संख्या, पाकिस्तानी सैन्याचे दुतर्फा सीमेवरील दडपण यावर अनेकांनी उलट सुलट लिहिले होते. न्यूक खेळणी ही काही उचलली आर्मरीतून व टाकली भारताच्या टाळक्यावर इतकी सोपी गोष्ट नाही, त्याला काय काय पुर्व तयारी करावी लागते याची सविस्तर जाणीव करून दिली. 8व्या कारणातील पाकिस्तानी तालेबान्यांना व बलुची मुक्ती सेनेला भारतीयांची फूस आहे यावर अनेक भारतीयांच्या प्रतिक्रियातून ते चकित झाल्याचे जाणवते. ज्यांचा बंदोबस्त करा म्हणून भारत पाकिस्तानला मागणी करतोय त्याच लोकांना भारताने पाकिस्तानात जाऊन लढायला मदत करावी हे अतिरंजित आहे. मोदींच्या नेतृत्वाची युद्ध पिपासू म्हणून केली गेलेली सरसकट संभावना अनेक भारतीयांनी नाकारली आहे. 9व्या कलमातील भारताची अट की आधी सीमेपलिकडून आतंकवादाला आळा घाला तरच मग बोलणी करू ही पाकिस्तानला न पेलणारी अट आहे. दहाव्या मुद्यात अमेरिका व अन्य जगातील मुख्य देशांना आता हे लक्षात आले आहे की काश्मीरप्रश्न महत्वाचा उरलेला नाही. ही सत्यता लेखकाला मान्य आहे. म्हणून शेवटच्या भागात अमेरिकेने सध्या भारताशी लगट चालवल्याचे वाईट वाटताना जर ‘न्यूक खेळणी’ वापरायची नसतील तर परस्परातील स्ट्रॅटेजिक रिस्ट्रेंट रेजीम (पुर्व नियोजित संयमाची व्यवस्था) हाच एकमेव पर्याय आहे. असे सामोपचारी विचार व्यक्त केले आहेत.
......
संकलक - विंग कमांडर शशिकांत ओक. (निवृत्त) मो. 9881901049.

माहितगार's picture

17 Jul 2018 - 11:26 am | माहितगार

जिथ पर्यंत पाकीस्तानी आजीमाजी राजदूत आणि आजीमाजी परराष्ट्रमंत्री त्यांच्या लेखातून बोलण्यातून परमाणू युद्धाची शक्यता आंतरराष्ट्रीय मिडियाला ऐकु येईल अशी वाढवून सांगतात जेणे करुन बाकीच्या जगाने काश्मिर प्रश्नावर पाकीस्तानच्या बाजूने भारतावर दबाव टाकावा अशी त्यांची इच्छा असते. पाकीस्तानी थापाडे पणा उघडा पाडण्याच्या दृष्टीने सर्गीकल स्त्राईक ओपनली करणे योग्य झाले. अर्थात पाकीस्तानमधली लोकशाही अस्थीर होऊन खरोखर प्रत्यक्ष अतीरेकी डोक्यांच्या हातात सत्ता आणि प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परमाणू अस्त्रे पडली तर काय ? अशा स्थितीत भारतापुढे काय पर्याय आहेत ? हि एक चिंतेची बाब नक्कीच असावी. संदर्भ

बाकी आपण दिलेला सम्दर्भ ४ एक वर्षे जुना असावा.

माहितगार's picture

20 Jul 2018 - 12:31 pm | माहितगार

आमेरीकन रिस्पॉन्सचा फॉर्मॅट कदाचित या शोध निबंधातून लक्षात यावा, यातून भारताने शिकण्यासारखे काही असू शकेल का ?

प्रसाद_१९८२'s picture

26 Jul 2018 - 4:35 pm | प्रसाद_१९८२

पाकिस्तानचा पुढील पंतप्रधान इम्रान खान असेल असे सध्याच्या आकड्यावरुन दिसत आहे.
Pakistan Tehreek-e-Insaf = २७२/११९ जागा

सोमनाथ खांदवे's picture

27 Jul 2018 - 8:02 am | सोमनाथ खांदवे

आयो रे !!!! रंगीला रतन आयो !!!!
कालच इम्रान खान ने प्रेसकॉन्फरन्स घेऊन टाकली आणि भारत आणि पाकिस्तान मधील काश्मीर हा कळीचा मुद्दा आहे तो चर्चेने किंवा लष्करी मार्गाने सुटू शकतो अस सांगितले . काश्मीर मध्ये दडपशाही चालली आहे असे म्हणताना मूहाजीर आणि बलुच लोकांवर पाकिस्तान करत असलेली दडपशाही ला त्याने बगल दिली .
मूहाजीराचे हाल कुत्र खात नाही आणि काश्मिरी मुस्लिमांना पाकिस्तान शी निकाह करायचा आहे .

