आजचं वास्तव

गणेश.१०'s picture
गणेश.१० in काथ्याकूट
25 Feb 2018 - 4:27 pm
गाभा: 

We now live in a nation where doctors destroy health, lawyers destroy justice, universities destroy knowledge, governments destroy freedom, the press destroys information, religion destroys morals, and our banks destroy the economy.
-Chris Hedges

थोडी अतिशयोक्ती सोडली तर आजचं वास्तव याहून खूप काही वेगळं आहे असं म्हणता येणार नाही. मानवजातीची दिशा भरकटली आहे का? चांगली माणसे उरलीच नाहीत असं मला म्हणायचं नाही पण एकूणच व्यक्ती आणि संस्थांवरील विश्वास हळू-हळू (की वेगाने?) कमी होत/संपत चाललाय?

प्रतिक्रिया

-Chris Hedgesच्या वर नमूद केलेल्या दोन संकल्पनान्व्यातिरिक्त १००% सहमत!!

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

26 Feb 2018 - 12:20 am | माईसाहेब कुरसूंदीकर

खूपच मोघम लिहिलय रे त्याने गणेशा. आताच त्याची विकिपिडिआवर माहिती बघीतली.https://en.wikipedia.org/wiki/Chris_Hedges
समाजवादी विचारांचा थोड्या डाव्या चळवळींतला वाटतो क्रिस. अमेरिकेत अशा विचारांच्या लोकांची प्रचंड हेटाळणी केली जाते असे वाचले आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Feb 2018 - 1:04 am | डॉ सुहास म्हात्रे

हे एक सरसकट व अतिशयोक्तीपूर्ण विधान आहे. प्रचलित व्यवस्थेविरुद्ध लोकांना भडकवण्यासाठी अश्या प्रकारची चलाख विधाने केली जातात.

वादविवादासाठी ते खरे धरले तरी, वास्तवात आणता येईल अशी इतर अशी कोणती आदर्श व्यवस्था लेखकाला माहीत आहे का ? लोकशाहीचे सर्व गुणदोष जमेस धरून, आजच्या घडीला वास्तवात असू शकणार्‍या सगळ्या प्रचलित व्यवस्थांत, तीच सर्वोत्तम आहे.

स्वतः सत्तेवर नसल्यास, इतर कोणताही वास्तविक पर्याय न देता, प्रस्थापित व्यवस्थेवर टोकाची टीका करणे हे डाव्यांची कुप्रसिद्ध रणनीति आहे. तसे करताना, "कम्युनिझमच्या गेल्या एक शतकाच्या इतिहासात... स्वातंत्र्य, समता व बंधुभाव असलेली राजवट त्यांना एकाही देशात स्थापन करता आलेली नाही... हे ते सोईस्करपणे विसरतात. किंबहुना, प्रचंड नरसंहार करून त्यांनी मिळवलेल्या आणि अजून पोलादी पकडीतील ठेवलेल्या रशिया व चीन या देशांत कम्युनिझम जाहिरातीपुरता (पक्षी : औषधापुरता) उरला आहे आणि प्रत्यक्षात "मूठभर लोकांच्या हातात असलेली भांडवलवादी सरंजामशाही" आस्तित्वात आहे. त्या देशांत वरचे सगळे दुर्गुण तर आहेतच पण जोडीला अशी राजकिय दडपशाहीसुद्धा आहे जी दर पाच वर्षांनी निवडणूकीने बदलण्याची सवलत तेथिल सर्वसामान्य जनतेला नाही.

