सिंगल डोअर फ्रिज फ्रॉस्ट फ्री कसा कराल?

Primary tabs

उपयोजक's picture
उपयोजक in तंत्रजगत
6 May 2018 - 3:45 pm

तुमचा सिंगल डोअर फ्रिज फ्रॉस्ट फ्री कसा करायचा ? डबल डोअर सारखा!

1) सिंगल डोअर फ्रिज ला वर एक फ्रीझर बॉक्स किंवा बर्फाचा कप्पा/बॉक्स असतो आणि त्याला एक साधे टेकणारे दार असते.
फ्रिज च्या थंड करणाऱ्या कॉपर कॉइल्स त्या फ्रीझर बॉक्स भवती फिक्स केलेल्या असतात त्या सगळ्या तो बॉक्स आणि अख्खं फ्रिज थंड करत असतो.

2) फ्रीझर मध्ये आणि कॉइल्स चे तापमान उणे शून्य ते उणे 5,6 असते.फ्रिज जेव्हा दरवाजा बंद असतो तेव्हा सगळा फ्रिज 4 डिग्री तापमान येऊन थांबतो.

3) फ्रिज मधील सर्व वस्तू त्यांच्यातील पाणी/आर्द्रता बाहेर फेकत असतात म्हणूनच त्या शुष्क होत जातात (आपण जर कागद आणि प्लास्टिक ची पिशवी त्यांना गुंडाळली तरच हे थांबते)

4) ही वाफ,पाणी सर्व फ्रिज सगळी फ्रीझर बॉक्स आणि त्या बाहेरील कॉइल्स ना चिकटून त्याचा बर्फाचा डोंगर होतो.

5)त्या मुळे फ्रीझर मधील सर्व वस्तुंना एक उग्र वास येऊ लागतो कितीही झाकून ठेवल्या तरी ( प्लास्टिक किंवा हवाबंद डब्यात कमी येतो)

6) आता जर हे टाळायचे असेल तर एक करा!
फ्रीझर बॉक्स चा पुढचा दरवाजा काढून ठेवा आणि अल्युमिनियम ची फॉइल/चांदी चा रोल मिळतो तो मापात कापून त्या फ्रीझर बॉक्स च्या फ्रंट साइड ला फिट करा -जरा जास्त कापून दुमडून ठेवा.तसेच सगळ्या कॉइल्स ना पण फॉइल ने झाकून ठेवा.अल्युमिनियम हे गुड कंडक्टर आहे उष्णतेचे त्या मुळे फ्रिज वर काहीही परिणाम होणार नाहीत उलट बर्फ नसल्या मुळे कार्यक्षमता वाढेल आणि वीज कमी खर्च होईल बर्फ लवकर होईल.

7) फ्रीझर मधील वस्तू ठेवणे/काढणे पण सोपे फॉइल अलगद उघडून आणि परत पॅक करून!

8) कॉईल वरील फॉइल काढून बर्फ झटकून टाकता येईल म्हणून ते पण सोपे झाले.

9) कमी खर्चात सिंगल डोअर फ्रिज मधे डबल डोअरचे आणि फ्रॉस्ट फ्री चे फायदे मिळतील!

10) फ्रीझर बॉक्स वरील तो दरवाजा शो चा असतो दुसरे काही काम नसते त्याला म्हणून काढून ठेवलात तरी चालेल!

11) माझ्या जुन्या गोदरेज 165 वर प्रयोग केला होता फॉइल लावून आणि सक्सेसफुल झाला होता 2,3 वर्षे.

