आनंदाचं रोपटं
आमच्या घराबाहेर एक कुठलं तरी रोपटं आलंय. नको नको म्हणून आलेलं अगदीच unwanted child म्हणा ना. पण ते झाड. झाड कसलं रोपटं म्हणा ना मला खूप खूप आनंदी वाटतंय. काल अचानक आलेला पाउस सोसाट्याचा वारा त्याने खूप enjoy केलंय. आजचा मळभ-उन्हाचा खेळ ते स्वत: खेळतंय. मला ते रोपटं मनापासून आवडलेय. शेजारी राहायला आलेलं एखादं गोंडस मूल आपल्याला कसं आवडतं ना तसेच ते मला आवडलंय. ते माझं गोड आनंदाचे रोपटं आहे.
आज सकाळी आमच्या वॉचमनच्या मुलीसाठी मी चॉकलेट दिलेय. आज माझा दुपारचा जेवणाचा डबा मी सहकारी मित्रांबरोबर शेयर केलाय. घरी बायकोला फोन करून आजचं जेवण खूप सुंदर झालंय म्हणून सांगितले आहे. घरी जाताना मुद्दाम वाटेवरच्या देवळात जाऊन आलोय. बरोबर असलेले सफरचंद देवळाबाहेरच्या छोट्या मुलीला दिलेय. वाटेवर भेटलेल्या मित्रांबरोबर खूप गप्पा मारल्या आहेत. मुलीसाठी मुद्दाम चित्रकलेचं पुस्तक आणले आहे. तिच्याबरोबर तिच्या गंमतीच्या गोष्टी ऐकतोय. जेवणाची ताटं घेतली आहेत. पाट-पाणी घेतलंय. थोडक्यात आजचा दिवस खूप आनंदात परमोच्च सुखात गेलायं.
आता रात्रीच्या काळोखात ते रोपटं आणिकही आनंदी दिसते आहे. कारण तसलंच एक आनंदी रोपटं आज माझ्या मनातही उमललंय आणि ते आनंदाचं रोपटं सृजनात्मक आनंदमुळे आणखी आनंदी झालंय.
प्रतिक्रिया
10 Jun 2018 - 4:43 pm | manguu@mail.com
छान
निसर्ग महान आहे
10 Jun 2018 - 5:33 pm | सतिश गावडे
ते रोपटं प्रतिकात्मक असावं की पहील्या पावसात कोंब फुटलेले खरोखरचं रोपटं असावं याने लेखनाचा आशय बदलत नाही.
10 Jun 2018 - 7:31 pm | एस
तुमचा लेख हा दोन परिच्छेदांंत संपला याचा मला खूप आनंद झाला. अनुस्वार टाकून टाकून माझ्या कीबोर्डातले अनुस्वार संपत आले होते. ;-)
बादवे, छान मनोगत.
10 Jun 2018 - 8:49 pm | अनन्त्_यात्री
वृक्ष होवो.
10 Jun 2018 - 11:00 pm | शाली
+१
11 Jun 2018 - 12:14 am | कुसुमिता१
आयुष्य आनंदी करणाऱ्या गोष्टी किती छोट्या छोट्या असतात..
12 Jun 2018 - 1:12 pm | Ram ram
तिसरट प्रतिक्रिया देण्यात मिपाकरांचा पयला नंबर हय.
12 Jun 2018 - 1:13 pm | Ram ram
तिरसट आसावं बहुतेक