तुमचा सिंगल डोअर फ्रिज फ्रॉस्ट फ्री कसा करायचा ? डबल डोअर सारखा!
1) सिंगल डोअर फ्रिज ला वर एक फ्रीझर बॉक्स किंवा बर्फाचा कप्पा/बॉक्स असतो आणि त्याला एक साधे टेकणारे दार असते.
फ्रिज च्या थंड करणाऱ्या कॉपर कॉइल्स त्या फ्रीझर बॉक्स भवती फिक्स केलेल्या असतात त्या सगळ्या तो बॉक्स आणि अख्खं फ्रिज थंड करत असतो.
2) फ्रीझर मध्ये आणि कॉइल्स चे तापमान उणे शून्य ते उणे 5,6 असते.फ्रिज जेव्हा दरवाजा बंद असतो तेव्हा सगळा फ्रिज 4 डिग्री तापमान येऊन थांबतो.
3) फ्रिज मधील सर्व वस्तू त्यांच्यातील पाणी/आर्द्रता बाहेर फेकत असतात म्हणूनच त्या शुष्क होत जातात (आपण जर कागद आणि प्लास्टिक ची पिशवी त्यांना गुंडाळली तरच हे थांबते)
4) ही वाफ,पाणी सर्व फ्रिज सगळी फ्रीझर बॉक्स आणि त्या बाहेरील कॉइल्स ना चिकटून त्याचा बर्फाचा डोंगर होतो.
5)त्या मुळे फ्रीझर मधील सर्व वस्तुंना एक उग्र वास येऊ लागतो कितीही झाकून ठेवल्या तरी ( प्लास्टिक किंवा हवाबंद डब्यात कमी येतो)
6) आता जर हे टाळायचे असेल तर एक करा!
फ्रीझर बॉक्स चा पुढचा दरवाजा काढून ठेवा आणि अल्युमिनियम ची फॉइल/चांदी चा रोल मिळतो तो मापात कापून त्या फ्रीझर बॉक्स च्या फ्रंट साइड ला फिट करा -जरा जास्त कापून दुमडून ठेवा.तसेच सगळ्या कॉइल्स ना पण फॉइल ने झाकून ठेवा.अल्युमिनियम हे गुड कंडक्टर आहे उष्णतेचे त्या मुळे फ्रिज वर काहीही परिणाम होणार नाहीत उलट बर्फ नसल्या मुळे कार्यक्षमता वाढेल आणि वीज कमी खर्च होईल बर्फ लवकर होईल.
7) फ्रीझर मधील वस्तू ठेवणे/काढणे पण सोपे फॉइल अलगद उघडून आणि परत पॅक करून!
8) कॉईल वरील फॉइल काढून बर्फ झटकून टाकता येईल म्हणून ते पण सोपे झाले.
9) कमी खर्चात सिंगल डोअर फ्रिज मधे डबल डोअरचे आणि फ्रॉस्ट फ्री चे फायदे मिळतील!
10) फ्रीझर बॉक्स वरील तो दरवाजा शो चा असतो दुसरे काही काम नसते त्याला म्हणून काढून ठेवलात तरी चालेल!
11) माझ्या जुन्या गोदरेज 165 वर प्रयोग केला होता फॉइल लावून आणि सक्सेसफुल झाला होता 2,3 वर्षे.
कुठलाही सिंगल डोअर च्या फ्रीझर बॉक्स समोरून बॉक्स च्या दरवाज्या च्या आतील फ्रेम/ बॉडी ला फॉइल लावून हवा बंद केला फॉइल दुमडून वगैरे.
अगोदर फ्रिज पुरा डिफ्रॉस्ट केला ,वाळवला ,आतून बाहेरून अजिबात बर्फ आत मध्ये जमत नव्हते दोन वर्षे
बाहेरील कॉईल ला पण फॉइल चिकटवणे आता सुचले आहे आणि ते पण वर्क करेल बर्फ जरी जमला तरी जेव्हा फॉइल कॉईल पासून सोडवायला जाईन तेव्हा (म्हणजे तेथे बर्फ जमेल पण तो कॉईल ला घट्ट चिकटून नाही बसणार फॉइल वर जमा होईल आणि फॉइल स्मूथ असल्या मुळे हाताने पण झटकून टाकता येईल याची खात्री आहे --अनुभवा मुळे!
लेखक : श्री अजित गद्रे (लेखक मिपावर नाहीत.त्यामुळे त्यांच्या परवानगी हा लेख इथे देतो आहे.)
वाचने
11902
प्रतिक्रिया
27
मिसळपाव
प्रतिक्रिया
धन्यवाद
नवीन प्रयोग वाटतोय.
किचकट प्रकार आहे गृहिणींसाठी,
त्याने नीट होत नाही.
In reply to किचकट प्रकार आहे गृहिणींसाठी, by मार्मिक गोडसे
फ्रिझर मध्ये corrugated
In reply to त्याने नीट होत नाही. by उपयोजक
असलं काही होत नाही. बटनाने
In reply to त्याने नीट होत नाही. by उपयोजक
असलं काही होत नाही. बटनाने
In reply to असलं काही होत नाही. बटनाने by कंजूस
असलं काही होत नाही. बटनाने
In reply to असलं काही होत नाही. बटनाने by कंजूस
वरील जुगडा मुळे
फक्त भाज्या व द्रव
चांगला उपाय आहे.
उपयुक्त माहिती
काहीतरीच उगीच डोक्याला आणी
हो, माठाला ओले कापड उगाच
फ्रीझर बॉक्स चा पुढचा दरवाजा
फ्रीझर डोअर काढून फॉईल
हातही पोचत नाही , असे वाचावे.
In reply to फ्रीझर डोअर काढून फॉईल by सस्नेह
सत्यनारायण पूजे ला भेटलेला सिंगल डोअर फ्रिज .
सत्यनारायण पूजे ला भेटलेला सिंगल डोअर फ्रिज .
सत्यनारायण पूजे ला भेटलेला सिंगल डोअर फ्रिज .
खरच लै वैतागलोय ,प्रतिक्रिया
मग आता ..
In reply to खरच लै वैतागलोय ,प्रतिक्रिया by सोमनाथ खांदवे
एक टायमर फ्रीज ला जोडावा
माहिती हवी .
In reply to एक टायमर फ्रीज ला जोडावा by १.५ शहाणा
टायमर
In reply to माहिती हवी . by चौकटराजा
गद्रेकाकां कडून आलेले उत्तर
एकूण खटपट आवडली.