टर्म पॉलीसी आणि प्रश्न

AKSHAY NAIK's picture
AKSHAY NAIK in काथ्याकूट
31 May 2018 - 12:25 pm
गाभा: 

मिपाकर मंडळींना नमस्कार, हल्ली टीव्ही वर नेहमी एक जाहिरात पहावयास मिळते ती म्हणजे फक्त ७०० रू. प्रति माह भरून १ करोड चा विमा कवर मिळवा. अर्थात या विषयावर आत्ता चर्चा करण्याचे मुख्य कारण म्हणजे माझी पूर्वीची एक पारंपरिक विमा पॉलीसी होती. साधारण २० वर्षे होत येत आहेत या जून मध्ये , जून शेवटी माझी पॉलीसी परिपक्व होत आहे. ज्या वेळी मी पॉलीसी विकत घेतली होती त्या वेळी माझ्यावर विशेष अशी काही जबाबदारी नव्हती, मात्र आता परिस्थिती वेगळी आहे. आता पत्नी व ४ वर्षे वयाची लहान मुलगी यांची जबाबदारी माझ्यावर आहे. अनेकांनी असा सल्ला दिला की, आता पूर्वीच्या पॉलीसीतून मिळणाऱ्या रकमेची FD करून त्याच्या व्याजावर टर्म पॉलीसी विकत घेवून त्याचे हफ्ते भरावे, म्हणजे ते फायद्याचे ठरेल. एकंदरीत पारंपरिक पॉलीसीत मिळणाऱ्या RISK COVER पेक्षा टर्म पॉलीसी मध्ये मिळणारा RISK COVER जास्त असल्यामुळे आता टर्म पॉलीसी विकत घेण्याच्या निर्णयापर्यंत येवून मी पोहचलो आहे. मात्र अशी पॉलीसी घेण्यापूर्वी काही प्रश माझ्या मनात घोंगावत आहेत. जसे की , १) कोणत्या कंपनी ची पॉलीसी विकत घ्यावी ? २) पॉलीसी बाजार सारख्या संकेतस्थळावर अनेक कंपन्याची तुलना करता वार्षिक ९००० ते ३५००० इतका हफ्ता १ करोड ची पॉलीसी घेण्याकरता दाखवत आहे. हि इतकी तफावत कशी ? ३) पॉलीसी online घ्यावी की विमा प्रतिनिधी मार्फत घ्यावी ? या व इतर काही लक्षात घेण्यासारख्या बाबींवर जाणकार मिपाकर मंडळीचे मार्गदर्शन आवश्यक वाटते. आपले या बाबत काही अनुभव असल्यास अवश्य शेअर करावे, धन्यवाद !

प्रतिक्रिया

टवाळ कार्टा's picture

31 May 2018 - 12:39 pm | टवाळ कार्टा

1. पॉलिसी बाजारवर ज्या कंपनीचा क्लेम रेशो 90-95% च्या वर आहे त्या विचारात घ्याव्या
2. या बाबत मला माहिती नाही
3. ऑनलाइन घ्या आणि घरात एका इन्वेलोपमध्ये जर क्लेम करायचा झाला तर जी काही डॉक्युमेंट लागतील त्याची लिस्ट (किंवा झेरॉक्स) आणि कोणाला कॉन्टॅक्ट करायचे त्याची लिस्ट (एकापेक्षा जास्त असलेले चांगले) असे बनवून घरात सगळ्यांना सांगून ठेवावे

अजून काही....

अशी पॉलिसी घ्या ज्यात अपघात विमा समाविष्ट असेल....थोडासा प्रीमियम वाढेल पण सध्याच्या काळात गरजेचा आहे

मेडिकल कव्हर टर्म पॉलिसीमध्ये घेऊ नका....मेडिकल क्लेम केलात तर पॉलिसी laps होते बहुतेक....मेडिकल कव्हरसाठी दुसरा विमा घ्या

आणखी माहिती इथले जाणकार देतीलच

>>अशी पॉलिसी घ्या ज्यात अपघात विमा समाविष्ट असेल....थोडासा प्रीमियम वाढेल पण सध्याच्या काळात गरजेचा आहे
हे चेक करुन घ्या, कदाचीत शेपरेट P.A. पॉलीसी स्वस्त पडेल.

