स्वदेशी मुस्लीम
* राजीव मल्होत्रांचा युट्यूब व्हीडीओ पूर्ण न बघता चर्चा सहभाग अपेक्षीत नाही.
*** नमनाला घडाभर ***
राजीव मल्होत्रा नावाचे आमेरीका स्थित भारतीय मुळचे भारतवादी लेखक -जे डावे नाहीत- आहेत. ८ ज्युलै २०१८ ला मुंबईत त्यांचे ईंडिया' ज ग्रँंड नॅरेटीव्ह ' या विषयावर व्याख्यान झाले.
ईंडिया' ज ग्रँंड नॅरेटीव्ह चा भाग म्हणून त्यांनी 'स्वदेशी मुस्लीम' नॅरेटीव्ह अशी एक नवी संकल्पना या व्याख्यानातून मांडण्यचा प्रयत्न केला. यात मला समजलेली संकल्पना अशी की, (चुभूदेघे) बहुतांश भारतीय मुस्लीम भारतीय वंशाचेच आहेत. पवित्र ग्रंथाचा ईश्वरी संदेश सर्व देशात सारखाच पाठवला आहे . पवित्र ग्रंथातील चांगल्या गोष्टीचे पालन करण्यासाठी आक्रमकांसोबत भारतात आलेली अरब-पर्शीयन संस्कृतीच्या सांस्कृतिक वसाहतवादाचे भारतीय मुस्लीमांनी मानसिक गुलाम रहाण्याचे कारण नाही.
त्यांचा आक्षेप इस्लाम अथवा अरब-पर्शीयन सांस्कृतिक दळणवळणास नसवा. एक कथित पुरोगामी लोकांकडून भारतीय मुस्लीम मनाने भारतीयच आहेत, स्वदेशीकरणाच्या नावा खाली साम्स्कृतिक वैविध्य नाकारले जाणार नाही का असा आक्षेप येऊ शकतो, पण त्यांच्या प्रयत्नाम्चा उद्देश्य सांस्कृतिक वैविध्य नाकारण्याचा वाटत नाही. केवळ स्वदेशी मुस्लीमांना सांस्क्मृतिक वसाहतवाद नाकारुन त्यांची भारतीयत्वाची ओळख अधिक मनमोकळेपणाने स्विकारण्यात मदत व्हावी असा प्रयत्न वाटतो.
इंडोनेशियातील इस्लाम इतर दळणवळण चालू असतानाही त्याची स्थानिक सांस्क्रुतिक ओळख अधिक घट्ट आहे -किंवा चीन सुद्धा आग्रहाने बाहेरच्या धर्मांनाही स्थानिक ओळखीचा आग्रह धरतो- तसे भारतातही असावे असे काही त्यांना वाटते. काय होते कि पवित्र ग्रंथात काय लिहिले ते समजत नाही म्हणून आधी उर्दू, मग फारसी मग अरेबीक अशा चढत्या भाजणीने केवळ भाषा समजून स्पिरीच्यूअल शंका सोडवून घेतल्या असे न होता संस्कृती आयात होत रहाते आणि आक्रमकांच्या ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि परदेशातून येणार्या फंडींग सपोर्ट मुळे त्याला सांस्कृतिक वसाहतवादाचे स्वरुप शिल्लक रहाते.
धर्म आणि संस्कृतीची गल्लत या विषयावर मी ही मागे मिपावर लिहिले आहे. धर्म आणि संस्कृतीची गल्लत टळून निसर्गतः विकसीत स्थानिक संस्कृतीशी स्वदेशी मुस्लीमांचे अधिक सुलभ मनोमिलन व्हावे . स्थानिक भाषा, स्थानिक संत, स्थानिक नावे यांचा अधिक सहज स्विकार व्हा अशा प्रकारची त्यांची काही अपेक्षा असावी.
*** मुख्य विषय ***
या विषयावरचे त्यांचे पुस्तक प्रसिद्ध व्हायचे आहे असे म्हणतात. ८ ज्युलैच्या ज्या भाषणातून त्यांनी त्यांची संकल्पना मांडली आहे त्याचा व्हिडीओ खाली जोडत आहे. युट्यूब लिंक https://youtu.be/yKbX0SI21lo
* उपरोक्त व्हिडीयोत राजीव मल्होत्रा कदाचित हिंदूत्ववादाशी जवळीक असलेल्या मंचावरुन बोलत असल्यामुळेही पुर्वग्रह होण्याची शक्यता असू शकते . त्यांच्या भाषणावर लक्ष केंद्रीत केल्यास पूर्वग्रहापासून मोकळीक मिळण्यास मदत होऊ शकेल. असे वाटते.
* मी राजीव मल्होत्रांच्या अथवा त्यांच्या मंचाच्या सर्व विचाराम्शी सहमत आहे असा कोणताही अर्थ काढू नये.
(मी मागच्या माझ्या हिंदोस्लाम, हिंदोस्लीम या धाग्यात मांडलेल्या पर्यायात सरळ सरळ सांस्कृतिक दृष्ट्या हिंदू असलेला, हिंदू धर्मांतर्गतचा आधूनिक मुस्लीम पंथ असू शकतो का ? हा विचार आहे तोही अनेक पर्यायातील एक पर्याय आहे ; राजीव मल्होत्रा यांचा पर्याय जरासा वेगळा आहे जो तत्वतः स्वदेशी मुस्लीम संकल्पनेत भारतातील इतर धार्मिक विचारांशी आणि विशेषतः हिंदू धर्माशी केवळ सौहार्द अपेक्षीत आहे, पंथ असणे अपेक्षीत नाही. )
* चर्चा सहभाग केवळ राजीव मल्होत्रांच्या व्हिडीओत मांडलेल्या संकल्पनां पुरता मर्यादीत ठेऊन अनुषंगिकापलिकडे अवांतरे टाळण्यासाठी आभार.
* कुणी चंद्र दाखवत असेल तर चंद्र दाखवणार्याचे बोट वाकडे कसे ? अशा प्रकारचे विचार आणि प्रतिसादही टाळण्यासाठी अनेक आभार.
याद्या
3326
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
या खायला !
ट्रोलबी कोणत्य जुनाट-तेलाने
In reply to या खायला ! by कपिलमुनी
हो
In reply to ट्रोलबी कोणत्य जुनाट-तेलाने by माहितगार
माझ्या मते चुकीची स्ट्रॅटेजी
.....रोग परवडला वैद्य नको
In reply to माझ्या मते चुकीची स्ट्रॅटेजी by साहना