माहितगार's picture

23 Aug 2018 - 12:15 pm | माहितगार

India should ignore Imran Khan’s virtue-signalling: हा फर्स्टपोस्ट मधील स्रीमय तालुकदार यांचा लेख पाकीस्तान - भारत संबंधांवर लक्ष्य ठेऊन असणार्‍यांसाठी अगदी दखल घेण्या जोगा आहे.

सोबतच इम्रानच्या लष्करधार्जीण्या मंत्रिमंडळाची माहिती ताज्याघडामोडी धाग्यात दिलेला माझाच माहिती प्रतिसाद इतर चर्चेत हरवून जाण्यापेक्षा इथे पुन्हा एकदा च्योप्यपेस्त करतोय.

इम्रान - मुशर्रफच मंत्रिमंडळ परत एकदा

इम्रान खानच्या नवीन मंत्रिमंडळातील २१ पैकी १२ मंत्री पुर्वाश्रमीच्या जनरल परवेझ मुशर्रफच्या मंत्रिमंडळात होते . म्हणजे लष्कराचा वाढता प्रभाव लक्षात यावा. खैबर पख्तुन्वाचा इम्रान खानच्या पक्षाचा मंत्री आता डिफेन्स मिनीस्टर आहे. म्हणजे लष्कर आणि अतिरेकी धार्जीण्य यात समन्वय साधणे सोपे जाईल असा आडाखा असावा. शिरीन मझाली नावाची स्त्री जी अण्वस्त्रे टाकण्यासाठी कोणती शहरे निवडावीत कोणती निवडू नयेत याची उघड चर्चा करते तीला मानवाधिकार मंत्रालय दिले आहे . आणि २००८ च्या मुंबई हल्ल्याच्यावेळी चा परराष्ट्रमंत्री पुन्हा एकदा परराष्ट्र मंत्री म्हणून कारभार बघणार आहे.

इम्रान खान ने मंत्रिमंडळ कर्मठ निवडलेले आहे पण त्याची महत्वाची परिक्षा आर्थीक आघाडीवर परकीय चलनाची गंगाजळी सांभाळताना येणार आहे. येत्या तीन महिन्यात इम्रान खानला बारा अब्ज डॉलरची गरज भासणार आहे. आय एम एफ आणि आमेरीका धार्जीण्य न दाखवण्याच्या इम्रानच्या वल्गना चालू आहेत . सौदी आणि अथवा चीन ने आउट ऑफ द वे जाऊन लार्ज फंडींग पुरवले तर इम्रान सांभाळला जाऊ शकेल नाही तर नाही म्हणूनही आमेरीकेच्या तालावर नाचावे लागेल . आर्थीक आघाडीवर काय होते ते येत्या दोन तीन महिन्यात कळेल.

प्रत्यक्षात संघर्ष शक्यता मर्यादीत राहीली तरी काश्मिरी अतिरेकी कारवाया आणि सिमेवर संघर्ष मुद्दाम वाढवण्याची रणनिती पाकीस्तानकडून होऊन इम्रान - मोदी वादाने मिडीया बातम्यांनी भरु शकतो. यात पाकिस्तान आणि इम्रानला नित्याप्रमाणे पाश्चात्य देश आणि आमेरीकेवर अप्रत्यक्ष दबाव वाढवण्याची आर्थीक फायदे पदरात पाडून घेण्याची संधी मिळेल, तर दुसर्‍या बाजूस असे काही झाले तर मोदींना २०१९च्या निवडणूकात कणखर नेतृत्व हवे म्हणून भारतीय मतदाता पुन्हा मोदीकडे वळणे असे काही होऊ शकतेच.

तुका म्हणे उगी रहावे जे जे होईल ते ते पहावे