कपिलमुनी's picture

31 May 2018 - 12:57 pm | कपिलमुनी

१) कोणत्या कंपनी ची पॉलीसी विकत घ्यावी ?
>> IRDA च्या साईटवर क्लेम सेटलमेंट रेशो असतत , ९५ % हून अधिक रेशो , कंपनीची मार्केटमधली पत , पॉलिसीचे रिव्ह्यू वाचून कंपनी निवडा .
तुमच्या पॉलिसीचा हप्ता आणि टर्म ( २० -३५ वर्षे) , रायडर ( डिसेबलिटी , अ‍ॅक्सिडेण्ट , क्रिटिकल इलनेस) यांची तुलना करून पॉलिसी निवडावी.

ऑनलाईन घेतल्यावर सुद्धा जे पॉलिसि डोक्युमेण्ट येते ते बारीक अक्षरांच्या नोटसहीत पूर्ण वाचावे ( आळस करू नये ) आणि त्या अटी मान्य नसतील तर १५ दिवसात पॉलिसी परत करता येते.

२) पॉलीसी बाजार सारख्या संकेतस्थळावर अनेक कंपन्याची तुलना करता वार्षिक ९००० ते ३५००० इतका हफ्ता १ करोड ची पॉलीसी घेण्याकरता दाखवत आहे. हि इतकी तफावत कशी ?

>>हप्त्यामधली तफावत असण्यचे कारण सेटलमेंट रेशो , रायडर , कव्हर आणि किती वर्षाची मुदत यावर अवलंबून आहे.
पोलिसी होल्डरचे वय , वजन , आजाराची हिस्तरी, अनुवंशिक आजार , स्मोकिन्ग , दारू व इतर व्यसने , पोलिटिकल एक्स्पोजर , धाडसी खेळामधील सहभाग , नोकरीचे स्वरुप , रहाण्याचे ठिकाण , प्रवासाची फ्रीक्वेन्सी या बाबींवर हप्ता ठरतो.
तुमचे वार्षिक उत्पन्न हे तुम्हि जास्तीत जास्त किति रकमेचा इन्सुरन्स काढू शकता हे ठरवतो.

३) पॉलीसी online घ्यावी की विमा प्रतिनिधी मार्फत घ्यावी ?
>>online घ्यावी

ईतर : एकच १ कोटीची पॉलिसी घेण्यापेक्षा ५० लाखाच्या दोन घ्याव्यात . हे थोडे महाग पडते पण क्लेम रिजेक्शनची रिस्क विभागली जाते.

घेणारा कैलासवासी झाल्यास, लोन (असल्यास) फिटून राहिलेल्या पैशात किंवा त्याच्या व्याजात मुलांच्या शिक्षणाचा खर्च , रोजचा महिन्याचा खर्च पुढील २० वर्षे ( महागाई इंडेक्स धरून ) भागला पाहिजे एवढे टर्म कव्हर हवे.

मार्मिक गोडसे's picture

31 May 2018 - 1:24 pm | मार्मिक गोडसे

तुमचे वार्षिक उत्पन्न हे तुम्हि जास्तीत जास्त किति रकमेचा इन्सुरन्स काढू शकता हे ठरवतो.
हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा.
वार्षिक १५ लाख उत्पन्न असल्यास जास्तीत जास्त कितीची टर्म पॉलिसी काढता येते?

