हजारो बेटांचा देश...... फिनलँड.... भाग ३ सुओमेनलिना (suomenlinna) समुद्री किल्ला

बरखा's picture
बरखा in भटकंती
27 Jun 2018 - 8:23 pm

https://www.misalpav.com/node/42878 भाग १
https://www.misalpav.com/node/42891 भाग २

Killa
( हा फोटो आंतरजालावरुन साभार)

फेरीबोट मधुन जाताना हेलसिंकी बंदराचे दिसणारे दृश्य....

Helsinki

बंदरावर बांधलेल्या तलावात पोहण्याचा आणि सौना बाथ घेण्याचा आनंद घेताना तेथिल लोक.

Tank

बोटीतून जाताना दिसणारी लहान लहान बेट आणि त्या वरील घर.....

H

सुओमेनलिना समुद्री किल्ला एक ऐतिहासिक किल्ला असून १९९१ मधे युनेस्कोच्या जागतिक वारसा यादित ह्याचे नाव समाविष्ट केले गेले आहे. २०१८ मधे हा किल्ला
त्याच्या स्वातंत्र्याची शंभर वर्ष पुर्ण करत आहे. हा किल्ला १७४८ मधे हेलसिंकीच्या किनारपट्टी जवळील बेटांवर स्थापित केला गेला. त्या वेळी फिनलँड हा स्वीडनचाच एक भाग होता. स्वीडन रशिया युद्धामधे हा किल्ला रशियाला मिळाला. त्या नंतर बरीच वर्ष तो रशियाच्या ताब्यात तो होता. त्या नंतर १८५५ मधे फ्रेंच बरोबर झालेल्या युद्धात ह्या किल्ल्यावर करण्यात आलेल्या बॉम्ब हल्ल्यांमधे याचे बरेच नुकसान झाले. त्या नंतर ह्या किल्ल्याची डागडूजी करून हा किल्ला पुन्हा उभा केला गेला. दुसर्‍या महायुद्धाच्या वेळी देखिल या किल्ल्याने नवदल आणि हवाई दल यांना हल्यात बरीच मदत केली.
हा किल्ला हेलसिंकी मधे असून पर्यटन स्थळ म्हणुन आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. लोक ईथे दिवसभराची सहल काढून येतात. या किल्ल्यवर फक्त बोटीद्वारेच जाता येते. हा किल्ला वर्षभर बघण्यासाठी खुला असतो. उन्हाळ्यात संपुर्ण किल्ला बघता येतो तर हिवाळ्यात किल्ल्याचा काही भाग बंद ठेवला जातो. हा किल्ला सात बेटांत विस्तारित आहे. याची उभारणी ही युद्धासाठी करण्यात आली होती. हेलसिंकी बंदरावरून काही वेळाच्या अंतराने फेरी बोट या किल्ल्यावर जाण्यास सुटतात. पंधरा ते वीस मिनिटांत तुम्ही किल्ल्याच्या बंदरावर उतरता. उतरल्यावर समोरच तुम्हाला माहितीपुस्तिका आढळून येतात. फिनिश, स्वीडिश, ईग्रजी अशा भाषांमधे या उपलब्ध आहेत. लहान मुलांकरता वेगळी माहितीपुस्तिका आहे. तीही अशाच तीन भाषांमधे आहे. या पुस्तिकेत किल्ल्याची सर्व माहिती नकाश्यासकट दिलेली आहे. तसेच किल्ला कसा फिरावा या साठी एक निळामार्ग या पुस्तिकेत आखुन दिलेला आहे. (त्याच मार्गाने जायला पाहिजे असे काही नाही. पण दर्शवलेल्या मार्गाने गेल्यास काही बघायचे राहून जाणार नाही. ) तुम्ही गाईडही घेऊ शकता. उन्हाळ्यात बारा ते चौदा भाषांमधे बोलणारे गाईड मिळतात तर हिवाळ्यात केवळ फिनिश,स्वीडिश आणी ईग्रजी बोलणारे गाईड मिळतात. किल्ल्याचा विस्तार बराच असल्याने किल्ला फिरण्यास जवळ जवळ तीन ते चार तास हवेत.
किल्ल्यावर ८०० घरांची वस्ती असून, एक शाळा आणि दवाखाना आहे आणि एक चर्च आहे. प्रवाश्यांसाठी खाण्यासाठी बरीच हॉटेल्स आहेत. ( जे लोक पुर्ण शाकाहारी किंवा केवळ अंडी खाणारी किंवा केवळ चिकन टेस्ट केलेली असतील त्यांनी आपले खाणे आपल्या बरोबर घेउन जाणे सोयीस्कर ठरते, नाहीतर उपाशी रहावे लागते.) किल्ल्यावर बघण्यासाठी सहा संग्रहालय आहेत. पण त्यांच्या उघडण्याच्या वेळा बघुन तिथे जाता येत. काही संग्रहालयांना तिकिट आहे.
फेरी बोट मधुन जाताना दिसणारे हे निळेशार पाणि हिवाळ्या मधे गोठलेले असते. अश्या बर्फाच्या पाण्याला बोट भेदून जाताना बघण्याच्या अनुभव वेगळाच असतो.