थोडा नकारात्मक विचार आहे हे मान्य. पण आपण याकडे व्यवस्थेचा प्रश्न म्हणून न पाहता एकंदरीतच ढासळलेली नीतिमत्ता, चांगल्या चारित्र्याचा, नेतृत्वाचा अभाव आणि त्याबद्दलची धूसर शक्यताही असं पाहू शकतो. स्वातंत्र्याच्या नंतर निदान आपल्या पिढीत तरी आदराने पाहता येईल व विश्वास वाटेल असं नेतृत्व दुर्देवाने आपल्याला लाभलं नाही आणि तसं होण्याची सूतराम शक्यता नाही. त्याचबरोबर मला असाही मुद्दा मांडावासा वाटतो की व्यवस्था बळकट, प्रगत करण्यासाठी आपल्याकडे काहीच केले जात नाही. मोघम वाटेल कदाचित, पण चर्चा, विचारमंथन व्हायला हवं.

गणेश.१०'s picture

26 Feb 2018 - 2:47 am | गणेश.१०

व्यवस्थेबद्दल मला असं म्हणायचं आहे की आपण समाजवाद व भांडवलशाही या भांडणात न पडता सध्याची व्यवस्था अधिकाधिक प्रगत कशी करता येईल व कल्याणकारी राज्य या संकल्पनेजवळ कसं पोहोचता येईल यावर उहापोह करायला हवा. क्रमशः

अर्धवटराव's picture

26 Feb 2018 - 9:10 am | अर्धवटराव

जटील समस्येवर मूलगामी, क्रांतीकारी उपाय निघतो. त्याचे परिणाम स्थिरस्थावर झाले कि त्यातुन इन्स्टीट्युट तयार होते. मग ति इंस्टीट्युट/व्यवस्था स्वतःची म्हणुन एक कायनेटीक एनर्जी तयार करते आणि समस्या व उपाय, दोघांच्याही स्टेक होल्डर्सना आपल्यामागे फरफटत नेते. त्यातनं नवीन समस्या निर्माण होतात व परत एखादी क्रांती होते. असं चक्र सतत सुरु असतं.

मानजातीची काहि एक प्रगतीशील दिशा होती व ति आता भरकटली आहे असं काहि वाटत नाहि. मागच्या काहि शतकात मानवजातीला मिळणारं इन्पुट एक्स्पोनेन्शिअली वाढत गेल्यामुळे त्याचं करायचं काय हे कळेनासं झालय, म्हणुन थोडी कन्फ्युजनची अवस्था आहे.

स्वधर्म's picture

26 Feb 2018 - 1:03 pm | स्वधर्म

गणेश, १०० वर्षांपूर्वीच्या सरंजामशाही राजवटीत सर्वसामान्य भारतीय जसे रहात होते, त्यापेक्षा अापण सध्या नक्कीच चांगलं राहतो अाहोत. अतिशय गरीब व सामाजिक दृष्ट्या मागास प्रवर्गातली माणसंही गेल्या ५० वर्षात खूप यशस्वी जीवन जगताना अाढळत अाहेत. ह्यूमन इंडेक्स वगैरे वाढत अाहेत. पर्याय जास्त झाल्यामुळे मानसिक गोंधळाची अवस्था अाली असली, तरी एकूण प्रगतीकडेच वाटचाल अाहे, हे नक्की.

मराठी कथालेखक's picture

26 Feb 2018 - 12:50 pm | मराठी कथालेखक

समस्या आहेत हे मान्यच. पण अगदीच नकारात्मक परिस्थिती नाहीये. बहुसंख्य लोक पोटभर जेवत आहेत. काही लोक प्रगती करत आहेत. कुणी येईल मारेल, लुबाडेल इतकं काही अराजक नाहीये.
सुधारणा होतील. अतिशय सक्षम अशी न्याययंत्रणा आणि उच्च गुणवत्ता असलेली शिक्षणव्यवस्था हे अनेक समस्यांवरचे दीर्घकालीन उत्तर ठरु शकेल. त्यामुळे शिक्षणाची गुणवत्ता सुधारत राहणे हे सर्वात महत्वाचे.

गवि's picture

26 Feb 2018 - 1:07 pm | गवि

https://en.m.wikipedia.org/wiki/Nirvana_fallacy

एवढं सर्वांनी प्लीज वाचून घ्यावं.