तुमच्या प्रश्नांची उत्तरे वर इतरांनी दिलीच आहेत. अजुन एक मुद्दा असा की बर्याच वेळा लोक एकच मोठ्या रकमेची पॉलीसी काढण्या पेक्षा दोन किंवा तीन छोट्या पॉलीसीज काढतात, वेगवेगळ्या मुदतीच्या. म्हणजे तुमची लायबेलीटी जशी कमी होत जाईल तसा तुमचा विमा पण कमी होईल.
उ.दा. एखादा ३० वर्षाचा माणुस ३० वर्षासाठी १ करोड ची पॉलीसी काढण्या पेक्षा, ५० लाखांची ३० वर्षांसाठी व २५ लाखाच्या दोन एक १० वर्षांसाठी व एक २० वर्षांसाठी अशा पॉलीसीज काढु शकतो. याचा फायदा म्हणजे प्रीमीयम तुलनेने कमी बसेल व उद्या आर्थीक गणीते बदलली किंवा लायबेलीटीज कमी झाल्या व विम्याची गरज कमी झाली तर एखादी पॉलीसी मुदती पुर्वी बंद करू शकता.

मिपाकर मंडळींनी दिलेल्या सूचना व मार्गदर्शन यामुळे माझ्या मनातील शंकांचे निरसन झाले. आपल्या मार्गदर्शनामुळे निश्चितच मला निर्णय घेण्यात मदत होईल यात शंका नाही. आपला प्रतिसाद व मार्गदर्शनाबद्दल खूप खूप धन्यवाद !

अत्रन्गि पाउस's picture

1 Jun 2018 - 9:00 am | अत्रन्गि पाउस

LIC चा जास्तीत जास्त रकमेची जास्तीत जास्त कालावधी ची टर्म पोलिसी घ्या. सर्व चचण्या वगैरे निट करून घ्या आणि येईल तो प्रीमियम न चुकता भरा.

स्वस्त policy च्या मागे लागू नका. खाजगी टर्म प्लान तर अजिबात नको

आणि टर्म प्लान कडे कसलीही गुंतवणूक म्हणून बघू नका. गुंतवणूक आणि परतावा वगैरे साठी इतर मार्ग आहेत.

विशुद्ध निर्भेळ टर्म प्लान ला पर्याय नाही.

टवाळ कार्टा's picture

1 Jun 2018 - 9:26 am | टवाळ कार्टा

LIC सगळ्यात महाग आहे....ICICI आणि HDFC च्या 1 करोडच्या टर्म प्लॅनच्या प्रीमियममध्ये LIC ची 25 लाखाची टर्म पॉलिसी मिळते बहुतेक

अत्रन्गि पाउस's picture

1 Jun 2018 - 12:00 pm | अत्रन्गि पाउस

जास्त विश्वासार्ह आहे ... पारदर्शक आहे आणि त्यांचा इतिहास सुद्धा तसाच आश्वासक आहे

इथे फक्त महाग आणि स्वस्त हा विचार उपयोगी नाही ... विशेषत: टर्म प्लान मध्ये तर नाहीच. यदा कदाचित वेळ पडली तर वारसांना आश्वासित रक्कम कमीत कमी त्रासात, पूर्णपणे मिळावी हा एकच उद्देश.

खाजगी इन्शुरन्स कंपन्यांचा क्लेम संपूर्ण सेट्ल होऊच द्यायचा नाही (देय रक्कम जितकी कमी करता येईल तितकी करायचीच) असा उद्देश असतो, हे मी स्वत: त्यांच्यासाठी काम करतांना बघितल आहे. जास्तीत जास्त भरमसाठ नफा ह्या व्यतिरिक्त त्यांचा काहीहि दुसरा उद्धेश नाही (आणि तो असो बापडा).

सुरक्षितता, परतावा आणि त्याची द्यावी लागणारी किंमत ह्यात, ह्या बाबतीत मी फक्त सुरक्षितता ह्या गोष्टीला महत्व देईन.

टवाळ कार्टा's picture

1 Jun 2018 - 12:04 pm | टवाळ कार्टा

टर्म इन्शुरन्समध्ये सेटलमेंट किंमत कमी करतात? कोणत्या कारणांसाठी?