कुठलाही सिंगल डोअर च्या फ्रीझर बॉक्स समोरून बॉक्स च्या दरवाज्या च्या आतील फ्रेम/ बॉडी ला फॉइल लावून हवा बंद केला फॉइल दुमडून वगैरे.
अगोदर फ्रिज पुरा डिफ्रॉस्ट केला ,वाळवला ,आतून बाहेरून अजिबात बर्फ आत मध्ये जमत नव्हते दोन वर्षे
बाहेरील कॉईल ला पण फॉइल चिकटवणे आता सुचले आहे आणि ते पण वर्क करेल बर्फ जरी जमला तरी जेव्हा फॉइल कॉईल पासून सोडवायला जाईन तेव्हा (म्हणजे तेथे बर्फ जमेल पण तो कॉईल ला घट्ट चिकटून नाही बसणार फॉइल वर जमा होईल आणि फॉइल स्मूथ असल्या मुळे हाताने पण झटकून टाकता येईल याची खात्री आहे --अनुभवा मुळे!

लेखक : श्री अजित गद्रे (लेखक मिपावर नाहीत.त्यामुळे त्यांच्या परवानगी हा लेख इथे देतो आहे.)

प्रतिक्रिया

मंदार कात्रे's picture

6 May 2018 - 5:13 pm | मंदार कात्रे

धन्यवाद

कंजूस's picture

6 May 2018 - 5:57 pm | कंजूस

नवीन प्रयोग वाटतोय.
ते डिफ्रॅास्ट बटण एक दोन दिवसांनी वापरतो. बर्फ पडून जातो.

मार्मिक गोडसे's picture

6 May 2018 - 6:27 pm | मार्मिक गोडसे

किचकट प्रकार आहे गृहिणींसाठी, त्यापेक्षा defrost बटण प्रेस करणे सोपे आहे.

उपयोजक's picture

7 May 2018 - 12:30 am | उपयोजक

त्याने नीट होत नाही ,माझ्या पद्धतीत फ्रॉस्ट जमत नाही /किंवा थोडा जमतो जो आत ठेवला पदार्थ बाहेर टाकतो
दुसरे असे एक फ्रिजर मध्ये ठेवलेलं वस्तुंना एक उग्र वास येतो तो येत नाही
बटन दाबून पूर्ण होत नाही /पूर्ण बर्फ सुटत नाही
खालचा ट्रे भरून जातो ओव्हर फ्लो होतो जर बाहेर ड्रेन होण्याची व्यवस्था नसेल तर
अर्थात फ्रीझर मध्ये नसला तरी बाहेर जमा होतोच तो काढायला बटन दाबूनच होईल.
इतर फायदे की फ्रीझर मधील वस्तू बर्फ़ा मुळे बाहेर काढणे कठीण असते ते होत नाही कारण आत मध्ये बर्फ च जमत नाही.
- मूळ लेखकाकडून आलेले उत्तर

मार्मिक गोडसे's picture

7 May 2018 - 7:57 am | मार्मिक गोडसे

फ्रिझर मध्ये corrugated plastic sheet ठेवा , त्यावर बर्फ जमा होत नसल्यामुळे वस्तू बाहेर काढण्यास सोपे जाते.
वास येऊ नये म्हणून फ्रिज मध्ये पावाचा तुकडा ठेवा.

असलं काही होत नाही. बटनाने काम व्यवस्थित होते. पाणी बाहेर जाऊन मागच्या कम्प्रेसरच्या वर ठेवलेल्या प्लास्टिक डब्यात जमते. तो डबाही साफ करायचा असतोच अधूनमधून.
फ्रिजमध्ये वास आणणारे जे पदार्थ आहेत ते योग्य रीतीने ठेवणे आलेच. वासाचा आणि बर्फाचा काही संबंध नसतो. दुध सांडूनही वास येतो. दुधाच्या पिशव्यांनाही बाहेरून दुध लागलेले असते ते नसावे.