Boat

किल्ल्याच्या आत अनेक छोटी छोटी तळी आहेत.

Pond

किल्ल्यामधिल भुयार आणि गोदाम. गोदाम आपल्याला बघता येतात. परंतू भुयारी मार्ग बंद ठेवण्यात आलेला आहे

Bhuyaar

अशी छानशी छोटीशी मोहक रंगांची फुले जगोजागी आढळून येतात.
Fule

किल्ल्यावर घेउन जाणारी एक वाट.....

Vaat

किल्ल्यावरील एक तळे...

Pond

अजुनही आपले अस्तित्व टिकवून धरलेली तोफ....

Canan

समुद्री पक्षी. हे खुप प्रमाणात आहेत आणि आपल्याला त्यांच्या पासून सावध रहाव लागत. कारण आपण काही खात असल्यास हे जमावाने येतात आणि आपल्या हातातील अन्न पटकन ओढून नेतात ( आपल्या कडील माकडांप्रमाणे )
Seagul

हे पिवळ्याफुलांनी नटलेले पठार.... हिवाळ्यात मात्र ही फुल बर्फाची पांढरीशुभ्र चादर ओढून कुंभकर्णासारखी झोपून जातात ती पुढचा उन्हाळा येईपर्यन्त.

Pathar

किल्ल्यावरुन दिसणारे एका बाजुचे दृष्य....
D

येथिल बर्‍याच जणांकडे स्वताच्या बोटी, शिडाची जहाज आहेत. त्यात बसून किल्ल्याच्या बाजुला फिरताना एक जहाज....

Boat

किल्ल्यावर असलेल्या वस्तितील काही घरे.....

H

किल्याच्या पाण्यातिल हा भाग पाण्यात मनमुराद डुंबण्यासाठी राखुन ठेवलेला आहे.

S

दुसर्‍या महायुद्धाच्यावेळी वापरण्यात आलेली पाणबुडी.... ही आता लोकांना बघण्यासाठी खुली करून देण्यात आलेली आहे.

S

किल्ल्यावर खरेदी करण्यासाठी पण काही दुकान आहेत. किल्ला उन्हाळा आणि हिवाळा म्हणजे बर्फ पडलेला असताना दोन्ही वेळेस बघताना वेगळा अनुभव देऊन जातो.

a
किल्ल्यावरील फुले..

1

कडेने फिरण्यासाठी वाट

1
अजुन एक...

1

1

पुढिल भाग - हेलसिंकी सांबा कार्निवल....

प्रतिक्रिया

निशाचर's picture

27 Jun 2018 - 8:44 pm | निशाचर

अरे वा, पुढचा भाग आला पण! किल्ल्याचे फोटो आवडले.

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Jun 2018 - 9:05 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर माहिती आणि फोटो ! तुमच्या लेखमालेतून एक नवीन देश पहायला मिळत आहे. पुढील भाग लवकर टाका.

टर्मीनेटर's picture

27 Jun 2018 - 9:25 pm | टर्मीनेटर

किल्ला आणि पाणबुडी एकाच ठिकाणी बघायला मिळणे म्हणजे दुग्धशर्करा योगच म्हणावा लागेल. नवीन ठिकाणाची चांगली माहिती मिळाली. पुढचा भाग लवकर येउद्या.

संजय पाटिल's picture

28 Jun 2018 - 10:27 am | संजय पाटिल

तीनही भाग वाचले. अप्रतिम असे निसर्ग सौंदर्य लाभलेला देश! स्व:ताच्या बोटीतून फिरणारे लोक बघून जळ्जळ झाली!

माझीही शॅम्पेन's picture

28 Jun 2018 - 3:30 pm | माझीही शॅम्पेन

वाह भन्नाट लेखमाला , फोटो बघून वारल्या गेलो आहे __/\__