दुहेरी प्रमाणीकरण वापरून आपले गुगल खाते सुरक्षित कसे ठेवावे

Primary tabs

चहाबिस्कीट's picture
चहाबिस्कीट in तंत्रजगत
5 Jul 2018 - 8:11 am
दुहेरी प्रमाणीकरण वापरून आपले गुगल खाते सुरक्षित कसे ठेवावे
                                                                                    
   टीप: लेख प्रिंट करायचा असेल तर इथे क्लिक करा.
           
मी Have I Been Pwned? या वेबसाईटचा सबस्क्राइबर आहे. जगभरात झालेल्या हॅकिंगमध्ये आपली माहिती लीक झाली असेल तर या वेबसाईटवर जाऊन ते चेक करता येते. आज सकाळीच मला त्यांच्या कडून इमेल आला की यात्रा.कॉम वरचा अकाउंट डेटा हॅक झाला असून त्यात 5,033,997 लोकांचे ई-मेल, पासवर्ड, जन्मतारीख, पत्ता ही माहिती लीक झाली आहे. ऍक्चुअल हॅकिंग २०१३ साली झाली असून आत्ता कुठे यात लीक झालेला डेटा पब्लिक झाला आहे असं त्यांचं म्हणणं आहे. 
 
मला HIBP कडून आलेला ई-मेल -  

have i been pwned email

या लेखाचा उद्देश “आपले गुगल अकाउंट सुरक्षित कसे ठेवावे या बद्दल माहिती देणे” हा आहे. कारण इतर वेबसाईटवरचे अकाउंट हॅक झाले तरी सुद्धा आपले मुख्य गुगल अकाउंट सुरक्षित ठेवणे जास्त महत्वाचे आहे. एखाद्या हॅकरला तुमचा पासवर्ड माहिती झाल्यास ते तुमच्या सगळ्या ईमेल डिलीट करू शकतात, तुमच्या नावाने इमेल्स पाठवू शकतात, तुमच्या बँकिंग अकाउंटचे पासवर्ड बदलू शकतात, किंवा तुम्हाला अकाउंट पासवर्ड परत करण्यासाठी खंडणी पण मागू शकतात.

आपले अकाउंट सुरक्षित ठेवण्याचा माझ्या मते सर्वात चांगला उपाय म्हणजे २ step authentication - म्हणजे दुहेरी प्रमाणीकरण. यात तुमचा नेहमीचा पासवर्ड टाकावा लागतोच पण त्याचबरोबर एका अजून वेगळ्या प्रकारे तुम्ही स्वतः लॉगिन करत आहात असं प्रमाणित करावं लागतं.

2fa

आपल्यापैकी बऱ्याच जणांना  नेटबँकिंगसाठी मोबाईल OTP ची कन्सेप्ट माहिती असेल. त्यात आपल्याला SMS मध्ये एक पासवर्ड येतो.  दुहेरी प्रमाणीकरण हे काहीसे तसेच प्रकरण आहे, पण वापरायला अजूनच सोपे आहे. 
 
दुहेरी प्रमाणीकरण करायचे वेगवेगळे मार्ग आहेत. यातला “गुगल प्रॉम्प्ट” हा पर्याय निवडलयास आपल्याला कोणताही OTP टाईप करावा नाही लागत फक्त आपल्या मोबाईलवर  इंटरनेट असले पाहिजे. म्हणजे कुठूनही लॉगिन करताना तुमच्या मोबाईलवर एक स्क्रीन दिसते. त्यात असं विचारलं जातं की अमुक-तमुक ठिकाणाहून कोणीतरी तुमच्या अकाउंट मध्ये लॉगिन करत आहे. ती व्यक्ती तुम्हीच आहात का? आपण “हो” म्हटल्यावर तिथे लॉगिन होते. आपल्याला हवं असल्यास “रिमेम्बर ब्राउझर” चा ऑप्शन टिकमार्क करावा - म्हणजे तुमच्या नेहमीच्या कॉम्प्युटर वर लॉगिन करताना परत परत असा मेसेज येणार नाही. पण कधीही कोणता नवीन कॉप्युटर/मोबाईल  लॉगिन करायला वापरला, तर परत तुम्हाला मोबाईलच्या स्क्रीनवर “तो मीच आहे” चे बटन प्रेस करावे लागते.
 
 जर तुम्हाला मोबाइलवरचे इंटरनेट वापरायचे नसेल तर sms चा ऑप्शन पण घेता येतो. त्यात आपल्याला otp प्रमाणेच sms वर पासवर्ड येतो. 
आपल्या अकाउंटवर दुहेरी प्रमाणीकरण सुरु करण्यासाठी या ऑफिशिअल लिंक वर जा आणि Get Started बटनावर क्लिक करा.  https://www.google.com/landing/2step
 
त्यात लॉगिन केल्यावर आपल्याला दुहेरी प्रमाणीकरणाचे वेगवेगळे प्रकार दिसतात. 

वरचा तक्ता नीट दिसत नसेल तर इथे क्लिक करा
अशा प्रकारे दुहेरी प्रमाणीकरण आपल्या अकाउंट वर सुरु करून आपले गुगल अकाउंट आपण सुरक्षित ठेऊ शकता. गुगल प्रमाणेच फेसबुक वर सुद्धा दुहेरी प्रमाणीकरण उपलब्ध आहे. 
 
(काही चित्रे जालावरून साभार) 
 
 
                                                                               

प्रतिक्रिया

चहाबिस्कीट's picture

5 Jul 2018 - 8:25 am | चहाबिस्कीट

लेखातली चित्रे दिसत नसली तर ही लिंक पहा.

ही सर्व माहिती उपयोगी उत्तम इत्यादि आहेच. पण तुम्ही लवकर नवे गेम प्रकाशित करण्याचंही बघा की राव..

चहाबिस्कीट's picture

5 Jul 2018 - 10:04 am | चहाबिस्कीट

हाहा धन्यवाद! व्हिडीओ रेकॉर्ड झाला आहे पण एडिटिंग च काम बाकी आहे. सध्या कामाच्या गडबडीत वेळच मिळत नाहीये. पण या वीकेंडला सलग बसून काम करणार आहे.

एसएमएस च्या ऐवजी ऑथंटिकेटर ऍप वापरावे, कारण ज्या ठिकाणी मोबाइलची रेंज नसेल किंवा नेटवर्क जॅम असेल त्यावेळी ऍप चा वापर करता येउ शकतो.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- गालावर खळी डोळ्यात धुंदी ओठावर खुले लाली गुलाबाची कधी कुठे कसा तुला सांग भेटू...

एस's picture

9 Jul 2018 - 5:25 am | एस

उपयुक्त माहिती.

बरेच लोक मोबाइल स्क्रीन लॅाक वापरतात. चोरी करणारे तो कसा उघडतात?