मार्मिक गोडसे's picture

11 May 2018 - 9:20 am | मार्मिक गोडसे

असलं काही होत नाही. बटनाने काम व्यवस्थित होते.
अगदी बरोबर, परंतू येथे फॉईल चा द्राविडी प्राणायमावर जास्त जोर दिसल्यामुळे मी कॉरुगटेड प्लास्टिक शीट सुचवली ,कारण त्या शिटच्या पोकळीत बर्फ तयार होत असल्याने शिटला वस्तू चिकटत नाही .
वासा करता पावाच्या तुकड्याचा मर्यादित उपयोग होतो .

6 May 2018 - 6:47 pm | उपयोजक

वरील जुगडा मुळे फ्रॉस्ट कमी होत नाही फ्रीझर बॉक्स ऐवजी दुसरी कडे साठतो म्हणून फ्रॉस्ट कमी करण्यासाठी

फ्रॉस्ट कमी होण्यासाठी
1)सगळ्या भाज्या कापडात गुंडाळून प्लास्टिक बॅग मध्ये बंद करून ठेवा
2)सगळे द्रव पदार्थ चांगले झाकून ठेवा घट्ट झाकण लावून उघडे अजिबात ठेऊ नका

मार्मिक गोडसे's picture

6 May 2018 - 8:57 pm | मार्मिक गोडसे

फक्त भाज्या व द्रव पदार्थांमुळेच फ्रिजमध्ये फ्रॉस्ट जमतो असं नाही, हवेत आर्द्रता जास्त असल्यास फ्रॉस्ट जमण्याचे प्रमाण अधिक असते. दमट हवेच्या ठिकाणी त्यामुळेच फ्रिज मध्ये फ्रॉस्ट अधिक जमते. उन्हाळा व पावसाळ्यात हिवाळ्यापेक्षा फ्रॉस्ट चे प्रमाण अधिक असते.

एस's picture

6 May 2018 - 11:17 pm | एस

चांगला उपाय आहे.

श्वेता२४'s picture

7 May 2018 - 3:48 pm | श्वेता२४

धन्यवाद. प्रयोग करुन बघते

अक्षय कापडी's picture

7 May 2018 - 6:04 pm | अक्षय कापडी

काहीतरीच उगीच डोक्याला आणी फ्रिजला ताप काय त्रास होतो त्या बर्फाचा काहीतरी बिनकामाच ण्यान उगीच आचकट विचकट

मार्मिक गोडसे's picture

7 May 2018 - 6:33 pm | मार्मिक गोडसे

हो, माठाला ओले कापड उगाच गुंडाळत नाही, त्याने माठ थंड राहतो.

उगा काहितरीच's picture

9 May 2018 - 10:23 pm | उगा काहितरीच

फ्रीझर बॉक्स चा पुढचा दरवाजा काढून ठेवा आणि अल्युमिनियम ची फॉइल/चांदी चा रोल मिळतो तो मापात कापून त्या फ्रीझर बॉक्स च्या फ्रंट साइड ला फिट करा -जरा जास्त कापून दुमडून ठेवा.

याचा फोटो/व्हिडीओ मिळाला तर नेमकं कळेल .

तसेच सगळ्या कॉइल्स ना पण फॉइल ने झाकून ठेवा.

हे काही सापडला नाही . गोदरेज आणि LG च्या फ्रिज मधे.

फ्रीझर बॉक्स वरील तो दरवाजा शो चा असतो दुसरे काही काम नसते त्याला म्हणून काढून ठेवलात तरी चालेल!

मग या दरवाज्यालाच आतून फॉइल लावून नाही का चालणार ?

स्नेहांकिता's picture

10 May 2018 - 1:11 pm | स्नेहांकिता

फ्रीझर डोअर काढून फॉईल लावल्यावर आतील वस्तू घेताना ठेवताना ती फॉईल घडी पडून चुरमडून जाईल ना.
आणि कॉईल्स इतक्या अवघड जागी असतात की तिथे हातही पोष्ट नाही. मग त्यांना फॉईल कशी बॉ गुंडाळायची ?

स्नेहांकिता's picture

10 May 2018 - 1:11 pm | स्नेहांकिता

हातही पोचत नाही , असे वाचावे.

