मिपावर IME सुविधा चालू झाल्यापासून टाईप करण्यासाठी मी तोच पर्याय ठेवला आहे. पण गेले काही दिवस मला IME टाइपिंग करता येत नाही आहे.
मी मॅकबुक वर फायरफॉक्स वापरतोय. इतर ब्राऊजर वापरून बघितले पण इंग्रजी अक्षरेच राहत आहेत, मराठी मध्ये बदलत नाहीत.
कृपया एक लक्षात घ्या, याच संगणकावर मी गेले कित्येक महिने नीट IME टाईप करू शकत होतो, अलीकडेच हे जाणवले. अजून एक म्हणजे मी 'गूगल इनपुट साधने' वापरून मराठी टाईप करतोय.
दुसरी गोष्ट जाणवली म्हणजे IME असताना भाषा बदलण्यासाठी च्या पर्याया मध्ये सध्याची भाषा दिसत नाही आहे.
तेच जर मी Inscript निवडलं तर ह्या दोन्ही गोष्टी नीट होतात; म्हणजे Inscript टाईप करता येते(जे मला नीट जमत नाही) आणि सध्याची भाषा पण दिसते.
आपणास अशी अडचण आली असल्यास किंवा काही माहिती असल्यास कृपया सांगणे.
(तंत्रजगत मध्ये टाकणार होतो, पण म्हटलं नवीन माहिती नाही आहे त्यामुळे चर्चा मध्ये टाकू. संपादकांनी गरजेनुसार बदल करावेत ही विनंती)
प्रतिक्रिया
30 Jun 2018 - 7:27 am | चौकटराजा
गेले वर्षभर मला गमभन वापरताना "चिविचत्र" अशी काही कॅरेक्टर येत आहेत . तसेच शब्द "एकमेकमिसलतूळून " या प्रमाणे होते . याला उपाय काय ? तसे गुगल वापरले तर ' मॅट ' असा शब्द लिहिण्यासाठी पुन्हा गमभन वर यावे लागते ? काय करावे या दोन्ही समस्यांना ?
2 Jul 2018 - 12:14 pm | लई भारी
बाकीचे सर्वजण मराठीतून टंकण्यासाठी काय वापरतात आणि कुणाला ही अडचण नाही आली का?
2 Jul 2018 - 1:07 pm | चहाबिस्कीट
क्रोमवर Google Input Tools एक्स्टेंशन
मोबाईलवर Google Indic Keyboard ऍप
2 Jul 2018 - 10:02 pm | लई भारी
मोबाईल वर हेच वापरतो. क्रोम वर आपण सांगितलेला पर्याय वापरला.
आता क्रोम विरुद्ध फायरफॉक्स वादात क्रोम च्या बाजूने एक मुद्दा चढ मिळाला. बघू जमतंय का! :)
(फायरफॉक्स साठी जे एक्स्टेंशन आहेत ते वैयक्तिक डेव्हलपर कडून आहेत त्यामुळे वापरले नाहीत)
पण मूळ प्रश्न अनुत्तरितच आहे! असो :)