ममता दीदींचा RSS शाळांवरील हल्ला

साहना's picture
साहना in काथ्याकूट
22 Feb 2018 - 1:30 pm
गाभा: 

ममता बॅनर्जी ह्यांनी बंगाल मधील १२५ शाळा रास्वस शी संबंधित आहेत म्हणून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. २०१२ पासून ह्या शाळांनी सरकारकडे NOC ची मागणी केली होती जी आज पर्यंत त्यांना मिळाली नाही आणि त्यामुळे ह्या शाळा बेकायदेशीर ठरवून बंद करण्याचा ममता ह्यांचा निर्णय कायदेशीर आहे.

ह्यातील बहुतेक शाळा मागील २०-३० वर्षां पासून चालू आहेत पण २०१२ मध्ये बंगाल सरकारने प्रत्येक बिगर-अल्पसंख्यांक शाळांना NOC घेणे बंधनकारक केले होते. (अश्या प्रकारचे कायदे सर्वच राज्यांनी RTE नंतर केले आहेत. धर्मबंधू श्री फडणवीस ह्यांनी महाराष्ट्रांत सुमारे ७००० शाळा अश्या मार्गाने आधीच बेकायदेशीर ठरवल्या आहेत)

आता भाजप आणि संघ काय भूमिका घेतो हे पाहणे मजेशीर ठरेल.

प्रतिक्रिया

manguu@mail.com's picture

22 Feb 2018 - 4:38 pm | manguu@mail.com

ममतांचे एक वेळ समजूही शकेल. फडणवीसही त्याच मार्गावर का आहेत ?
नवीन लायसन लागू केले तर ते घ्यावेच लागेल ना ?

डँबिस००७'s picture

22 Feb 2018 - 10:22 pm | डँबिस००७

ममतांचे एक वेळ समजूही शकेल.

?? व्हॉय ? ममता दिदीला " कितीही खालची पातळी गाठणे " माफ आहे का ?

manguu@mail.com's picture

22 Feb 2018 - 10:37 pm | manguu@mail.com

पण त्या वैटच आहेत ना , फडणवीसपण वैट झालेत का ? असल्यास का , असे विचारायचे आहे.

फडणवीस धर्मबंधू आहेत. मांडवली वगैरे करण्यात त्यांचा हातखंडा असून त्यांचे प्लॅन्स काय आहेत हे समाजणे आमच्या तुमच्या सारख्या सामान्य माणसांच्या आवाक्याबाहेरची गोष्ट आहे. तुम्ही फक्त मत घालावे बाकीचे फडणवीस पाहून घेतील.

जेम्स वांड's picture

22 Feb 2018 - 4:59 pm | जेम्स वांड

असाच 'हल्ला' रामकृष्ण मिशन संचालित शाळांवर पण झालाय/होतोय का? नसल्यास का नाही असे आपणांस वाटते?

हल्ला सर्वच हिंदू शाळांवर होत आहे. गोव्यांत भाजपचे ब्रहस्पती श्री पर्रीकर ह्यांनी RTE चे कलाम १३ लागू केले आहे. ह्यामुळे सर्व हिंदू शाळांना फक्त लॉटरी द्वारे प्रवेश द्यावा लागेल.

रामकृष्ण मिशन ने स्वतःला वेगळा धर्म घोषित करून ह्या सर्वातून सुटण्याचा प्रयत्न केला होता पण तो फसला. कर्नाटक मध्ये असाच हल्ला लिंगायत शाळांवर होत असल्याने
त्यांनी सुद्धा हिंदू धर्मातून बाहेर पडण्याचा प्रयत्न चालवला आहे. कायदा जेंव्हा तुमच्या धर्मावर अन्याय करतो तेंव्हा धर्म सोडणे हाच सर्वांत सोपा उपाय आहे.

जेम्स वांड's picture

23 Feb 2018 - 7:58 pm | जेम्स वांड

अन बाकी राज्यांचे आकडेही नकोत,

जसं तुम्ही सांगितलं की आरएसएसच्या अमुक (आकडा) शाळांवर ममताने अशी वक्रदृष्टी वळवली आहे, तसे मला वस्तुनिष्ठ उत्तर द्या, रामकृष्ण मिशनच्या किती शाळा, कॉलेज, इत्यादींना असे एनओसी नाकारले आहेत ममता बॅनर्जीने ते मला समजून घ्यायचे आहे.