आगा आई ग ! माझ्या ज्वलंत विषयाला च हात घातलाय .
आमच्या कडे फ्रीज संस्कृती कमी असल्यामुळे, आमचा डबल डोअर चा फ्रीज खूप लाईट खायचा म्हणून पूर्वी आम्ही त्याचा उपयोग मुलांचे वह्या पुस्तक ठेवण्या साठी केला व नंतर इकून टाकला . त्या नंतर 10 वर्षा पूर्वी माझ्या बायकोच्या चुलत्याने ने सत्यनारायण पूजेत आम्हाला गोदरेज सिंगल डोअर फ्रीज गिफ्ट दिला त्यामुळे बायकोला त्या फ्रीज चे खूपच कौतुक पण डिफ्रॉस्ट चे बटन दाबायला विसरते . मी तेंव्हा पासून आज पर्यंत मला त्यातला बर्फ खरडून काढायचा लई वैताग आला आहे , एका हप्त्यात दोन चार किलो चा गोळा जमतो . एक दिवस चाकूने खरडताना फ्रीजर च्या बॉक्स मध्ये कुठे तरी पंक्चर झाले व पुन्हा माझ्या डबल डोअर चा घेण्याच्या आशा पल्लवित झाल्या होत्या पण वडिलांनी आणलेल्या मकेनिक ने एम सील लावून गॅस भरून परत चालू करून दिला .
आता वाट बघतोय तो फ्रीज कायमचा खराब होण्याची .

सोमनाथ खांदवे's picture

10 May 2018 - 5:14 pm | सोमनाथ खांदवे

खरच लै वैतागलोय ,प्रतिक्रिया चुकून तीनदा टाकली गेली .

चौकटराजा's picture

10 May 2018 - 7:29 pm | चौकटराजा

मग आता एका प्रतिसादासाठी एक दरवाजा या हिशेबाने तीन दरवाजाचा फ्रीज विकत घ्या ! |

१.५ शहाणा's picture

10 May 2018 - 10:53 pm | १.५ शहाणा

साधारण ६५०-७०० ला मिळेल किरकोळ वायरिग चा खर्च १०० रु येइल त्यात एक दिवसा आड वेळ सेट करून फ्रीज ठराविक वेळे करिता बंद करता येईल व कधीच डी फ्रॉस्ट करावा लागणार नाही

चौकटराजा's picture

11 May 2018 - 9:20 am | चौकटराजा

तुम्ही फ्रीज च्या धाग्यात लिहिलेला हा ७०० मधे मिळणारा कोणता ब्रॅन्ड टायमर आहे ? मी हा पन्ख्याना बसवू शकेन का ? रात्री ११ ते सकाळी ५ पर्यन्त ८ वेळा तरी उघडझाप करता आली पाहिजे .

१.५ शहाणा's picture

16 May 2018 - 8:13 am | १.५ शहाणा

टायमर frontier चा मिळतो on- off 8 ते २० पर्यत प्रोग्रामिंग करता येते .

कॉईलला शक्य असेल तरच फॉईल लावा ! पण फ्रीझर डोअर च्या जागी जरूर लावा आतील बर्फाचे डोंगर होण्याचे थांबेल
हो ती फॉईल जरी उघडली तरी खराब होत नाही परत परत ती लावता येते

दरवाजा न काढता जर फॉईल लावता आली तर चांगलेच
पण त्या फॉईल ला दरवाजा बसताना ढकलतो त्या मुळे ती फाटणार नाही एव्हढा अलौन्स ठेवा

फ्रीझर बॉक्सची फॉईल घट्ट बसणे जरुरी चे आहे त्या मुळे दरवाजाला बसवून नाही चालणार
मॉइश्चर आत जाईल

कंजूस's picture

14 May 2018 - 1:40 pm | कंजूस

एकूण खटपट आवडली.